One Liners : एका ओळीत सारांश, 06 ऑगस्ट 2020

106

एका ओळीत सारांश, 06 ऑगस्ट 2020

Admin

अर्थव्यवस्था

  • या खासगी बँकेनी लोकांमध्ये आशा जागवण्यासाठी ‘कुछ नया सोचो’ मोहीमेचा प्रारंभ केला – येस बँक.
  • भारतीय रोखे व विनिमय मंडळाने (SEBI) पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या नोंदणीशी संबंधित कामांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून अर्जदारांना आता SEBIच्या या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्व संप्रेषणे दाखल करावी लागणार – पूर्व (कोलकाता), उत्तर (दिल्ली), दक्षिण (चेन्नई) आणि पश्चिम (अहमदाबाद).

आंतरराष्ट्रीय

  • मे 2021 या काळात सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या IAA विश्व परिषदेत दिल्या जाणाऱ्या ‘2020 IAA कंपास चॅप्टर एक्सलन्स अवॉर्ड’चा विजेता – IAA इंडिया चॅप्टर.
  • ‘फ्यूचरब्रँड इंडेक्स 2020’मध्ये या भारतीय कंपनीला अॅपल कंपनीनंतर दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड म्हणून स्थान मिळाले – रिलायन्स इंडस्ट्रीज.

राष्ट्रीय

  • ही संस्था आणि आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन व क्षमता बांधणी संस्था (IIHEd) यांनी संयुक्तपणे 6 आणि 7 ऑगस्ट 2020 रोजी ‘कोविड-19 नंतर विद्यापीठाचे पुनर्गठण आणि रूपांतरण’ या विषयावर एक जागतिक परिषद आयोजित करणार आहे – ओ.पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी.

व्यक्ती विशेष

  • चार वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान कार्यालयात नवीन उपसचिव – नवल किशोर राम.

राज्य विशेष

  • या राज्य वा केंद्रशासित प्रदेश सरकारने मतदारसंघ विकास निधीच्या धर्तीवर विभाग विकास निधी (प्रत्येकी 25 लक्ष रुपये) तयार करण्याला मान्यता दिली – जम्मू काश्मीर.
  • या राज्य सरकारने ‘शाहिद महेंद्र कर्मा तेंदूपत्ता संग्रहक सामाजिक सुरक्षा योजना’ लागू केली – छत्तीसगड.
  • या राज्य सरकारने गुर्जर सोबतच अधिक मागासवर्गीयांना पाच टक्के आरक्षण मंजूर केले आहे – राजस्थान.

सामान्य ज्ञान

  • अमेरिकेनी 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी या जपानी शहरांवर दोन अणुबॉम्ब टाकले – हिरोशिमा आणि नागासाकी.
  • आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) – स्थापना: 08 एप्रिल 1938; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.
  • भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) – स्थापना: 19 जानेवारी 1954; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय कापूस महामंडळ (CCI) – स्थापना: वर्ष 1970; मुख्यालय: मुंबई.
  • भारतीय ताग महामंडळ (JCI) – स्थापना: वर्ष 1971; मुख्यालय: कोलकाता.
  • राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना – वर्ष 2007.
  • नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) याची स्थापना – वर्ष 1987-88.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम