Todays One Liners : एका ओळीत सारांश, 17 ऑक्टोबर 2020

भारतात, राष्ट्रीय नवोन्मेष (किंवा नवकल्पना किंवा शोध) दिन - 15 ऑक्टोबर.

126

एका ओळीत सारांश, 17 ऑक्टोबर 2020

Admin

दिनविशेष

  • भारतात, राष्ट्रीय नवोन्मेष (किंवा नवकल्पना किंवा शोध) दिन – 15 ऑक्टोबर.
  • 2020 साली आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन (17 ऑक्टोबर) याचा विषय – अॅक्टिंग टुगेदर टू अचिव्ह सोशल अँड एनव्हिरोनमेंटळ जस्टीस फॉर ऑल.
  • भारतात, बौद्धिक संपदा साक्षरता सप्ताह – 15 ते 23 ऑक्टोबर.

अर्थव्यवस्था

  • या सार्वजनिक बँकेनी गृहनिर्माण व नगर कल्याण मंत्रालय तसेच भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) या संस्थांसोबत स्वनिधी योजनेच्या अंतर्गत पथविक्रेत्यांना अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भात सामंजस्य करार केला – इंडियन बँक.

आंतरराष्ट्रीय

  • हिंद-प्रशांत प्रांतासाठी राजदूत नियुक्त करणारा पहिला देश, ज्याने ख्रिस्तोफे पिनोट यांना स्वतंत्र राजदूत म्हणून घोषित केले – फ्रान्स.

राष्ट्रीय

  • कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाने या दिवशी ‘महिला किसान (शेतकरी) दिन’ आयोजित केला – 15 ऑक्टोबर 2020.
  • 15 ऑक्टोबर 2020 रोजी ‘इट राईट इंडिया’ चळवळीचे ‘व्हिजन 2050’ साध्य करण्यासाठी ‘सर्वसमावेशक सरकार’ दृष्टिकोन तयार करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेच्या भागीदारीने एक आंतर-मंत्रिस्तरीय बैठक पार पडली – भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI).
  • 15 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी बौद्धिक संपदा साक्षरता आणि जागरूकता अभियानासाठी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले – कपिलाकलाम कार्यक्रम.
  • या कंपनीने भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोबत भागीदारीची घोषणा केली आणि एक नवीन शोध सुविधा कार्यरत केली ज्यामार्फत बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित विश्वसनीय आणि अधिकृत माहिती शोधणे सोपे होते – ट्विटर.
  • या शहरात ‘आंतरराष्ट्रीय प्रगत विषाणूशास्त्र संस्था’ (International Institute of Advanced Virology) याची स्थापना केली जात आहे – थोक्कल, तिरुनंतपुरम, केरळ.

व्यक्ती विशेष

  • ‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या प्रथम भारतीय वेषभूषा संकल्पक, ज्यांचे 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले – भानु अथैया.
  • आंतरराष्ट्रीय विद्युत तांत्रिक (इलेक्ट्रोटेक्निकल) आयोगातर्फे दिल्या गेलेल्या ‘IEC 1906 पुरस्कार’चे विजेता – बी. एन. डी भौमिक.

क्रिडा

  • आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाचे नवीन अंतरिम अध्यक्ष – मायकेल इराणी.

राज्य विशेष

  • 14 ऑक्टोबर रोजी या शहरात ‘जश्न-ए-हरूद’ नामक दोन दिवस चालणाऱ्या लोकसंगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले – श्रीनगर.

ज्ञान-विज्ञान

  • आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) हैदराबाद आणि या संस्थेनी भूकंपांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संरचना सूरक्षेबद्दल अधिक चांगल्या अंतर्दृष्टीसाठी एक रॅपिड व्हिज्युअल स्क्रीनिंग (RVS) प्राइमर (दस्तऐवज) विकसित केले – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA).

सामान्य ज्ञान

  • आंतरराष्ट्रीय विद्युत तांत्रिक (इलेक्ट्रोटेक्निकल) आयोग (IEC) – स्थापना: 26 जून 1906; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
  • भारतीय निवडणूक आयोग (ECI) – स्थापना: 25 जानेवारी 1950; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) – स्थापना: वर्ष 2011; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) – स्थापना: 2 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
  • आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (IWF) – स्थापना: वर्ष 1905; मुख्यालय: बुडापेस्ट, हंगेरी.
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) – स्थापना: वर्ष 2005; मुख्यालय: नवी दिल्ली.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम