पुरूशोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९१९ – मृत्यू : २०००)

406

पुरूशोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

नाव : पुरूशोत्तम लक्ष्मण देशपांडे

टोपन नाव : पु. ल. भाई

जन्म : ८ नोव्हेंबर १९१९ (मुंबई)

मृत्यू: १२ जून २०००, पुणे

पुरस्कार :

  • पद्मश्री सन्मान
  • साहित्या अकादमी
  • साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • संगीत नाटक अकादमी
  • महाराष्ट्र भूषण
  • महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
  • विष्णुदास भावे पुरस्कार

पुरूशोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

शिक्षण :

  • पार्ले टिळक विद्यालय शालेय शिक्षण
  • फर्ग्युसन कॉलेजमधुन बी. ए. व एम. ए. झाले.
  • मुंबईत इस्माईल युसुफ कॉलेजमधून एल. एल. बी. झाले.
  • कार्यक्षेत्र : मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, दिग्दर्शक, पटकथाकार, संगीत दिग्दर्शक, विनोदकार, गायक
  • ओरिएंटल हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम केले.
  • १९४४ साली पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्रे भय्या “भय्या नागपूरकर”
  • १९४६ सुनिता देशपांडे सोबत विवाह.
  • १९४७ ते १९५४ चित्रपटांमध्ये काम केले. ‘गुळाचा गणपती, या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
  • १९५५ ला आकाशवाणीत नोकरीला लागले.
  • १९५९ पु. ल. देशपांडे भारतातील पहिले दुरचित्रवाणी कार्यक्रम निर्मात झाले.
  • पंडित नेहरुची दुरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पु. ल. हे भारतीय दुरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
  • नाचरे मोरा नाच हे गाणे प्रसिद्ध झाले.
  • गोळाबेरीज (१९६०), नस्ती उठाठेव (१९५२)
  • मराठी वाडमयाचा इतिहास (१९९४) इत्यादी कादबंन्या प्रसिद्ध आहे.

जीवन :

पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी ‘अभंग गीतांजली’ या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.

मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

१२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

पुरूशोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाटके :
  • अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक – निकोलाय गोगोल)
  • एक झुंज वाऱ्याशी (१९९४)
  • तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक – बेर्टोल्ट ब्रेख्त)
  • ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक – जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक – पिग्मॅलियन)
  • तुका म्हणे आता (१९४८)
  • तुझे आहे तुजपाशी (१९५७)
  • नवे गोकुळ
  • पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)
  • पुढारी पाहिजे (एकांकिका)
  • भाग्यवान (१९५३)
  • राजा ईडिपस (राजा ओयादिपौस) (१९७९) (मूळ लेखक – सोफोक्लीझ)
  • वटवट वटवट (१९९९)
  • सुंदर मी होणार (१९५८)
लोकनाट्ये
  • पुढारी पाहिजे (१९५१)
  • वाऱ्यावरची वरात
काही विनोदी कथा
  • एका रविवारची कहाणी
  • बिगरी ते मॅट्रिक
  • मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?
  • म्हैस. या कथेवर मराठीत एक चित्रपट बनत आहे. (२-४-२०१३ची बातमी)
  • मी आणि माझा शत्रुपक्ष
  • पाळीव प्राणी
  • काही नवे ग्रहयोग
  • माझे पौष्टिक जीवन
  • उरलासुरला (कथा)

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम