कोरोनामुळे RBI चे महत्वाचे निर्णय

 

 RBI बँकेनी 3 महिने कर्जावरील EMI ला स्थगिती देण्याचा सल्ला

 सर्व बँकांना दिला

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांवर उपाययोजना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) पुढील 3 महिने कर्जावरील मासिक हप्ता (EMI) याला स्थगिती द्या, असा सल्ला सर्व बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांना दिला आहे.

या सल्ल्यानुसार खासगी आणि सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था निर्णय घेऊ शकतात. तसेच गृहकर्ज देणाऱ्या वित्त कंपन्याही ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. हप्ता माफ केला जाणार नाही. बँका कर्जाची पुनर्रचना करणार.

RBIचा सल्ला बँकांनी मान्य केल्यास केल्यास 3 महिन्यासाठी संपूर्ण देय रक्कम आणि व्याजासह संपूर्ण EMI स्थगित केला जाणार. 1 मार्च 2020 रोजी थकबाकी असणाऱ्यांच्या कर्जासाठी हा नियम लागू केला जाणार.

RBIचे इतर निर्णय

  • भारतीय रिझर्व्ह बँकेनी व्याजदरात मोठी कपात केली. रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्यात आली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे.
  • तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतात.
  • RBIने बँकांचे कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) देखील कमी केले.
  • 28 मार्च 2020 पासून सुरू होणार्‍या पंधरवड्यापासून सर्व बँकांचे CRR 100 बेसिस पॉईंटने कमी करून ते निव्वळ डिमांड अँड टाइम लाएबिलिटीज (NDTL) याच्या 3 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा