बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त असलेल्या सैनिक सामान्य सेवा, ट्रेडमन, क्लर्क पदासाठी ही भरती होणार आहे. 15 डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडू, 16 डिसेंबरला महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यातील खेळाडूंची भरती प्रक्रिया पार पडेल. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी 17 पासून भरती सुरु होईल. पहिले दोन दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी भरती चालेल. तर 19 रोजी मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील उमेदवार भाग घेऊ शकतात.
21 रोजी सोल्जर ट्रेडमन पदासाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी असेल. तर 22 रोजी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवार भाग घेऊ शकतात. 23 डिसेंबर रोजी सोल्जर क्लर्क व स्टोअर किपर पदासाठी भरती होणार असून यात केवळ मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे आणि निवृत्त जवानांच्या मुलांना भरतीची संधी असेल. 31 जानेवारी 2021 रोजी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.
सामान्य सेवा भरतीसाठी उमेदवार 1 ऑक्टोबर 1999 पूर्वी आणि 1 एप्रिल 2003 नंतर जन्मलेला नसावा. ट्रेडमन व क्लर्कसाठी 1 ऑक्टोबर 1997 पूर्वी व 1 एप्रिल 2003 पूर्वी जन्मलेला नसावा. ही भरती केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू, सैन्यात सेवा बजावणारे जवानांचे भाऊ, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नींची मुले यांच्यासाठी राखीव असून इतरांना यात भरतीची संधी नसेल. भरतीसाठी येणाऱ्या युवकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रे, माजी सैनिकांची मुले असल्यास रिलेशन प्रमाणपत्र, 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतीसह भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSCExam’s मराठी नोकरी मार्गदर्शन
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.