रेल्वे भरती: RRB NTPC अर्जांचं स्टेटस जाहीर!

कसं पाहाल अॅप्लिकेशन स्टेटस?

818

RRB NTPC Exam 2020 : आरआरबी एनटीपीसी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या कोट्यवधी उमेदवारांना आपल्या अर्जाची स्थिती माहित करून घेता येणार आहे…

RRB NTPC Exam 2020 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) च्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या कोट्यवधी उमेदवारांना आपल्या अर्जाची स्थिती माहित करून घेता येणार आहे. ज्या उमेदवारांनी २०१९ मध्ये नोकरीसाठी अर्ज केले होते, ते आता हे माहित करून घेऊ शकतात की त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे की नाही. ही भरती एकूण १ लाख ४० हजार ६४० रिक्त पदांवर होणार आहे. यासाठी देशभरातून सुमारे २ कोटी ४० लाख अर्ज आले होते.

आरआरबी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC) स्टेज – १ ची परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. या भरतीसाठी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०१९ मध्ये अधिसूचना जारी झाली होती. अर्ज १ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वेबसाईटवर उपलब्ध केले गेले होती. उमेदवारांना ५ एप्रिलपर्यंत अर्ज शुल्क भरायचे होते. १२ एप्रिल २०१९ रोजी अर्ज प्रक्रिया संपली होती. मात्र तेव्हापासून या उमेदवारांना परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा होती. अलीकडे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या परीक्षेची तारीख जाहीर केली होती.

आरआरबी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर, ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम टिकीट क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शियल कम टिकीट क्लर्क, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, सीनियर टाइम कीपर , कमर्शियल अपरेंटिस आणि स्टेशन मास्टर आदि पदांचा समावेश आहे.

कधीपर्यंत पाहाता येईल अॅप्लिकेशन स्टेटस?

उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत आपल्या अर्जाचं स्टेटस पाहता येणार आहे. स्टेटस पाहण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.

कसं पाहाल अॅप्लिकेशन स्टेटस?

  • – या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवर जा.
  • – तुमचं क्षेत्र निवडा. (या वृत्ताच्या अखेरीस मुंबई क्षेत्राची लिंक स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.)
  • – आता तुम्ही लॉग इन पेजवर याल.
  • – येथे तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, जन्मतारीख, कॅपचा कोड वगैरे माहिती भरून लॉग इन करा.
  • – यानंतर तुम्हाला तुमचं RRB NTPC अॅप्लिकेशन स्टेटस दिसेल.

RRB NTPC Application Status थेट लिंकवर – https://bengaluru.rrbonlinereg.co.in/status.html

RRB NTPC मुंबई क्षेत्राच्या लिंक – https://mumbai.rrbonlinereg.co.in/appsts/UI_scrutinylogin.aspx#no-back-button

 

 

 

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSCExam’s मराठी नोकरी मार्गदर्शन

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम