व्यक्तीविशेष : सायना नेहवाल [भारताची फुलराणी]

195

सायनाचा जन्म भारताच्या हरियाणा राज्यातील हिसार येथील एका जाट कुटुंबात 17 मार्च 1990 रोजी झाला आहे. तिचे वडील हरवीर सिंह, हरियाणा येथील एका अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत कार्यरत आहेत आणि आई उषा रानी देखील सायना सारख्याच एक बॅडमिंटन खेळाडु होत्या आणि त्या राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळत असत.

तिचे  वडिल सुध्दा राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळाचे एक उत्तम खेळाडु म्हणुन प्रसिध्द होते. त्यामुळे सायनात बॅडमिंटन खेळाची प्रतिभा आई-वडिलांकडुन वारसारूपाने मिळाली आहे.

शिक्षण :

तिचे  सुरूवातीचे शिक्षण हरियाणातील हिसार इथल्या शाळेमधुन झाले. वडिलांची हैद्राबाद येथे बदली झाल्याने संपुर्ण परिवार हैद्राबाद ला स्थानांतरीत झाला. त्यानंतर सायनाने आपली 10 वी ची परिक्षा फॉर्म सेंट ऐनी कॉलेज मेहंदीपट्टनम हैद्राबाद येथुन उत्तीर्ण केली. सायना अभ्यासात एक हुशार विदयार्थिनी तर होतीच याशिवाय शालेय जिवनात ती खेळात देखील फार अक्टीव्ह असायची. शाळेत असतांना अभ्यासासमवेत तीने कराटेचं देखील शिक्षण घेतलं होतं त्यात तिला ब्राउन बेल्ट देखील मिळाला आहे. सायना एक सर्वोत्कृश्ट बॅडमिंटन पटू व्हावी अशी तिच्या वडिलांची फार ईच्छा होती. म्हणुनच तीचे वडिल तिला रोज शाळेत जाण्यापुर्वी सकाळी 4 वाजता उठवुन बॅडमिंटन च्या सरावाकरीता घेउन जात असत.

पुलेला गोपीचंद हे तिचे बॅडमिंटनमधले प्रशिक्षक आहेत. बॅडमिंटनपटूंच्या जागतिक मानांकन यादीमध्ये सध्या ती दुस-या स्थानावर आहे. २०१२ साली लंडन ऑलिंपिकमध्ये महिला एकेरी स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी आणि जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तसंच इंडोनेशियन खुल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. जून २००९ मध्ये झालेल्या स्पर्धेत हा पराक्रम केला होता. ३० जुलै २०१० रोजी सायनाला २००९-१० चा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ मिळाला.

सुरूवातीपासुनच बॅडमिंटन खेळात आपली चमकदार कामगिरी करणाऱ्या सायनाने 2006 साली 4-स्टार टूर्नामेंट -फिलिपिन्स ओपन मध्ये भाग घेत येथे देखील उत्कृश्ट कामगिरी पार पाडली शिवाय वयाच्या अवघ्या 16 व्या वर्शी हा किताब नावावर करणारी भारत आणि एशिया ची पहिली अंडर-19 खेळाडु बनली. या व्यतिरीक्त याच वर्शी सायनाने पुन्हा एकदा सॅटेलाईट टुर्नामेंटवर आपले नाव कोरले.

2015 साली 29 मार्च ला सायना ने इंडिया ओपन BWF सुपर सिरीज मधे सिंगल्स किताब जिंकला. बॅडमिंटन खेळात आपल्या अव्दितीय खेळाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या सायनाने 2015 ला सुध्दा आपली खेळातली जादु कायम ठेवली. याच वर्शी सायनाने ‘इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड’ मध्ये आणि फायनल मधे महिला एकेरी स्पर्धेत स्पॅनिश खेळाडु कैरोलिना मरीना ला हरवत भारताचा गौरव वाढविला.

वैयक्तिक जीवन :

भारतिय बॅडमिंटन पटु सायना नेहवालने 14 डिसेंबर 2018 रोजी प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडु पारूपल्ली कश्यप समवेत विवाह केला. लग्नापुर्वी ते दोघे चांगले मित्र होते पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करण्याचे ठरविले.

मिळालेले पुरस्कार :

  • 2016 – भारतातील सर्वोच्च सन्मानापैकी एक पद्मभुषण पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
  • 2009-2010 – क्रिडा जगतातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार ‘‘राजीव गांधी खेळ रत्न’’ पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
  • 2010 – पद्म पुरस्कार देखील मिळाला.
  • 2009 – सायनाला अर्जृन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
  • 2008 –  सायना नेहवाल ला बॅडमिंटन वल्र्ड फेडरेशन व्दारे सर्वात उत्कृश्ट आणि प्रतिभावंत खेळाडुचा दर्जा देण्यात आला.

बॅडमिंटन पटु सायना नेहवाल ने आपल्या खेळातील प्रदर्शनाने केवळ भारतियांनाच नव्हें तर संपुर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे व आपल्यातील अद्भुत प्रतिभेने भारताचे नाव अखिल विश्वात गौरविले आहे.सायना भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडु आहे तिची गणना आज सर्वश्रेष्ठ  खेळाडुंमध्ये होते. फार काळपर्यंत सायनाने जगातील क्रमांक 1 ची बॅडमिंटन खेळाडु म्हणुन गौरव प्राप्त केला आहे.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम