अर्थव्यवस्थेची ची क्षेत्रे
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थव्यवस्थेची ची क्षेत्रे
(Sectors of Economy)
https://t.me/Economics_MPSC
कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण दोन आधारांवर केले जाते:
१ )व्यवसायानुसार व मालकीनुसार.
२)व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र
व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात
१)प्राथमिक क्षेत्र (Primary sector): या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामुग्रीशी संबंधित कृषि व संलग्न व्यवसाय (पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशिम उत्पादन इ.), जंगलसंपत्ती खाणी व खनिज उत्पादने (कोळसा, पेट्रोलियम, लोह खानिज इत्यादींचे उत्खनन) इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रास ‘कृषि व संलग्न क्षेत्र (Agriculture and Allied Sector) असेही संबोधले जाते.
२)द्वितीयक क्षेत्र (Secondary sector): या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रास ‘उद्योग क्षेत्र’ (industry sector) असे ही संबोधले जाते. या क्षेत्रात कारखानदारी/विनिर्माण, बांधकाम, वीजनिर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो.
https://t.me/Economics_MPSC
३तृतीयक क्षेत्र (Tertiary sector): या क्षेत्रामध्ये प्राथि व द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. त्यामुळे या खेाला ‘सेवा क्षेत्र (service sector)| असेही म्हटले जाते. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक दळणवळम, तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो.
४)चतुर्थक क्षेत्र (Quatermary sector): या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो. असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांची (ideas) निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो. त्यामध्ये विशेषीकृत ज्ञान, माहिती तंत्रज्ञानविषयक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता इत्यादीचा वापर केला जातो. या व्यबसायांमध्ये संशोधन व विकास कार्वे (R&D), सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यांसारख्या उन्नत सेवांचा समावेश होतो.
https://t.me/Economics_MPSC
५)पंचक क्षेत्र (Quinary sector): काही तज्ज्ञ पंचक क्षेत्रास चतुर्थक क्षेत्राचाच हिस्सा असल्याचे मानतात. पंचक क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील ‘सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिये’ चा (highest levels of decision making) समावेश होतो. त्यामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
Join our Telegram Channel : https://Telgram.me/Economics_MPSC
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents