श्रीधर महादेव जोशी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९०४- मृत्यू : १९८९)

576

एस. एम. जोशीचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जवळील गोळप होय. १९१५ साली वडिलांचा मृत्यु झाला आणि कुटूंबाची परवड झाली. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थिची मिरवणूक काढली गेली.

श्रीधर महादेव जोशी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

नाव : श्रीधर महादेव जोशी

जन्म : १२ नोव्हेंबर १९०४

टोपण नाव : एसेम

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजवाद

मृत्यू : १ एप्रिल १९८९

 • एसेएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.
 • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले.
 • घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती.
 • जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे.
 • न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या मास्तरांनी चेहऱ्यावर देवीचे व्रण असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले; तेव्हाचा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या आपल्या न्यायी वृत्तीचे दर्शन घडवितो.

त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणाऱ्या मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. यांनी याला विरोध केला.  समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवायला लावले. ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस.एम. यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच होती – हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

 • श्रीधर महादेव जोशीश्रीधर महादेव जोशी सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी आपली मते डेली न्यूज व लोकमित्र या वृत्तपत्रांद्वारे मांडली.
 • त्याचे ते अनुक्रमे १९५३ व १९५८–६२ मध्ये संपादक होते.
 • याशिवाय पुणे महानगरपालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य होते (१९६२–६६).
 • त्यांचा उर्मी हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच आस्पेक्ट्स ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी (१९६९) हा समाजवादी विचारांवर त्यांनी ग्रंथ लिहिला.
 • याशिवाय विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल स्फुटलेखन केले आहे.
 • १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला.
 • १९ ऑगस्ट १९३९ रोजी त्यांचे जिग्न झाले पण रेशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणे कठीण होते.
 • १९३० साली त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्षाचा आणि त्यानंतर रॉय दिनाच्या दिवशी केलल्या भाषणाबद्दल २ वर्षांचा तुरुंगवास त्यांना एकूण ३ वर्षाचा तुरूंगवास झाला होता.
 • १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता.
 • १९५७ साली महाराष्ट्राच्या विधानसभेत ते आमदार झाले होते.
 • १९६७ साली दुसऱ्यांदा लोकसभेवर ते खासदार म्हणून निवडून आले होते.
 • त्यांच्यावर दोन गौरवग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांची व्याख्याने, पत्रे व इतर स्फुटलेख एस्. एम्. जोशी : व्यक्ति, वाणी, लेखणी या नावाने प्रसिद्ध झाले आहेत (१९६४).

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम