Coronavirus:कोरोनामुळे 10वीचा एक पेपर पुढे ढकलला; 23 मार्चचा पेपर 31 मार्चनंतर

120

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीचा एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार,31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर होणार; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

 

ssc last paper
ssc last paper

दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे

दहावीचा एकच पेपर उरला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता. मात्र करोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. इतके दिवस दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलला आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

राज्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भातल्या निर्णयाची घोषणा ही ३१ मार्चनंतर केली जाईल.

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम