विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1871) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८२५ - मृत्यू : १८७१)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,609

हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर विष्णुबावा असा केलेला आढळतो.

विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1871) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

विष्णुबुवा ब्रह्मचारी
विष्णुबुवा ब्रह्मचारी
जन्म: १८२५

मृत्यू: १८ फेब्रुवारी १८७१ (मुंबई)

जन्मस्थान : शिरवली, जि. कुलाबा (रायगड)

मुळ नाव : विष्णु भिकाजी गोखले

  • विष्णुबुवा ब्रह्मचारी पाच वर्षाचे असताना त्यांचे वडील वारल्याने बालपण कष्टात गेले. त्यामुळे फारसे शिक्षण घेता आले नाही.
  • वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यानंतर त्यांनी काही काळ वेदाध्ययन व व्यवहारिक शिक्षण घेतले.
  • आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेगवेगळी कामे करावी लागली.
  • विष्णुबुवांचा ओढा धर्मग्रंथ संस्कृत अभ्यास याकडे होता. त्यांनी परिक्षमपूर्वक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. यांच्या जोडीला कथा, कीर्तन पुराण प्रवचन यात त्यांना गोडी होती.
  • पुढे १८४७ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. सप्तशृंगीच्या डोंगरावर त्यांनी साधनेस सुरवात केली. तेथे त्यांना पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनःस्थापना करावी असा साक्षात्कार झाला. तेव्हापासुन वैदिक धर्माचा प्रचारास प्रारंभ केला.
  • विष्णुबुवा ब्रह्मचारी महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा निरनिराळ्या गावी गेले आणि वैदिक धर्माचे महत्व विषद करणारी भाषणे देऊन समाजामध्ये अपार लोकप्रियता मिळवली तेव्हापासून ‘ब्रह्मचारी बुवा’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले.
  • सन १८५६ मध्ये विष्णुबुवा मुंबईत आल्यानंतर ख्रिस्तीधर्मीय ज्याप्रमाणे आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करत होते ते पाहून विष्णुबु त्यांचा या हिंदूधर्मावरील आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा संकल्प केला.
  • १८५७ पासुन मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांचे खिस्ती मिशनर्‍याशी वादविवाद सत्र होऊ लागले. सर्वधर्मियांना खुले असे. त्यापैकि रेव्हरंड विल्सन या ख्रिस्त धर्मपदेशाकबरोबर त्यांचे वादविवाद खूप गाजले.
  • या ठिकाणी झालेले वादविवाद / भाषणे रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी १८९० मध्ये संपादित केलेल्या समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकात वाचायला मिळतात.
  • विष्णुबुवांनी पुनर्विवाह, घटस्फोट शुद्धीकरण, प्रौढविवाह याविषयी आयुष्यात बरेच प्रयत्न केले तसेच समाजातील अंधश्रद्धा, खुल्या समजूती व लोकभ्रम दुर करण्यासाठी ते नेहमी कार्यशिल राहिले.
  • विष्णूबुवांनी वर्तमानदीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टिकेला चोख प्रत्युत्तर दिले. त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत असे प्रतिपादन केले.
  • विष्णूबुवांनी सेतुबंधिनी नावाची गीतेवर टीका लिहिली ही टीका अध्याय १८ श्लोक १७ पर्यंत लिहिली. पुढील टीका त्यांच्या एका शिष्याने लिहिली याचे वैशिष्ट्ये म्हणजे ती गद्य व तत्कालीन ज्ञान वैधानिक परिभाषेत लिहिलेली ही पहिलीच टीका मानावी लागेल.
  • विष्णुबुवांनी वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ लिहीला यात २५ पैकी १५ वे राजनीतीपर प्रकरण स्वतंत्र दिले असून पुढे त्यातील मतांचा विचार करून १८६७ मध्ये सुखदायक राज्यप्रकरणी निबंध हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची तुलना कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटलशी केली गेली. यात त्यांनी आदर्श राज्याची कल्पना मांडली व सर्व प्रजा म्हणजे एक कुटूंब अशी भूमिका विष्णुबुवांनी घेतली. यातून त्यांच्या समाजवादी मनोवृत्ती दिसून आल्याने काही अभ्यासक त्यांना महाराष्ट्राचा पहिला समाजवादी म्हणतात.

भाष्य व भाष्यकार:

१)ह. मो. मराठे (महाराष्ट्रगाथा ग्रंथात)

विष्णूबुवांनी आपल्या विचारांचा सर्वत्र प्रचार केला पण महाराष्ट्रावर त्यांच्या विचाराचा परिणाम नाही.

२) ग. त्र्य. मांडखोलकर :

विष्णूबुवा म्हणजे कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे म्हटले.

३) प्रभाकर वैद्य :

विष्णूबुवा हे खऱ्या अर्थाने विचारकही नव्हते. क्रांतीकारक तर मुळीच नव्हते..

विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1871) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1871) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

विष्णुबुवा यांनी समाजातील जाती व्यवस्थेलाही विरोध केलेला दिसतो. समाजात निर्माण झालेली विषमता त्यांना मान्य नव्हती. प्रचलित जातिभेद हे वेदकालीन वर्णव्यवस्थेला सोडून आहेत, असे त्यांचे मत होते. गुण–कर्मानुसारची वर्णव्यवस्था हा त्यांच्या मते आदर्श समाजव्यवस्थेचा पाया आहे. जात किंवा वर्ण जन्मावरून न ठरविता कर्मावरून ठरविल्या जाव्यात, या विचाराचे ते होते.

समाजातील अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती, त्यासंबंधी त्यांचे विचारही अतिशय परखड होते. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण, मंदिर प्रवेश इत्यादी सामाजिक प्रश्नासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी स्वरूपाचे होते. स्त्रीदास्य विमोचनाच्या संदर्भातही त्यांनी कार्य केलेले दिसते.

स्त्रीदास्यत्व जर नष्ट करावयाचे असेल, तर स्त्रीशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते. विवाहासंबंधी स्त्रीला स्वातंत्र्य असले पाहिजे, विधवेला पुर्नविवाहाचा अधिकार असला पाहिजे, सती प्रथा बंद झाली पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते.

  • विष्णुबावांची ग्रंथसंपदा

१) सेतुबंधनी टीका

२) भावार्थ सिंधू

३) वेदोक्त धर्मप्रकाश (आई-मुलीचा संवाद)

४) सुखदायक राज्यप्रकरणी निबंध

५) सहजस्थितीचा निबंध

६) चतुःश्लोकी श्रीमद्भागवताचा मराठी भाषेत अर्थ

७) बोधसागर रहस्य

इंग्रज शासन काळात भारतात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले व कारखानदारी उदयास आली. त्या माध्यमातून तेवढ्याच प्रमाणात कामगार वर्गही उदयास आला. या कामगारांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण व त्यांच्या संबंधीचे विचार त्यांनी सुखदायक राज्यप्रकरणी निबंध या ग्रंथात मांडलेले आहेत.

त्यांचा हा ग्रंथ म्हणजे त्यांची एक आदर्श राज्यकल्पना आहे. सर्व प्रजा म्हणजे एक कुटुंब, अशी भूमिका घेऊन ह्या ग्रंथातील विचार त्यांनी मांडले आहेत. सर्व प्रजा एक कुटुंब आहे, तर सर्व भूमी ही एक बाग आहे. ह्या बागेत जे फुलेल, फळेल ते सर्वांचे.

सर्व प्रजेने जमिनीची लागवड करावी, अन्नाची कोठारे भरावी आणि सर्वांनी पोटास लागेल तितके अन्न न्यावे. कपडेही असेच तयार करून ठेवावेत व आवश्यकतेप्रमाणे ज्याने त्याने ते न्यावेत. राजा, शेतकरी आदींनी एकाच प्रकारचे ‘अहिंसक’ अन्न खावे.

याप्रमाणे परमतखंडण करून वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी दत्तात्रेयांकडून विष्णुबुवांनी प्रेरणा मिळाली. पंढरपूर, सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, नगर, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे प्रचारकार्य चाले.

भावार्थसिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतुश्लोकी भागवत याचा अर्थ, सहजस्थितीचा निबंध, सेतुबंधनी टीका इत्यादी त्यांच्या ग्रंथांतून त्या काळच्या मानाने खूपच प्रगत व क्रांतिकारक विचार आहेत. ‘सर्व प्रजा एक कुटुंब आहे’ अशा विचाराचा विस्तार त्यांनी केला. फारसा शास्त्रीय आधार नसला तरी बावांचे साम्यवादी विचार आजही चकित करणारे आहेत.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम