यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९१३ - मृत्यू : १९८४)

941

               यशवंतराव चव्हाण (१९१३-१९८४)

नाव : यशवंतराव बळवंतराव चव्हाण

वडील : बळवंतराव चव्हाण

आई : विठाबाई

भाऊ : ज्ञानदेव

जन्म : १२ मार्च १९१३, सातारा – कराड – देवराष्ट्र

मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४

शिक्षण : साताज्यातील टिळक महाविद्यालयात

प्रभाव : फुले आणि शाहु महाराज

  • हे राज्य मराठ्यांचे नाही तर मराठी माणसांचे आहे असे त्यांचे मत.
  • सहकारी संस्था स्थापन करून विकेंद्रीकरणाला चालणा .
  • १९३० वयाच्या १७ व्या वर्षी गांधीजीच्या असहकार चळवळीत भाग घेतला.
  • १९३२ सातायात तिरंगा फडकवला म्हणून १८ महिन्यांची सजा झाली.
  • १९३८ मुंबई विद्यापिठातून इतिहास व राज्यशास्त्र मधून बी. ए. केले.
  • १९४० सातारा जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष झाले.
  • १९४१ एल. एल. बी. पूर्ण केले.
  • १९४२ विवाह संपन पत्नी – वेणूबाई
  • १९४२ चले जाव च्या चळवळीत पुन्हा तुरुंगवास. (२ वर्षांनंतर सोडण्यात आले.)
  • १९४६ सातायातून एमएलए म्हणून निवडून आले. याच वर्षी त्यांना बॉम्बे स्टेट होम चे  मिनीस्टर  चे पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून निवडले गेले.

यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

 

  • १९५० द्विभाषीक बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री (मुंबईसहित महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जतात.)
  • १९६२ अती महत्त्वाचा को-ऑपरेटीव्ह सोसायटी अॅक्ट पास केला.
  • १९६२ नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलवून घेतले. (कारण १९६२ च्या चीन च्या युद्धातील पराभव)
  •  युद्धानंतरची परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली.
  • युद्धातील अपंग सैनिकांना कायम नौकरीची सोय आणि शहिद सैनिकांच्य मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली.
  • १९७०-७४ पर्यंत अर्थमंत्री (पंतप्रधान इंदिरा गांधी)
  • स्वर्णसिंग पंतप्रधान असतांना परराष्ट्र मंत्री होते.
  • १९७९-८० चरणसिंह आणि मोरारजी देसाई पंतप्रधान असतांना यशवंतराव चव्हाण गृहमंत्री होते.
  • २८ जुलै १९७९ ते १७ जानेवारी १९८० उपपंतप्रधान
  • मुंबईचे पहिले मुख्यमंत्री १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
  •   वर्णन – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
  •  चिनच्या युद्धावेळीचे वर्णन – हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावून गेला.
  • लेखनसंपदा – ऋणानुबंध, कृष्णकाठ
  • आत्मवृत्त – कृष्णाकाठ
  • यशवंतराव चव्हाणांना त्यांच्या जीवनाचे आत्मचरित्र लिहायचे होते. त्यांच्या जीवनाचे तीन टप्पे होते.

१) बालपण           २) मुंबईचे पहिले मुख्यमंत्री         ३) दिल्लीचे वास्तव्य

त्यांनी त्याला नावे दिली होती – १) कृष्णातीर, २) सागरतीर, ३) यमुनातीर

परंतु कृष्णतीर पूर्ण झाल्यावर २५ नोव्हेंबर १९८४ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी हृदय विकाराने निधन झाले.

  • मृत्यू – २५ नोव्हेंबर १९८४
  • प्रतिक्रिया :

१) खांडेकरांच्या मते यशवंतराव राजकारणात नसले असते तर ते उत्तम साहित्यीक झाले असते.

२) तळवळकरांनी यशवंतरावांचा ‘सुसंस्कृत मराठी नेता’ या शब्दात गौरव केला.

 

राजकारणात असतांना महत्त्वाचे घेतलेले निर्णय :

१) पंचायतराज या त्रिस्तरीय व्यवस्थेची सुरुवात.

२) राज्य पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ

३) कोल्हापूर बंधाऱ्यांचा प्रचार.  कोयना आणि उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती.

४) १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना (सहकारला चालणा)

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ स्थापना.

६) राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग.

७) मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोष मंडळाची स्थापना केली.

यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे.

अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी.

शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम