MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Current Affairs : 03 April 2020 | चालू घडामोडी :०३ एप्रिल २०२०

82

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 03 April 2020 | चालू घडामोडी :०३ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – मिसाइलच्या कारखान्यात इस्रायलने सुरु केली व्हेंटिलेटर्सची निर्मिती.

 • करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे.
 • इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या 30 व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
 • इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 • एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अ‍ॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची निर्मिती केली जाते.
 • तर मागच्यावर्षी इस्रायलने सुद्धा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत यानाची निर्मिती सुद्धा इथेच करण्यात आली होती.

# Current Affairs


चालू घडामोडी – मुंबईच्या नवल डॉकयार्डने स्वतःसाठी ‘तापमान मापक यंत्र’ तयार केले

 • मुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे नेव्हल डॉकयार्ड इथल्या अभियंत्यांनी स्वतःसाठी कमी किंमतीचे ‘तापमान मापक यंत्र’ तयार केले.
 • 285 वर्ष जुना असलेल्या त्या परिसरात दररोज सरासरी 20 हजार कर्मचारी प्रवेश करतात. कोविड-19 संक्रमणाचा प्रसार टाळण्याच्या उद्देशाने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.

उपकरणाची वैशिष्ट्ये 

 • बंदुकीसारखा आकार असलेले ‘तापमान मापक यंत्र’ यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
 • उपकरणाच्या उत्पादनाची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे, जे बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणांपेक्षा खूपच कमी आहे.
 • उपकरण 02 डिग्री सेल्सिअस एवढ्या रेजोल्यूशनने तापमान मोजते. त्यात LED डिस्प्ले आणि इन्फ्रारेड सेन्सर बसविण्यात आले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – देशाचा विकासदर येईल ४ टक्क्यांवर

 • करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत.
 • आशियाई विकास बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर चार टक्क्यापर्यंत घसरण्याचे भाकीत वर्तवले आहे.
 • देशात आधीपासूनच मंदीसदृश्य स्थिती असताना आता करोना व्हायसरच्या संकटामुळे त्यात आणखी भर पडली आहे. आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. करोना व्हायरसमुळे लोकांच आयुष्य विस्कळीत झालं आहे.
 • जगभरातील व्यवसाय, व्यापाराला फटका बसला आहे असे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणाले.
 • COVID-19 भारतात मोठया प्रमाणावर पसरलेला नाही. भारतात COVID-19 चा फैलाव झालेला नाही असेही ते यावेळी म्हणाले.
 • २०२०-२१ मध्ये भारतात जीडीपी चार टक्क्यांपर्यंत घसरेल असे आशियाई विकास बँकेचे भाकीत आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – ओडिशा सरकारचा ‘मो प्रतिवा’ कार्यक्रम

 • संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या सहकार्याने ओडिशा सरकारने ‘मो प्रतिभा’ नावाचा एक नवा कार्यक्रम सादर केला आहे.
 • हा ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विविध कल्पनात्मक कार्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. घरातूनच संगणकांच्या माध्यमातून भाग घेता येणार आहे.
 • स्पर्धांमध्ये घोषवाक्य लेखन, विविध कला, लघुकथा लेखन, भित्तिपत्रिका आणि काव्य लेखन अश्या कला-कौशल्यांचा समावेश आहे.
 • या स्पर्धांमध्ये 5 ते 18 वर्ष या वयोगटातले विद्यार्थी भाग घेऊ शकतात. विजेत्यांना वयानुसार तीन गटांमध्ये विभाजित केले जाणार आहे. विजेत्यांबरोबरच इतर भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहेत.
 • या स्पर्धा दोन संकल्पनांवर आधारित आहेत – (i) संचारबंदीच्या काळात घरी राहणे आणि (ii) कोविड-19 महामारीच्या काळात तरुण नागरिक म्हणून माझी जबाबदारी

 # Current Affairs


चालू घडामोडी – IRDAI संस्थेनी ‘आरोग्य संजीवनी विमा’मध्ये कोविड-19 खर्चाला समाविष्ट केले .

 • भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाने (IRDAI) “आरोग्य संजीवनी” या मानक आरोग्य विम्याच्या अंतर्गत कोविड-19 मुळे येणारा रुग्णालयाचा खर्च आता समाविष्ट करण्यात येणार आहे असे निर्देश सर्व 29 सामान्य / आरोग्य विमा कंपन्यांना दिलेत.
 • तसेच IRDAIने सर्व 29 सामान्य / आरोग्य विमा कंपन्यांसाठी संजीवनी उत्पादनाला मान्यता दिली आह

योजनेविषयी :

 • 1 लक्ष ते 5 लक्ष रुपयांपर्यंत आरोग्य कवच प्रदान करण्यासाठी जानेवारी 2020 या मदहिन्यात ‘आरोग्य संजीवनी’ नावाच्या नवीन प्रमाणित आरोग्य विम्याची घोषणा करण्यात आली होती.
 • 1 एप्रिल 2020 पासून सुरू झालेल्या या नवीन योजनेचे उद्दीष्ट म्हणजे वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी सुरू केलेल्या बहुविध विमा उत्पादनांच्या अस्तित्वामुळे ग्राहकांमधील संभ्रम दूर करणे आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत IRDAI विमा कंपन्यांना मासिक हप्ता आकारण्याचे स्वातंत्र्य देखील देते. सध्या हा हप्ता प्रत्येक 1 लक्ष रुपयांच्या संरक्षणामागे अंदाजे 1000 रुपये आहे.
 • भारतातल्या सध्याच्या सर्व आरोग्य विमा योजना कोविड-19 मुळे होणारा रुग्णालयाचा खर्च हातळणार.
 • सामान्य विमा कंपन्यांच्या जुन्या योजनांमधून महामारीला वगळण्यात आले आहे.

IRDAI विषयी

 • भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे जी भारतातल्या विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे नियमन करते.
 • त्याची स्थापना ‘विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा-1999’ अन्वये करण्यात आली आणि संस्था 2000 साली कार्यरत झाली. संस्थेचे मुख्यालय हैदराबाद (तेलंगणा) या शहरात आहे.
 • भारतात जीवन विमा व्यवसायाची सुरवात 1818 साली झाली होती, ज्यावेळी कोलकातामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली गेली होती. मात्र कंपनी 1834 साली बंद पडली. त्यानंतर 1829 साली मद्रास इक्विटेबल कंपनीने मद्रास प्रेसिडेंसीमध्ये जीवन-विमा व्यवसाय सुरू केला.
 • 1870 साली ब्रिटीश विमा कायदा लागू करण्यात आला आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये बॉम्बे म्युच्युअल ( 1871), ओरिएंटल (वर्ष 1874) आणि एंपायर ऑफ इंडिया (1897) याची स्थापना झाली.

 # Current Affairs

आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: