चालू घडामोडी : 03 डिसेंबर 2019

91

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 03 December 2019 | चालू घडामोडी : 03 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – एक देश, एक रेशन कार्ड योजनेची 1 जूनपासून अंमलबजावणी 

  • स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची 1 जून 2020 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
  • तर या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.
  • बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
  • तसेच या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.

# Current Affairs


चालू घडामोडी – दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताची 27 पदकांची लयलूट

  • भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत 11 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकांची लयलूट केली आहे.
  • त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 43 पदके जमा आहेत.
  • तर पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर 44 पदके (23 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य) जमा आहेत

# Current Affairs


चालू घडामोडी –  लिओनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले.

  • जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मुकुट अभिमानाने मिरवणाऱ्या बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले.
  • महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेची खेळाडू मेगान रॅपिनोने कारकीर्दीत पहिल्यांदाच या पुरस्काराला गवसणी घातली.
  • तर पॅरिसमधील शॉटलेट थिएटर येथे झालेल्या या सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हर्गिल व्हॅन डिक आणि पोतुर्गाल व युव्हेंटसचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर मात करून हा पुरस्कार पटकावला.
  • तसेच 2019 या वर्षांत अर्जेटिना आणि बार्सिलोना संघाकडून खेळताना मेसीने सर्वाधिक 54 गोल केले आहेत.
  • त्याचप्रमाणे बार्सिलोनाला ला लिगाचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मेसीचा सिंहाचा वाटा होता. मेसीने सर्वाधिक 686 गुण मिळवले,

# Current Affairs


चालू घडामोडी –  ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले

  • इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालणारे विधेयक संसदेने मंजूर केले
  • राज्यसभेने इलेक्ट्रॉनिक सिगरेट बंदी (उत्पादन, उत्पादन, आयात, निर्यात, परिवहन, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरात) विधेयक, चार तासांच्या चर्चेनंतर आवाज मताद्वारे मंजूर केले. 
  • लोकसभेने 27 नोव्हेंबरला मंजूर केलेले हे विधेयक 18 सप्टेंबर रोजी सरकारने आणलेल्या अध्यादेशाची जागा घेईल.
  • विरोधी पक्षातील खासदारांनी मात्र तंबाखू कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून ही बंदी घातली असल्याचा आरोप केला.

तुम्हाला माहित आहे का?

  • इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जून  2019 मध्ये ई-सिगारेटसह इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम (एन्ड्स) वर पूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली होती आणि असे म्हटले होते की धूम्रपान न करणार्‍यांमध्ये निकोटीनचे व्यसन सुरू होते.
  • एंड्स, ज्यात ई-सिगारेट, वेप आणि ई-हुक्का यांचा समावेश आहे, अशी साधने आहेत जी एरोसोल तयार करण्यासाठी द्रावण तापवितात, ज्यात वारंवार स्वाद असतात, सामान्यत: प्रोपालीन ग्लायकोल आणि ग्लिसरीनमध्ये विरघळतात.
  • ई-सिगारेटमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर प्रतिकूल परिणाम होतो, श्वसन रोगप्रतिकारक पेशींचे कार्य आणि वायुमार्ग बिघडू शकते तसेच सिगारेटच्या धूम्रपानाप्रमाणेच आणि श्वसन रोगास गंभीर आजारासाठी जबाबदार आहे. 

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम