Current Affairs : 05 April 2020 | चालू घडामोडी : ०५ एप्रिल २०२०

0 1

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 05 April 2020 | चालू घडामोडी :०५ एप्रिल २०२०


चालू घडामोडी – राष्ट्रीय सागरी दिन: 5 एप्रिल

 • भारत देशात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) पाळला जातो.
 • राष्ट्रीय सागरी दिनाची ही 57 वी आवृत्ती आहे. यावर्षी या दिनानिमित्त भारतीय सागरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना “वरुण” नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिनाची पार्श्वभूमी

 • एस. एस. लॉयल्टी’ या भारताच्या स्वतःच्या पहिल्या वाफेवर चालणार्‍या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास तयार केला होता. या घटनेच्या स्मृतीत हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रथम राष्ट्रीय सागरी दिन 1964 साली पाळण्यात आला.
 • भारताला सुमारे 7516 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. देशात केंद्र सरकारच्या नियंत्रणात एकूण 182 बंदरे आहेत, त्यापैकी ‘मेजर पोर्ट’ हा विशेष दर्जा असलेली 12 बंदरे आहेत. ही बंदरे भारतीय बंदरे अधिनियम-1908 अन्वये प्रशासित केली जाते. मेजर पोर्ट ट्रस्ट अधिनियम-1963 हे मेजर पोर्टमध्ये प्रशासकीय कार्यचौकट निश्चित करते.
 • भारतात आज 12 जलवाहतुक कंपन्या असून त्यांच्याकडे 1401 जहाजे आहेत, ज्याद्वारे जवळपास 69 दशलक्ष टन मालाची वाहतूक होते.

# Current Affairs


चालू घडामोडी – आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताची दावेदारी 

 • २०२७ साली एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवण्यासाठी भारताने आपली निविदा सादर केली आहे.
 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली आहे.
  भारताने ही बोली जिंकल्यास, आशिया खंडातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच आयोजित केली जाईल.
 • ‘‘ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे आम्ही आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी)आम्ही कळवले आहे.
 • भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, पण एकदाही या स्पर्धेचे आयोजन के ले नाही.
 • २०२७च्या आशियाई चषकासाठी उत्सुक असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे.
 • भारताने २०२३च्या ‘एएफसी’ आशियाई स्पर्धेच्या यजमानपदासाठी थायलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह बोली लावली होती, पण ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने माघार घेतली.
 • त्यानंतर थायलंड आणि दक्षिण कोरियानेही माघार घेतल्यामुळे या शर्यतीत चीन हा एकमेव देश राहिला होता.
 • आता २०२७च्या ‘एएफसी’ आशियाई चषकाच्या आयोजनासाठी भारतासह दक्षिण कोरियाही शर्यतीत असण्याची शक्यता आहे.
 • भारताने आतापर्यंत २०१७च्या कुमार विश्वचषक तसेच २०२०च्या कुमारी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवले आहेत. तसेच २०२२ मध्ये महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषकाचे यजमानपदही भारताने मिळवले आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी –   जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला.

 • जगभरातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे.
 • त्यामुळे, मानसांसह आता प्राण्यांमध्येही कोरोनाच धोका निर्माण झाला आहे.
 • चीनमधील वुहान शहरातूनच डिसेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला होता, असे अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
 • मात्र, आता फक्त माणसांनाच नाही तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आहे.
 • नॅशनल जॅग्रॉफीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे.
 • अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे.
 • ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे.
 • या कर्मचाऱ्याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघ त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटीव्ह झाला.
 • या वाघिणीचं नाव नाडिया असून गेल्या १६ मार्चपासून हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
 • त्यामुळे या वाघिणीच्या संसर्गातून पर्यटकांना लागण झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘बॉण्डगर्ल’ ऑनर ब्लॅकमॅनचं निधन

 •  जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘गोल्डफिंगर’ यातील बॉण्ड गर्ल अर्थात अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं निधन झालं आहे.
 •  मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ‘जेम्स बॉण्ड’ या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.
 •  या सीरिजमधील जेम्स बॉण्ड हे पात्र जसं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. त्याचप्रमाणे यातील ‘बॉण्डगर्ल’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: