चालू घडामोडी : 04 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 05 Februar 2020 | चालू घडामोडी : 05 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – फेसबुक 16 वर्षांचं झालं

 • फेसबुक हे समाजमाध्यमांवरील व्यासपीठ आता जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. मार्क झुकेरबर्गने स्थापन केलेल्या फेसबुकला आज 16 वर्ष पूर्ण झाली आहेत.

 अशी झाली स्थापना :

 •  हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.
 • फेब्रुवारी 4, 2004 रोजी जकरबर्गने आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात खोलीतून फेसबुक लाँच केले.
 •  त्याच्या महाविद्यालयीन खोलीत आणि हार्वर्डमधील विद्यार्थी एडुआर्डो सेव्हरिन, अँड्र्यू मॅककुलम, डस्टिन मॉस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युजेस यांनी त्यांची मदत केली.
 •  त्यानंतर गटाने इतर कॉलेज कॅम्पसमध्ये फेसबुकची ओळख दिली. 2012 पर्यंत फेसबुकने एक अब्ज लोक पोहोचले होते.

 फेसबुकविषयीच्या आश्चर्यकारक गोष्टी :

 •  फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग केवळ निळाच रंग व्यवस्थितरित्या पाहू शकतात. त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे, म्हणून फेसबुकचा रंग निळा आहे.
 •  फेसबुककडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 5 सेंकदाला 5 नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात.
 • फेसबुकचे जगभरात कितीतरी अब्ज युजर्स आहेत. मात्र चीन आणि उत्तर कोरियामध्ये फेसबूकवर बंदी आहे.
 •  फेसबुकवर वापरकर्ते नावडत्या व्यक्तीला ब्लॉक करू शकतात. मात्र मार्क झुकेरबर्ग यांना कुणीही ब्लॉक करू शकत नाही.
 •  जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट आहे व त्याचा मृत्यू झाला असेल. तर याबाबत फेसबुकला सुचना देण्यात येते.

# Current Affairs


चालू घडामोडी – आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वेलनेस सेंटर

 • आयुष्मान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर अंतर्गत दीड लाख उपआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डिसेंबर 2022 पर्यंत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यात येत आहे.
 • 2018-19 या वित्तीय वर्षापर्यंत 40,000 हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरना परवानगी द्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
 • मात्र प्रत्यक्षात 62,000 पेक्षा जास्त मंजूऱ्या देण्यात आल्या.
 •  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यासह ही केंद्रे बळकट करण्यासाठी तंत्रविषयक आणि वित्तीय सहाय्यता पुरवली जाते.
 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

# Current Affairs


चालू घडामोडी – ऑपरेशन व्हेनिला’: मादागास्करमध्ये भारतीय नौदलाची मानवतावादी मोहीम

 •  मादागास्करमध्ये आलेल्या ‘डियाने’ चक्रीवादळानंतर चालविलेल्या ‘ऑपरेशन व्हेनिला’ या मोहिमेच्या अंतर्गत तिथल्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऐरावत’ जहाज पाठवले गेले आहे.
 • 1 जानेवारी 2020 रोजी भारताने जीवनावश्यक साहित्य मादागास्करच्या अधिकार्‍यांकडे सोपवल्या. जहाजावरील वैद्यकीय पथकाने स्थानिक अधिकार्‍यांच्या सहकार्याने 01 आणि 02 फेब्रुवारी रोजी अंतसिरानाना या शहरात वैद्यकीय शिबिर घेतले.

 ठळक बाबी

 •  सेशेल्सकडे मार्गक्रम करणार्‍या भारतीय जहाजाला विंनतीवरून या बेटराष्ट्राकडे वळविण्यात आले होते.
  सूचना मिळतास मदतीसाठी पोहचणारा पहिला परकीय देश म्हणून भारत ठरला आहे.
 •  मादागास्करसंदर्भात भारताने दिलेली मदत ही भारताच्या ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन (SAGAR)’ या दृष्टीकोनातून भारतीय नौदलाच्या परराष्ट्र सहकार्य पुढाकार’च्या अनुषंगाने आहे.
 •  मादागास्कर हा इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) या आंतर-सरकारी संघटनेचा सदस्य देखील आहे.
 • हिंद महासागर क्षेत्रात येणार्‍या संकटकालीन परिस्थितीला प्रतिसाद देणारा पहिला म्हणून भारतीय नौदल उदयास आले आहे.
 •  INS ऐरावत हे एक उभयचर लढाऊ जहाज आहे. हे जहाज मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) मोहिमेचा देखील एक भाग आहे, हे आवश्यक मदत साहित्य वाहून नेते.

मादागास्कर देश

 • मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतला एक द्वीप-देश आहे. हे जगातल्या सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. या देशाच्या चारही बाजूंना हिंद महासागर आहे.
 • राजधानी – अंतानानारिव्हो
 • अधिकृत भाषा – मालागासी, इंग्लिश, फ्रेंच
 • राष्ट्रीय चलन – मालागासी एरियरी

# Current Affairs


चालू घडामोडी – ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाकडून उपाययोजना

 • ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीला आळा घालून वापरकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.
 • फोनफ्रॉड अर्थात फोनद्वारे होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आंतर मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, वित्तीय सेवा, दूरसंचार विभाग, रिझर्व्ह बँक, यांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे. असे घोटाळे टाळण्यासाठी 12 फेब्रुवारी 2018 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सूचनावली जारी करण्यात आली. www.mha.gov.in या संकेतस्थळावर या सूचना उपलब्ध आहेत.
 • डिजिटल, इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या सुरक्षिततेसंदर्भात रिझर्व्ह बँकेने अनेक परिपत्रकं, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृतीसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
 • केंद्र सरकारनेही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in सुरु केले असून, यावर ऑनलाईन आणि नेटद्वारे होणारे घोटाळे आणि फसवणुकीच्या तक्रारी नोंदवता येताता, असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा