चालू घडामोडी :10 डिसेंबर

108

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 10 December 2019 | चालू घडामोडी : 10 डिसेंबर 2019

चालू घडामोडी –  मुंबई  सेंट्रल ठरले देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक

  • मुंबई  सेंट्रल हे देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक ठरले आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन अशा विविध पातळ्यांवर देशातील पहिले ‘इट राइट’ (खाण्यासाठी योग्य) स्थानकाचा मान मुंबई सेंट्रलला मिळाला आहे.
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.
  • तयाला 4 स्टारचे रेटिंग मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
  • भारतीय रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यासाठी एफएसएसएआयने ‘इट राइट स्थानक’ हे अभियान सुरू केले आहे.
    या अभियानांतर्गत ‘इट हेल्दी’ आणि ‘इट सेफ’ अशा दोन टप्प्यांत स्थानकाचे आॅडिट करण्यात येते. या अभियानात मुंबई सेंट्रल हे एकमेव स्थानक सहभागी झाले होते.
    देशातील अन्य कुठलेही स्थानक अद्याप या अभियानात सहभागी झालेले नाही.
  •  अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन आदींचे आॅडिट करून स्थानकाला देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक म्हणून घोषित करण्यात आले.

# Current Affairs


चालू घडामोडी – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन

यावर्षी, हा दिवस ‘युनायटेड अगेन्स्ट करप्शन फॉर डेवलपमेंट, पीस अँड सेक्युरिटी‘ संकल्पनेखाली साजरा केला गेला. याशिवाय, जगभरात “युनायटेड अगेन्स्ट करप्शन” या नावाने एक जागतिक मोहीम चालवली जात आहे.

भ्रष्टाचार म्हणजे काय?

  • भ्रष्टाचार ही एक किचकट सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाब आहे जी सर्व देशांवर नकारात्मक परिणाम करते. भ्रष्टाचार लोकशाही संस्थेची अधोगती करते, आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेला हातभार लावते.
  • कर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात करण्यात आला आहे. न्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरीबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

  • 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक दिवस पाळण्यासाठी यासंबंधीचा ठराव मंजूर केल्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
  • परत्येक वर्षी एक लक्ष कोटी (महादम / ट्रिलियन) डॉलर एवढी लाच जगभरात दिली जाते, तर अंदाजे 2.6 महादम डॉलरचा भ्रष्ट व्यवहार होतो. ही रक्कम जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
  • सयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्यानुसार, विकसनशील देशांमध्ये, भ्रष्टाचाराचा निधी हा अधिकृत विकास सहाय्याच्या 10 पटीने अधिक आहे.
  • भारतात ‘भारतीय दंडविधान संहिता 161’ यामध्ये भ्रष्टाचारविरोधी तरतूद आहे. त्याच्या अनुषंगाने ‘भ्रष्टाचारविरोधी कायदा-1988’ तयार करण्यात आला.

# Current Affairs


चालू घडामोडी – पंतप्रधान नरेंद्र मोदीचं  २०१९ मधील ‘गोल्डन ट्विट

  • सोशलमीडियावर सतत अपडेट असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणीदेखील आपली बाजी मारली आहे.
  • कारण त्यांचे या वर्षातील एक ट्‌विट हे गोल्डन ट्‌विट म्हणून प्रसिद्ध झाले आहे. 2019 हे वर्ष ‘लोकसभा इलेक्‍शन 2019’ या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले.
  • लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे ट्‌वीट या वर्षाचे गोल्डन ट्‌वीट ठरले आहे.
  • या ट्‌वीटला एक लाख 17 हजार 100 रीट्‌वीट, तर तब्बल चार लाख 20 हजार लाइक्‍स मिळाले.
  • क्रीडा विभागात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्‌वीट सर्वाधिक रीट्‌वीट झाले, तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडनं आपले अव्वल स्थान कायम ठेवलं. विजय या अभिनेत्यानं ‘बिगिल’ या चित्रपटाबाबत कलेलं ट्‌वीट सर्वाधिक रीट्‌वीट झालं.
  • विराट कोहलीच्या व्‌टिला 45 हजार 100 रीव्‌टि आणि चार लाख 12 हजार लाइक्‍स मिळाले. ‘लोकसभा निवडणूक’ आणि ‘चांद्रयान 2’सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर ‘पुलवामा’, ‘आर्टीकल 370’ हे विषयही ट्रेंडिंग राहिलं.

# Current Affairs


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम