चालू घडामोडी : 13 जानेवारी 2020

0 14

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :13 January 2020 | चालू घडामोडी : 13 जानेवारी 2020

चालू घडामोडी – ऑस्करची नामांकने जाहीर

 • टॉड फिलिप्सच्या ‘जोकर’ला सर्वाधिक ११
 • जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ९२व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे.
 • कवेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’,
  मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि
  सम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर झाली आहेत.
 • दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.
 • चित्रपट : वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड, जोकर, दी आयरिशमॅन, पॅरासाइट, १९१७, मॅरेज स्टोरी, जोजो रॅबिट
 • अभिनेत्री : रिनी झेलवेगर, चार्ीझ थेरॉन, स्कार्लेट जोहान्सन, साओइर्स रोनन, सिन्थिया इरिव्हो.
 • अभिनेता : जोकीन फिनिक्स, अ‍ॅडम ड्रायव्हर, लिओनार्दो डिकॅप्रिओ, अ‍ॅण्टोनिओ बॅण्डेरस, जोनाथन प्रीस.
 • दिग्दर्शन : मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेण्टिन टॅरॅण्टिनो, बोंग जून-हो, सॅम मेंडिस, टॉड फिलिप्स.

# Current Affairs


चालू घडामोडी – नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ

 • 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 • कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”
 • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्‍या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.
 • तसेच इराण, डन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भतान, दक्षिण आफ्रिका, झक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.
 • यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे.
 • परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550 प्रतिनिधी भाग घेणार आहेत.
 • कार्यक्रमाविषयी
 • ‘रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे.
 • 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.
 • “रायसीना” हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.
 • हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्‍या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.

# Current Affairs


चालू घडामोडी – परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

 • फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
 • लाहोरच्या उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.
 • लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱ्या विशेष न्यायालयालाच असंवैधानिक म्हटले आहे.
 • त्यामुळे, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे.
 • राष्ट्रपती असताना 2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केली होती.
 • यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता.

# Current Affairs


चालू घडामोडी – काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी ड्रेस कोड

 • वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
 • यांना ड्रेसकोड लागू बाबा विश्वनाथ यांचे विशेष कपड्यांमध्येच दर्शन घेता येणार आहे. पण केवळ स्पर्श दर्शन करणाऱ्या भक्तांसाठीच हा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
 •  स्पर्श दर्शन न करणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड आवश्यक नसणार आहे. पॅन्ट, शर्ट, जीन्स असे कपडे घातलेले भक्त दुरुनच दर्शन घेऊ शकतात.
 •  ड्रेसकोड : या नव्या नियमानुसार, काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करणाऱ्या महिलांसाठी साडी हा ड्रेस कोड असणार आहे. तर पुरुषांसाठी धोती-कुर्ता घालणे अनिवार्य असेल.
 •  हा नवा ड्रेस कोड कधीपासून सुरु करण्यात येणार याबाबत सांगण्यात आले नाही.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: