चालू घडामोडी : 15 जानेवारी 2020

0 14

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 15 January 2020 | चालू घडामोडी : 15 जानेवारी 2020

चालू घडामोडी – मायकेल पात्रा RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

 • रिझर्व्ह बँकेने मायकेल पात्रा यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेतील.
 • IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या पात्रा यांनी २००५ पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करत आहेत. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत. १९८५ मध्ये ते रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले.
 • मायकेल पात्रा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य आहेत. विकासाला चालना देण्यासाठी पतधोरणात व्याजदर कपातीचे पात्रा यांनी समर्थन केले आहे.
  विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला असून येत्या २३ जुलै रोजी आचार्य यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारतील. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहतील. रिझर्व्ह बँकेत विविध विभागात तब्बल ३५ वर्षे काम करण्याचा मायकेल पात्रा यांना अनुभव आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – जगातील सर्वात लोकप्रिय १०० डेस्टिनेशन शहरांच्या यादीत दिल्ली ८ व्या स्थानावर

 • यरो मॉनिटर इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या २०१९ मधील जगातील सर्वात १० लोकप्रिय डेस्टिनेशन शहरांमध्ये दिल्लीला ८ वे स्थान मिळाले आहे .
 • २०१८ मध्ये दिल्ली ११ व्या स्थानावर होती .
 • सलग तिसऱ्या वर्षी ( २०१७ , २०१८ व २०१९ ) हाँगकाँग या यादीत प्रथम स्थानी आहे .
 • लोकप्रिय १०० डेस्टिनेशन शहरांमध्ये भारतातील ७ शहरांचा समावेश आहे.
 • २०१९ मध्ये दिल्लीला जवळपास १५ . २ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली आहे.
 •  सर्वात लोकप्रिय १० डेस्टिनेशन शहरेः १ ) हाँगकाँग २ ) बँकॉक ३ ) मकाऊ ४ ) सिंगापूर ५ ) लंडन ६ ) पॅरिस ७ ) दुबई ८ ) दिल्ली ९ ) इस्तंबूल १० ) क्वालालंपूर .

# Current Affairs


चालू घडामोडी – राजस्थानात ‘घुंघट हटाव’ मोहीम

 •  राजस्थानात या महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत मतदानासाठी येणाऱ्या महिलांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा दूर सारावी, यासाठी त्यांना उद्युक्त करण्यात येणार आहे.
 •  महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ‘घुंघट हाटव’ मोहिमेअंतर्गत महिलांमध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे.
 • राजस्थानच्या ग्रामीण भागांत महिलांमध्ये अजूनही डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. राजस्थानचे मुख्यमुंत्री अशोक गेहलोत यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात घुंघट आणि बुरखा प्रथेचे निर्मूलन करण्यात यावे, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.
 • सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून, यासाठी तळागाळातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
 • आमचे तळागाळातील कार्यकर्ते, साथीन, महिला बचतगटांतील सदस्य आणि स्थानिक महिला दरशुक्रवारी विविध विषयांवर बैठक घेत असतात. अशा बैठकांमध्ये दरमहिन्याच्या एका शुक्रवारी ‘घुंघट’च्या मुद्द्यावर चर्चा केली जाते,’ असे महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘चौपाल रात्री’मध्येही ‘घुंघट हटाव’चा संदेश दिला जातो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

# Current Affairs


चालू घडामोडी – ए. पी. माहेश्वरी: CRPF चे नवे महानिदेशक

 • केंद्रीय  IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • उत्तरप्रदेश संवर्गातून 1984च्या तुकडीचे IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत.
 • 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.
 • केंद्रीय  राखीव पोलीस दल (CRPF)
 • केंद्रीय  राखीव पोलीस दल (CRPF) याची स्थापना ‘क्राऊन रिप्रेझेंटेटीव्ज पोलीस’ या नावाने 27 जुलै 1939 रोजी झाली.
 • नक्षलविरोधी कारवाई आणि जम्मू व काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी कारवाया यांची जबाबदारी असलेले देशातले आघाडीचे अंतर्गत सुरक्षा दल आहे. त्यात 3.25 लक्षहून अधिक सैनिकांसह हे दल जगातले सर्वात मोठे निमलष्करी दल ठरते.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: