चालू घडामोडी : 16 जानेवारी 2020

0 5

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 16 January 2020| चालू घडामोडी :16 जानेवारी 2020

चालू घडामोडी –पुणे: ‘आनंदी गोपाळ’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट 

 • पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.
 • या चित्रपटाला गुरुवारी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला.
 • आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ट्युनिशियाच्या ‘अ सन’ या चित्रपटाने प्रथम येण्याचा मान मिळवून ‘प्रभात’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट म्हणूनही या चित्रपटाने मान मिळवला.
 • नऊ जानेवारीपासून सुरू असलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) सांगता गुरुवारी झाली. महोत्सवादरम्यान विविध देशांमधून आलेल्या ज्युरींनी १९१ चित्रपटांचे परीक्षण करून विजेते घोषित केले.
 • त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विभागात ट्युनिशियाचा ‘अ सन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला.
 • रशियन चित्रपट ‘ह्युमरिस्ट’ या चित्रपटाला लेखनासाठीच्या स्पेशल ज्युरी सन्मानाने गौरवण्यात आले.
 • मराठी विभागात ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाप्रमाणे अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ आणि सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटांनीही चांगले यश मिळवून महोत्सवातील विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
 • आनंदी गोपाळ चित्रपटाचा मुख्य अभिनेता ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘वाय’ चित्रपटातील अभिनेत्री मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

# Current Affairs


चालू घडामोडी – इस्रोकडून GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणारं 

 •  भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
 • इस्रोने दिलेल्या माहितीनुसार जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं आज यशस्वी उड्डाण केलं आहे.
 • GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे.
 • यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.
 • विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवण्यासाठीह या उपग्रहाची मदत होणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  12 जानेवारी 2020 रोजी पाळलेल्या ‘राष्ट्रीय युवा दिन’ची संकल्पना

 “चॅनेलाइजिंग युथ पॉवर फॉर नेशन बिल्डिंग”.

# Current Affairs


चालू घडामोडी – ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवन गौरव पुरस्कार’जाहीर.

 • ‘कविता लिहितो म्हणून मी आहे’ असे ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात, तेव्हा ते म्हणणे फक्त कवितेपुरते नसते. अभिव्यक्तीचा व्यापक पैस त्यामागे असतो. कवितांतून अभिव्यक्तीच्या या अस्तित्वखुणा पेरणाऱ्या डहाकेंना नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून उद्या- रविवारी पुण्यातील समारंभात तो वितरित करण्यात येणार आहे.
 • ‘आपल्या अस्तित्वाच्या तुकडय़ातुकडय़ांचे काम करीत, भाषेच्या सडसडण्याचा आवाज ऐकणे, याशिवाय दुसरे काहीच नव्हते करण्यासारखे..’ असे म्हणत डहाके साठच्या दशकापासून लिहिते आहेत.
 • सरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती १९६६ साली..
 • ‘सत्यकथे’तल्या एका अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘योगभ्रष्ट’ या त्यांच्या दीर्घ कवितेने! साठच्या दशकातील अस्वस्थ तरुणाईच्या मनातील कल्लोळ टिपणारी ही कविता होती.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: