MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Current Affairs : 20 April 2020 | चालू घडामोडी : २० एप्रिल २०२०

110

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 April 2020 | चालू घडामोडी : २० एप्रिल २०२०

चालू घडामोडी – 

तेलंगणमध्ये ७ मे पर्यंत लॉकडाउन; ऑनलाइन फूड डिलिव्हरीवरही बंदी : 
 • देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे. परंतु या निर्णयानंतर आता तेलंगण सरकारनं लॉकडाउनचा कालावधी वाढवत राज्यात ७ मे पर्यंत लॉकडाउन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 • तेलंगणमध्ये विदेशातून आलेल्या ६४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तसंच दिल्लीतील निजामुद्दीन स्थित मरकजमध्ये सामिल झालेल्या लोकांच्या प्रवासाचा इतिहासही आम्ही शोधत आहोत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.
 • दरम्यान, ७ मे पर्यंत राज्यात वाढवण्यात आलेल्या लॉकडाउनचं अतिशय कठोररित्या पालन केलं जाईल याची काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सर्वाधिक बळी अमेरिकेत, जगातील करोनाग्रस्त मृत्यूची संख्या एक लाख ६५ हजार : 
 • करोनामुळे जगभरात रविवापर्यंत १ लाख ६५ हजार ०५४ जणांचा मृत्यू झाला असून १९३ देशांमध्ये २४ लाख ०६ हजार ८२३ हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे, त्यापैकी पाच लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
 • वल्डोमीटर वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील मृतांची संख्या ४० हजारांच्या पार गेली आहे. तर सात लाख ३५ हजार २८७ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर किमान ६६ हजार ८१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
 • इटलीमध्ये आतापर्यंत २३ हजार २२७ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ७५ हजार ९२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये २० हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ९५ हजार ९४४ जणांना लागण झाली आहे. फ्रान्समध्ये १९ हजार ३२३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ५१ हजार ७९३ जणांना लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये १५ हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख १४ हजार २१७ जणांना लागण झाली आहे.
 केंद्र सरकारचा यू टर्न; ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले :
 • करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा सांगितलं होतं.
 • त्यानंतर १५ एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जारी करताना त्यात फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसह ई-कॉमर्स कंपन्या सर्व ईलेक्ट्रिल वस्तुंसह इतर साहित्याची विक्री करण्यास परवानगी दिली होती. मात्र, चार दिवसांत केंद्रानं यू टर्न घेतला असून, केवळ जीवनाश्यक वस्तु आणि औषधांचीच विक्री करता येईल, असं म्हटलं आहे.
 • लॉकडाउनच्या काळात २० एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या आस्थापनाबाबत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी नव्यानं आदेश जारी केले आहेत. त्यात ई-कॉमर्स कंपन्यांच्या यादीतून अत्यावश्यक नसलेल्या वस्तू वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान, १५ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आदेशात २० एप्रिलापासून ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. यात मोबाईल फोन, टिव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप, कम्प्युटर, रेडिमेड गारमेट, शाळेतील मुलांना लागणारी स्टेशनरी आदींची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.
करोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल :
 • मुंबई: करोनाविरोधातील लढाईत जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे असताना बहुतेक राज्ये अजूनही फारशी गंभीर नसल्याचेच दिसते. मात्र करोनाची चाचणी करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. १८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक ५९ हजार १५७ चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानचा क्रमांक असून त्यांनी ४२ हजार ७१८ चाचण्या केल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातने ३० हजार ७३८ चाचण्या केल्या आहेत.
 • पंतप्रधानांच्या भाषणानंतरही देशातील अनेक राज्ये गंभीर नसल्याचे चित्र ‘आयसीएमआर’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. १८ एप्रिल सकाळी आठ वाजेपर्यंतची आकडेवारी ‘आयसीएमआर’ने जाहीर केली आहे. मागील चार आठवडय़ांत देशातील कोणत्या राज्यांनी किती चाचण्या केल्या हे यात नमूद केले आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक चाचण्या केल्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त दिसत आहे.
 • देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये फक्त २६ हजार ९२० चाचण्या करण्यात आल्या तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फक्त २० हजार १४९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. केवळ सात राज्यांमध्ये २० हजारांहून अधिक करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आंध्र प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक व तेलंगणात तुलनेत कमी चाचण्या करण्यात आल्या आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये केवळ सहा हजार ९८६ लोकांच्याच करोना चाचणी करण्यात आली असून लक्षद्वीप येथे केवळ सात जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आज १४ हजार ३७८ रुग्ण करोनाबाधित असून एकटय़ा महाराष्ट्रात तीन ६४८ रुग्ण करोनाबाधित आहेत.
देशभरात आजपासून ‘या’ सेवा सुरु, ही पहा पूर्ण यादी :
 •  रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन, औषध उपचार विषयक विक्री व पुरवठा करणारी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने-रुग्णालय-औषध विक्री ठिकाणे, रुग्णवाहिका व रुग्णवाहिकेशी संबंधित बाबी, औषध गोळ्या निर्मितीशी संबंधित बाबी, मत्स्योत्पादन, रुग्णालय वा वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम इत्यादी बाबींचा समावेश आहे.
 •  महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या बाबींशी संबंधित खाती व तेथील संबंधित कर्मचारीवर्ग,
 •  बँक, सेबी, इन्शुरन्स
 •  वृद्धाश्रम, महिला आश्रम, बालकाश्रम, अनाथ आश्रम, निरीक्षण गृह इत्यादींचे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी
 • पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी इत्यादी इंधन विषयक बाबींशी संबंधित
 •  दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आवश्यक त्या वस्तूंची मालवाहतूक
 •  प्रसारमाध्यम, केबल सर्विसेस, डायरेक्ट टू होम, डेटा व कॉल सेंटर इत्यादींशी संबंधित बाबी. हे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवणे अपेक्षित.
 • किराणा दुकान, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, रेशन दुकान इत्यादी.
 •  ई-कॉमर्स विषयक बाबी
 • गॅरेज आणि धाबे – ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरु करण्यास परवानगी.
 • ५० टक्के कर्मचाऱ्यांसहित आयटी आणि आयटीसंबंधित सेवा
 • कमीत कमी मनुष्यबळासहित डेटा आणि कॉल सेंटर्स 

  # Current Affairs


  ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

  अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

  आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

   

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: