MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Current Affairs : 21 April 2020 | चालू घडामोडी : २१ एप्रिल २०२०

125

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 April 2020 | चालू घडामोडी : २१ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – 

“ही तर सुरुवात आहे, खरा विनाश तर अजून दिसायचाय”; WHO चा धोक्याचा इशारा :
 • करोनाने जगभरात थैमान घातला असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असं सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही.
 • जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.  “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.
 • आशिया आणि युरोपातील काही देशांनी करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. यामुळे शाळा, उद्योग सुरु करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तसंच क्वारंटाइन होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन : 
 • ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच (वय ९५)   यांचे नुकतेच निधन झाले.  १६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.
 • चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल यांनी डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते. त्यांनी काही लोकप्रिय अ‍ॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले.
 • त्यात, पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश होता. त्यांनी टॉम अँड जेरीच्या १३ भागांचे दिग्दर्शन केले. ‘पॉपिये द सेलर’ मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते. १९५९ मध्ये ते प्राग येथे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले असता झडेन्का हिच्या प्रेमात पडले, तिच्याशी विवाह करून ते प्राग येथे स्थायिक झाले.
 • डाइच यांना उत्कृष्ट लघु अ‍ॅनिमेशनपटासाठी १९६० मध्ये मुन्रोच्या रूपाने ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच प्रवर्गात त्यांना १९६४ मध्ये ‘हिअर इज नुडिक’ व ‘हाउ टू अ‍ॅव्हॉइड फ्रेंडशिप’ या अ‍ॅनिमेशनपटांसाठी नामांकन मिळाले होते. ‘सिडनीज फॅमिली ट्री’ या मालिकेचे ते सह निर्माते होते त्यासाठी त्यांना १९५८ मध्ये ऑस्कर नामांकन मिळाले होते.
अमेरिकेच्या सीमा जगासाठी तात्पुरत्या बंद; ट्रम्प यांचा निर्णय :
 • करोना विषाणूचा जबरदस्त फटका बसलेला अमेरिका आता कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर तात्पुरती बंदी घालण्याच्या तयारीत आहे. “अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार” असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली.
 • “अदृश्य शत्रूकडून झालेल्या हल्ल्यामुळे आमच्या महान अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेता, मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करेन!” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 • ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा तपशील अद्याप मिळालेला नाही. तसेच, त्या आदेशावर कधी स्वाक्षरी करणार याबाबतही ट्रम्प यांनी काही माहिती दिलेली नाही.
देशभरात चोवीस तासांत ४७ मृत्यू, १ हजार ३३६ नवे रुग्ण : 
 • जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने 47 जणांचा बळी घेतला असून, 1 हजार 336 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील एकूण करोनाची रुग्ण संख्या 18 हजार 336 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 14 हजार 759, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले 3 हजार 252 व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 590 जणांचा समावेश आहे.
 • करोना व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रूग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज रूग्णांच्या संखेत वाढ होत असतानाच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 80 टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत.
 • आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास 80 टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.

   

   

  # Current Affairs


  ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

  अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

  आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

   

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: