Current Affairs : 22 April 2020 | चालू घडामोडी : २२ एप्रिल २०२०

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 22 April 2020 | चालू घडामोडी : २२ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – 

देशभरात चोवीस तासांत ५० मृत्यू, १ हजार ३८३ नवे रुग्ण :
 • जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत करोनाने देशभरात 50 बळी घेतले असून, 1 हजार 383 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. यामध्ये रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले 3 हजार 870 तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 640 जणांचा अहवाल आहे.
 • करोनामुळे जगभरात आतापर्यंत एक लाख ७० हजार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये युरोपमधील एक लाख सहा हजार ७३७ जणांचा समावेश आहे.
 • अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४२ हजार ३६४ जणांचा, इटलीमध्ये २४ हजार ११४ जणांचा, स्पेनमध्ये २१ हजार २८२ जणांचा, फ्रान्समध्ये २० हजार २६५ जणांचा आणि ब्रिटनमध्ये १६ हजार ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६  इतकी आहे.
करोना व्हायरस मानवनिर्मित; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा दावा :
 • सध्या करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. सर्वच देश करोनाशी लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच चीन आणि अमेरिका हे देश एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी एक खबळजनक दावा केला आहे. करोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 • फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी करोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा खबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेला दावा नक्कीच हैराण करणारा आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर संपूर्ण कल्पना येऊ शकते. कोविड-१९मध्ये एचआयव्हीचे एलिमेंट सापडले आहेत. तसंच त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट सापडले असल्याचे ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी सांगितलं. यावरून हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचं सिद्ध होतं. तसंच या व्हायरसचा जन्म प्रयोगशाळेत करण्यात आला असून तो मानवनिर्मित व्हायरस आहे, असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील सीन्यूझ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.
 • एड्सच्या प्रसार करणाऱ्या व्हायरसवर लस तयार करण्याच्या निमित्तानं हा घातक व्हायरस तयार करण्यात आल्याचं ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. यामुळेच करोना व्हायरसच्या जिनोममध्ये एचआयव्हीचे काही एलिमेंट्स सापडले आहेत. याव्यतिरिक्त त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट्स असण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता :
 • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीच्या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
 • गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करून तो १७ वरून २१ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारला मिळणाऱ्या महसूलाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय लाबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती एनडीटीव्हीला सूत्रांकडून देण्यात आली.
यादी व्हॉट्सअ‍ॅप करा किराणा माल आणि भाजी घरपोच मिळवा; कर्नाटक सरकारची नवी हेल्पलाइन :
 • कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मंगळवारी राज्यामध्ये एका हेल्पलाइन सेवेचे उद्घाटन केले. लोकांनी लॉकडाउनच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ घरी थांबावे आणि किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी करु नये या उद्देशांतून ही हेल्पलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाइन सेवेच्या माध्यमातून नागरिकांना किराणा मालाचा सामान घरी आणून दिले जाणार आहे. फोनवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर किराणा मालाची यादी पाठवल्यास सामान घरपोच दिले जाईल. यासाठी कर्नाटक सरकारने ०८०६१९१४९६० हा क्रमांक जारी केला आहे.
 • ही सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने जवळजवळ पाच हजार डिलेव्हरी एजंटशी करार केला असून या माध्यमातून लोकांना घरीच सामान पोहचवले जाणार असल्याची माहिती येडियुरप्पा यांनी दिली. “यामुळे कमीत कमी लोकं त्यांच्या घराबाहेर निघतील अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी घरीच थांबावे असे आम्ही त्यांना आवाहन करतो,” असंही येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
 • बृहत बंगळुरु महानगर पालिकेचा (बीबीपीएम) हा उपक्रम होता. बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी या सेवेसंदर्भातील माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच यामुळे आपल्या मतदारसंघातील लोकांना फायदा झाल्याचेही सुर्या यांनी सांगितले. यासंदर्भात नऊ स्टेप्समध्ये कशाप्रकारे घर बसल्या सामान मागवता येईल याबद्दलही बीबीपीएमने माहिती दिली आहे.
करोना विषाणूवर औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्या :
 • करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून, सगळेच देश सध्या करोनावर मात करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करताना दिसत आहेत. चीननंतर जगातील अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचलेल्या करोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होत असून, त्यावर अद्यापही औषध न सापडल्यानं दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. करोनावर औषध बनवण्याचे प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.
 • करोना या साथीच्या आजारानं जगातील लाखो लोकांना ग्रासलं आहे. आतापर्यत जगात करोनामुळे दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. भारतातही १८ हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे.
 • ५९० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दुसरीकडे करोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यानं चिंता वाढत चालली आहे. दरम्यान, करोनाच्या विषाणूवर सगळीकडं औषध बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात औषध निर्माण क्षेत्रातील सहा भारतीय कंपन्याचा समावेश आहे.

   

   

  # Current Affairs


  ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

  ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

  अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

  आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

   

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा