चालू घडामोडी : 24 मार्च 2020

150

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 24 March 2020 | चालू घडामोडी : २४ मार्च २०२०

चालू घडामोडी –कोरोनावर ‘आयुष्मान’ योजनेंतर्गत उपचार

  • कोरोना विषाणू प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केला.
  • कोरोना संसर्गाचा उपचारही या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे.
  • खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना संसर्गाच्या तपासणीसह उपचारापोटी सर्वसामान्यांवर पडणाऱ्या आर्थिक ओझ्यातून त्यामुळे थोडा दिलासा मिळेल, असा दावा यामुळे केला जात आहे.
  • कोरोना संसर्गासोबत दोन हात करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत.
  • विविध राज्यांतील स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे.
  • देशातील कोट्यवधी लाभार्थ्यांना या योजनेच्या मापदंडानुसार लाभ घेता येईल, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –‘एटीएम’ शुल्क तीन महिने माफआर्थिकविषयक कालमर्यादांना केंद्राकडून मुदतवाढ; व्यापार आणि उद्योगांना मोठा दिलासा

  • खाते नसलेल्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आकारले जाणारे शुल्क पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी किरकोळ खरेदीसाठी रोख रकमेचा वापर होत असल्याने एटीएम वापरावरील शुल्क माफ करण्यात आले आहे. याशिवाय, प्राप्तिकर, आयात शुल्क, दिवाळखोरी, करभरणा वाद आदी कालमर्यादांना मुदतवाढ देण्यात आला आहे.
  • आर्थिक मदत लवकरच : करोनाच्या महासाथीमुळे आर्थिक क्षेत्राला मोठा फटका बसू लागला आहे. विविध क्षेत्रांच्या संभाव्य नुकसानीचा आढावा घेऊन आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. आर्थिक, वित्तीय, उद्य्ोग तसेच अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी तसेच, मंत्रालयांशीही चर्चा करत असून लवकरच आर्थिक मदतीची घोषणा केली जाईल, असे सीतारामन यांनी जाहीर केले.

महत्त्वाचे निर्णय

  •  २०१८-१९ आर्थिक वर्षांसाठी प्राप्तिकर परतावा भरण्यास मुदतवाढ दिली असून अंतिम तारीख ३० जून २०२०. त्यानंतर परतावा भरल्यास आकारले जाणारे व्याज दर १८ टक्कय़ांवरून ९ टक्कय़ांवर.
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची अंतिम तारीख आता ३० जून.
  •  डेबिट कार्डवरून कुठल्याही बँकेतून पैसे काढले तरी ३० जूनपर्यंत शुल्क आकारणी नाही.
  •  बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अट ३० जूनपर्यंत माफ. शुल्क आकारणी रद्द.
  • अत्यंत गरजेचे असेल तरच बँकेत जाण्याची लोकांना विनंती. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याचा आग्रह.
  • कंपन्यांना रोकड कमतरतेची अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.
  •  मत्स्य व्यवसायासंदर्भात १५ एप्रिलला संपणाऱ्या आयातीसंदर्भातील मंजुरींना तीन महिन्यांची मुदतवाढ.

# Current Affairs


चालू घडामोडी – करोनानं टोक्यो ऑलिम्पिकला लावला ब्रेक ,ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षभरानं पुढे ढकलली आहे.

  • करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टोक्यो ऑलिम्पिकला वर्षभराचा ब्रेक लागला आहे. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षभरानं पुढे ढकलली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत पुढील काही दिवसांमध्ये घोषणा करूयात. सध्या करोनाच्या प्रदुर्भावापासून वाचण्यासाठी सर्वांचा लढा सुरू आहे. सर्वजण मिळून करोनावर मात करू असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पौंड यांनी सांगितले.
  • करोना विषाणू संसर्गामुळे टोक्यो ऑलिम्पिकवर पुढील वर्षीही टांगती तलवार असल्याचं तज्ञ्जांच म्हणणं आहे. अमेरिका, न्यूझीलंड कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी जुलैमध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. प्रमुख संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर समितनं ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्याचं तज्ञ्जांच मत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते, पण रद्द होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी दिले आहे.
  • ऑलिम्पिकपेक्षा माणसांचे आयुष्य महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवसाचा आढावा आम्ही घेत आहोत. या स्थितीत ऑलिम्पिकच्या तारखेबाबत इतक्या लगेचच अंतिम निर्णय घेण्यात येणार नाही. त्यासाठी किमान चार आठवडे लागतील. ऑलिम्पिक रद्द करणे हा निश्चित पर्याय नाही. रद्द करण्याच्या दृष्टीने आम्ही कोणतीच चर्चा करत नाही, असं थॉमस बाख म्हणाले.
  • करोना व्हायरसच्या प्रदुर्भावामुळे जगभरात आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराला महामारी घोषीत केलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जापानमधील मैदान आधीच तयार झाली होती. मोठ्या प्रमाणात तिकिटांची विक्रीही झालेली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –वित्त विधेयक मंजुरीनंतर संसद संस्थगित

  • लोकसभेत सोमवारी वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
  • त्यानंतर संसद संस्थगित करण्यात आली.
  • नेहमीचा प्रश्नोत्तर आणि शून्यप्रहर वगळून थेट वित्त विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले.
  • सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली.
  • त्यात वित्त विधेयकावर चर्चा न करता ते मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम