Current Affairs : 27 नोव्हेंबर 2019 चालू घडामोडी

130

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs :27 November 2019 | चालू घडामोडी : 27 नोव्हेंबर 2019

चालू घडामोडी – चांद्रयान-२ नंतर इस्त्रोचं पहिलं मिशन, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावलं ‘कार्टोसॅट-३’

  • इस्त्रोने इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
  • पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ‘
  • कार्टोसॅट-३’ उपग्रहासह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
  • आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं.
  • पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
  • १३ लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-४ पी’ हे १२ लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे.
  • ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.
  •  ‘कार्टोसॅट-३’ भारताचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे. कारण याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.
  • ‘कार्टोसॅट-३’हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील.
  • ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे.
  • पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – भ्रष्टाचार: १८० देशांत भारत ७९ व्या स्थानी

  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत १८० देशांच्या यादीमध्ये भारताची क्रमवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टप्प्यांनी सुधारली आहे.
  • म्हणजे, गेल्या वर्षी ८१ व्या स्थानी असलेला भारत यंदा ७९ व्या स्थानावर आहे.
  • ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या नव्या सर्वेक्षणानुसार, ५६% नागरिकांनी लाच दिल्याचे मान्य केले.
  • तर या वर्षी लाच दिलेल्या लोकांची संख्या ५१ % आहे. पासपोर्ट आणि रेल्वे तिकिटांसारख्या सुविधा केंद्रिकृत व काम्प्युटराईज्ड झाल्याने हा भ्रष्टाचार कमी झाला आहे. मात्र, सरकारी कार्यालये आजही लाचखोरीचे अड्डे ठरत आहेत.
  • यात सर्वाधिक लाचखोरी राज्य सरकारच्या कार्यालयात होते.या सर्वेक्षणात १.९० लाख लोकांचा समावेश होता. यात ६४ % पुरुष तर ३६ टक्के महिला आहेत.
  • ४८ % लोकांनी मान्य केले की, स्थानिक सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत.
  • २०१७ मध्ये लागू केलेली नोटबंदी भ्रष्टाचार कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
  • लाच म्हणजे एक सुविधा शुल्कच असल्याचे मानणाऱ्या लोकांची संख्याही २०१८ च्या २२ टक्क्यांच्या तुलनेत २६% झाली आहे.
  • मालमत्ता नोंदणी व जमिनीसंबंधीच्या प्रकरणांत सर्वाधिक लाच दिली गेल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

# Current Affairs


चालू घडामोडी – टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदकडून निराशा; कार्लसन विजेता

  • टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.
  • मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते.
  • तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

# Current Affairs


चालू घडामोडी – दोन केंद्रशासित प्रदेश एक होणार

  • दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करून एकच केंद्रशासित बनविण्याचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेमध्ये सादर केले.
  • केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडले. जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी केल्यानंतर तीन महिन्यांनी केंद्राने दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याचे प्रस्तावित केले आहे.
  • नव्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव ‘दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव’ आणि प्रदेशाचे मुख्यालय दमण आणि दीव असण्याची शक्यता आहे.
  • गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील या दोन केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण हे अधिक चांगल्या प्रशासनाकरिता होणार आहे.
  • सध्या दोन्ही प्रदेश एकमेकांपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असूनही दोन्ही प्रदेशांचा वेग‌ळा अर्थसंकल्प आणि वेगळे सचिवालय आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर देशात सध्या नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम