चालू घडामोडी : 28 डिसेंबर 2019

119

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 December  2019 | चालू घडामोडी : 28 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – शॅनन ली मिलर मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत

  • सात ऑलिम्पिक पदकविजेती अमेरिकेची नामांकित कलात्मक जिम्नॅस्टिक्सपटू शॅनन ली मिलरची १७व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • मुंबई मॅरेथॉन स्पर्धा १९ जानेवारी, २०२० या दिवशी होणार असून अमेरिकेच्या ऑलिम्पिक ‘हॉल ऑफ फेम’ने दोन वेळा गौरवण्यात आलेली ४२ वर्षीय मिलर ही एकमेव महिला क्रीडापटू आहे.
  • तिला २००६मध्ये वैयक्तिक, तर २००८मध्ये सांघिक कामगिरीसाठी या सन्मानाने गौरवण्यात आले होते.

# Current Affairs


चालू घडामोडी – घरांच्या किमतीत किरकोळ वाढीसह भारत ५७ देशांच्या यादीत ४६ वा

  • घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत भारत जगात ५६ देशांच्या यादीत ४७ व्या क्रमांकावर आहे.
  • चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशात घरांच्या किमतीत केवळ ०.६ टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टंट नाइट फ्रँकच्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.
  • अहवालानुसार मागणी मंदावल्यामुळे घरांच्या मागणीत किरकोळ वाढ झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या किमती वाढण्याच्या प्रकरणात भारत ११ व्या स्थानावर होता.
  • दरम्यान देशात घरांच्या किमतीत ७.७% ची वाढ झाली आहे.
  • नाइट फ्रँकने अहवालात जागतिक गृह निर्देशांक तिसरी तिमाही २०१९ मध्ये ५६ देश आणि स्थानांवर आधारित सांख्यिकी आकड्यांच्या आधारावर घरांच्या किमतीचे आकलन केले आहे.
  • भारत यामध्ये ५६ देशांच्या यादीत ४७ व्या स्थानी आहे. गेल्या चार वर्षांत किरकोळ महागाई दरापेक्षा कमी राहिल्या आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – भारताचा टेनिस खेळाडू लीएंडर पेस निवृत्त होणार

  • भारताचा 18 ग्रँडस्लॅम विजेता सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लीएंडर पेसने निवृत्तीचे संकेत दिले आहे.
  • आगामी 2020 हे वर्ष आपल्या कारकिर्दीतील अखेरचे वर्ष असलचे त्याने जाहीर केले.
  • डव्हिस चषक टेनिस स्पर्धेत सर्वाधिक 44 सामने जिंकणार्‍या पेसला 19 वर्षांत प्रथमच क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंच्या खाली घसरण झाली.
  • निवृत्तीचे ट्विट : ‘आंतरराष्ट्रीय टेनिसपटू म्हणून 2020 हे माझ्या कारकिर्दीतील अंतिम वर्ष असेल, 2020 मध्ये मी ठरावीकच स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून या स्पर्धामध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन.

# Current Affairs


चालू घडामोडी – पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू मंदिर उघडणार

  • या वर्षी भारतीय भाविकांसाठी तीन धार्मिक स्थळे सुरू झाल्यानंतर आता पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
  • हे मंदिर पाकिस्तानातील पेशावर येथे आहे. पंज तीरथ या नावाने ओळखले जाणारे हे हिंदू मंदिर पुढच्याच महिन्यात नव्या वर्षाला खुले करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
  • पांडव अज्ञातवासात असताना याच मंदिराच्या जागी वास्तव्यास होते असे मानले जाते.
  • भारत-पाक फाळणीनंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताने पूर्वीच या जागेला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम