चालू घडामोडी : 28 जानेवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 January 2020 || चालू घडामोडी : 28 जानेवारी 2020

चालू घडामोडी – नौदलाला मिळणार कवरत्ती युद्धनौका

 • नौदलाला पाणबुडीविरोधी युद्धनौका आयएनएस कवरत्ती लवकरच प्राप्त होणार आहे.
 •  गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियरिंगचे अध्यक्ष रियर ऍडमिरल व्ही.के. सक्सेना यांनी याची माहिती दिली.
 • रडारला चकवा देऊ शकणाऱया या युद्धनौकेमुळे नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. या युद्धनौकेच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – कोलकात्यात हुगळी नदीखाली ‘पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो’

 •  पाण्याखालून धावणारी देशातल्या पहिल्या मेट्रो सेवेचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही मेट्रो धावणार आहे.
 •  देशातली पहिली पाण्याखालून धावणारी रेलगाडी ‘सॉल्टलेक सेक्‍टर-5 आणि हावडा मैदान’ यादरम्यान धावणार आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. त्यातला पहिला टप्पा 2022 सालापर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

 • या रेलगाडीला जलप्रवाहापासून वाचवण्यासाठी एक भक्कम बोगदा तयार करून उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
 • नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब असून ती नदीच्या तळापासून 30 मीटरच्या खोलीवर आहे. नदीखालून रेलगाडीला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.
 • या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला.
 •  कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

 • हेलिकॉप्टर अपघातात 13 वर्षीय मुलीसह 9 जणांचा मृत्यू, क्रीडा क्षेत्रावर शोक कळा एनबीएचा महान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचे मुलीसह रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले आणि लगेच पेट घेतल्याने सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या धक्कादायक वृत्ताने जागतिक क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
 • 41 वर्षीय ब्रायंट 13 वर्षीय मुलगी गियेना व अन्य सात प्रवासी व क्रू मेंबर्ससह सिकोरस्काय एस-76 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होता. लॉस एंजेलिसच्या पश्चिमेस असलेल्या कॅलाबासासच्या डोंगराळ भागात ते कोसळले आणि पेट घेतले.
 • ब्रायंट पाचवेळचा एनबीए चॅम्पियन असून त्याने दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले आहे. बास्केटबॉलच्या इतिहासातील तो सर्वात महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. गेल्या दोन दशकात बास्केटबॉल म्हणजे कोबी ब्रायंट अशी ओळख निर्माण केली होती. लॉस एंजेलिस लेकर्सचे तो प्रतिनिधित्व करीत होता.
 • हेलिकॉप्टर कोसळले तेथे जाऊन शोध घेण्याचा अग्निशामक दलानी पुरेपूर प्रयत्न केले. पण त्यांना त्यातील एकही प्रवासी जिवंत आढळला नाही. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी राष्ट्रीय दळणवळण सुरक्षा मंडळाने 18 सदस्यीय तपास पथक कॅलिफोर्नियाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
 • ब्रायंटच्या मृत्यूच्या वृत्ताने जगभरातील क्रीडापटूंना धक्का बसला असून बास्केटबॉल स्टार्स तर सुन्न झाले आहेत. अनेकांनी ट्विटच्या माध्यमांतून त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पॉप स्टार्स, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यांचा समावेश आहे. ‘ब्लॅक माम्बा’ने बास्केटबॉलला नव्या उंचीवर नेवून ठेवले असल्याचेच प्रत्येकाचे मत आहे.
 • हायस्कूल शिक्षण संपल्यानंतर 1996 मध्ये त्याची एनबीए कारकीर्द सुरू झाली आणि 2016 मध्ये तो निवृत्त झाला. त्याने पाचवेळा एनबीए चॅम्पियनशिप जिंकली असून 2008 बीजिंग आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेला बॉस्केटबॉलचे सुवर्ण मिळवून दिले होते.
 • 2016 मध्ये तो एनबीएमधून निवृत्त झाला आणि शेवटच्या सामन्यात त्याने 60 गुण नोंदवले होते. माजी एनबीए खेळाडू जो जेलीबीन ब्रायंट यांचा तो मुलगा असून 1978 मध्ये फिलाडेल्फियात त्याचा जन्म झाला होता.
 •  त्याचे वडील 1984 ते 1991 या कालावधीत इटलीमध्ये खेळले होते. 17 व्या वर्षी कोबी व्यावसायिक खेळाडू बनला. एवढय़ा लहान वयात मोठी झेप घेणारा तो सहावा खेळाडू होता. 2018 मध्ये बास्केटबॉलच्या प्रेमाखातर लिहिलेल्या पत्रावरून निर्माण करण्यात आलेल्या ‘डीयर बास्केटबॉल’ या ऍनिमेटेड शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

# Current Affairs


चालू घडामोडी – इस्रो देणार ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट.

 • देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो व्हॅलेंटाईनच्या कालावधीत देशाला देईल.
 • फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-1 (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
  तर जीआयसॅट-1 उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल.
 • तसेच यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील.
  पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून जीआयसॅट-1 रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल.
 • जीआयसॅट-1 मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-1 च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-2 अवकाशात पाठवेल.
 • जीआयसॅट-1चं प्रक्षेपण 15 जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं.
 • आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-1 चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके2 प्रक्षेपक म्हणून काम करेल.
 • तसेच जीआयसॅट-1 मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल.
 • याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-1 केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा