चालू घडामोडी : 29 डिसेंबर 2019

136

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 29 December  2019 | चालू घडामोडी :29 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – रशियाकडे जगातील पहिली हायपरसोनिक मिसाईल

  • रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्दलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते.
  • तर या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
  • हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी 5 पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत.
  • तसेच हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत.
  • तर या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो. या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता.

# Current Affairs


चालू घडामोडी – बीएसएनएल-एमटीएनएलच्या पुनर्घडणीसाठी उच्चस्तरीय मंत्रिगट

  • सार्वजनिक मालकीच्या दूरसंचार कंपन्या – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्या पुनर्घडणीसाठी 69 हजार कोटी रुपयांची योजना केंद्र सरकारने आखली असून, या योजनेच्या जलद गतीने अंमलबजावणीसाठी सात सदस्यांचा उच्चस्तरीय मंत्रिगटही आता स्थापण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण करण्यासह, त्यांच्या फेरघडणीसाठी 69 हजार कोटी रुपये खर्चाची पुनरूज्जीवन योजना घोषित केली आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आणि त्याला एकूण 92 हजार 700 कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी वेतन खर्चापोटी दरसाल 8 हजार 800 कोटी रुपयांची बचत या मोठा कर्जभार असणाऱ्या कंपन्यांना शक्य होणार आहे.
  • तसेच दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निर्धारीत योजनेच्या अंमलबजावणीसह, काही मालमत्तांची विक्रीतून निधी उभारणी तसेच 4जी ध्वनीलहरींचे या कंपन्यांना वाटपाच्या मुद्दय़ांचाही पाठपुरावा हे कृतीदल करणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
  • तसेच या आंतर-मंत्रिमंडळ स्तरावरील कृतीदलात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांचा समावेश आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • तर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे.
  • तसेच यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

# Current Affairs


चालू घडामोडी – आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो 

  • मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.
  • तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.
  • तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील. टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.
  • याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.
  • आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम