चालू घडामोडी : 30 डिसेंबर 2019

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 30 December 2019 | चालू घडामोडी : 30 डिसेंबर 2019

चालू घडामोडी – मलाला यूसुफझाई जगातील ‘सर्वात प्रसिद्ध किशोरी’

 • सयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफझाई यांना ‘डिकेड इन रिव्यू’ अहवालात ‘जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन’ घोषित केले आहे.
 • २०१४ मध्ये मलालाला नोबेल पारितोषिक (शांती) देण्यात आले.
 • हा पराक्रम गाठणारी मलाला ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे.
 • अहवालात असेही म्हटले होते की, या प्राणघातक हल्ल्यानंतर मलालाचे आणखी वलय वाढले.
 • सन २०१७ मध्ये मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला यूएन’ने शांतिदूत म्हणून बनवले.
 • २२ वर्षीय मलाला अलीकडेच टीन वोग मॅगझिनने ‘कव्हर परफॉरमन्स’साठी निवडले होते.

# Current Affairs


चालू घडामोडी – हेमंत सोरेन बनले झारखंडचे ११वे मुख्यमंत्री

 • झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली.
 • राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.
 • राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
 • हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत.
 • हेमंत सोरेन यांचा पहिला कार्यकाळ हा १३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४ इतका होता ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

झारखंड 

 • झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.
 • बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला.
 • त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.

# Current Affairs


चालू घडामोडी – 2021 ची जनगणना 16 भाषांमध्ये होणार

 • 2021 ची जनगणना 16 भाषांमधून केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
 • वयय विषयक वित्त समितीने यासाठी 8754.23 कोटी रुपये खर्चाची शिफारस केली आहे.
 • गणक मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही जनगणनेची माहिती गणक कर्मचारी गोळा करु शकतात, असे राय यांनी सांगितले. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
 • घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये करण्यात येईल आणि लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली

 • छत्तीसगड राज्याचे राजधानी शहर रायपूर येथे 27 डिसेंबर 2019 रोजी वार्षिक ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव’ याचा शुभारंभ झाला. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
 • हा वार्षिक कार्यक्रम केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय आणि छत्तीसगड सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.
 • छत्तीसगड राज्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
 • तीन दिवस चालणार्‍या या नृत्य महोत्सवात देशातल्या 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले 1300 हून अधिक कलाकारांनी भाग घेतला आहे. या कार्यक्रमात सहा देशांनीही भाग घेतला आहे.
 • कार्यक्रमात 29 आदिवासी गटांनी चार वेगवेगळ्या नृत्य प्रकारांच्या 43 पेक्षा जास्त शैली सादर करत आहेत.
 • आदिवासी कलेचे प्रदर्शन घडावे यासाठी भारत सरकारच्या वतीने हा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा