चालू घडामोडी : 30 जानेवारी 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 30 january 2020| चालू घडामोडी : 30 जानेवारी 2020

चालू घडामोडी –  गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येणार

 •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘वैद्यकीय गर्भपात (दुरूस्ती) विधेयक-2020’ याला मंजुरी देण्यात आली आहे. याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971’ यामध्ये दुरूस्ती केली जाणार आहे.

 प्रमुख वैशिष्ट्ये

 • गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार.
 •  काही विशिष्ट घटनांच्या बाबतीत महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा 20 वरून 24 आठवडे करण्यात आली आहे. अश्या महिलांमध्ये बलात्कार पिडीत, दिव्यांग महिला, अल्पवयीन यासह इतर महिलांचा समावेश राहणार.
 •  गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.
 •  महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक, मानवी आणि सामाजिक आधारावर हे विधेयक आणण्यात येणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  हिटमॅनचे आणखी एक रेकॉर्ड

 •  हिटमॅन रोहित शर्माने हेमिल्टनमध्ये झालेल्या सामन्यात तडाखेबाज खेळी करत भारतीय टीमला विजयी मिळवून दिला.
 • सामन्यात रोहित शर्मा ने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केले आहेत.
 • रोहित शर्माने 56 धावा पूर्ण करताच हा रेकॉर्ड बनवला.
 •  भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 10 हजार धावा केल्या आहेत. गावस्करने ओपनर म्हणून 12, 258, सचिन तेंडुलकर ने 15,310 तर सेहवागने 16,119 धावा केल्या आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

 • महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले. महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या.
 •  पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
 • सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळ्ख होती. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले होते. तसेच रुढी, परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार करत त्यांनी स्रियांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला.
 • पुरोगामी विचारधारा घेऊन त्यांनी समाजात जनजागृती करण्याचे काम आपल्या लेखणी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून केले.महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सुरुवातीला किर्लोस्कर मासिकातून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या त्या 30 वर्ष संस्थापक संपादिका होत्या.
 • सत्री-पुरुष समानतेसाठी मोठा लढा
  भारतातील विविध मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या निकालात त्यांना यश आले होते. सर्वसामान्यपणे साजऱ्या होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमांना विरोध होता. त्याऐवजी प्रौढ कुमारिका, विधवा, सवाष्ण, नवऱ्यापासून वेगळ्या झालेल्या अशा सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन मतांचे आदानप्रदान करावे असे त्यांचे मत होते.

विद्या बाळ यांचा अल्पपरिचय

 •  पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.
 •  त्यानंतर, १९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या
 •  . मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२साली प्रसिद्ध झाले.
 • स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था होती. १९८१ साली त्यांनी ’नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली.
 • याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे विद्या बाळ यांच्या संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्‍न केला. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी ‘सखी साऱ्याजणी’च्या आज गावोगावी शाखा आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

 •  आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
  दक्षिण आफ्रिकेतला चित्ता हा वन्यजीव भारतात आणण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.
 •  भारतातल्या योग्य अधिवासात आफ्रिकेतला चित्ता आणता येणार आहे. आपल्या चपळतेसाठी ओळखला जाणारा चित्ता भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
 • भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतल्या नामिबिया देशामधून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी केली.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA)

 •  ‘टायगर प्रोटेक्शन प्रोग्राम’ (व्याघ्र प्रकल्प) नावाचा एक कार्यक्रम 1973 साली भारत सरकारने WWF या जागतिक संस्थेच्या सहकार्याने सुरू केला.
 •  भारतातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या पुनर्गठित व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये झाली.
 •  ‘वन्यजीव संरक्षण कायदा-1972’ मध्ये 2006 साली दुरूस्ती करण्यात आली ज्यामुळे संकटात सापडलेल्या वाघांच्या (तसेच वाघ या प्रजातीतले इतर पशू) संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणारी ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’ ही संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पर्यावरण व वन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना करण्यात आली

 # Current Affairs


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा