दिनविशेष :११ जून

139

  ११ जून  : जन्म

१८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)

१८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

१९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.

१९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

 

११ जून   : मृत्यू

ख्रिस्त पूर्व ३२३: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

१७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

१९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

१९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

१९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)

१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

१९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

 

  : महत्वाच्या घटना

१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

१९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९७२: दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

१९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर  कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

२००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम