संत तुकाराम यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १६०७ - मृत्यू : १६५०)

1,177

संत तुकाराम यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

मुळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म : १ फेब्रुवारी १६०७

ठिकाण : देहू महाराष्ट्र (पुणे, देहू- इंद्रायणी नदी काठी)

मृत्यू:१९ मार्च १६५०

ठिकाण : देहु, महाराष्ट्र

संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

गुरू: केशव चैतन्य (बाबाजी चैतन्य) ओतुर

शिष्य : संत निळोबा, संत बहिणाबाई

भाषा : मराठी

साहित्य रचना : तुकारामाची गाथा

कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

तीर्थक्षेत्र : देहू

व्यावसाय: वाणी

वडिल: बोल्होबा अंबिले

आई : कनकाई अंबिले.

पत्नी: आवली (पुण्याचे आप्पाजी गळवे यांची कन्या)

अपत्ये : महादेव, विठोबा, नारायण, भागुबाई

संत तुकाराम यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • तुकोबा हे १७ व्या शतकातील वारकरी
  • आराध्यदैत पंढरपुरचा विठ्ठल / विठोबा
  • वारकरी त्यांना जगदगुरू म्हणून ओळखत असत.
  • जगदगरू तुकाराम लोककवी होते.
  • तुकाराम महाराज हे साक्षत्कारी, निर्भीड व एका अर्थाने संत कवी होते..
  • अभंगाचा अर्थ – जे कधी भंग पावत नाही असे.
  • तुकाराम जन्मवर्षाबद्दल इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. त्यातल्या संभाव्य तारखा –

१) १५६८           २) १५७७           ३) १६०८        ४) १५९८

  • घराणे मोरे
  • सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संभाजी जगनाडे यांनी तुकारामाचे अभंग लिहिण्याचे काम केले.
  • पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.
  • तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या वज्रसूची या बंडखोर ग्रंथाचे मराठीत भाषांतर करायला सांगितले होते.
  • पुस्तक गीतगाथा
  • शिवाजी महाराज व संत रामदास हे तुकारामांचे समकालीन होते.

संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश

संत तुकाराम यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन, सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ईश्‍वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला.

संत तुकाराम यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्शने यांतून प्रेरणा घेतली.

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा “गीतगाथा” हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.

महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे ज्यू बहुजनांच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. देव-धर्म प्रथेपुढे समाज गांजलेला होता. अंधश्रद्धेने सारा समाज पोखरला होता. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता.

महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत – ज्ञानेश्वर – या काळामध्ये पुढे आला. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.

ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.

संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला विरोधक नमले परंतु अभंग, अभंग राहिले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे.

त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकर चा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे.

संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.

  • तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार – कर्णे गजेंद्र भारती महाराज)
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
  • श्री संत तुकाराम महाराजांची गाथा (संपादक ह. भ. प. श्री. पांडुरंग अनाजी घुल

तुकाराम महाराज वैकुंठ गगन

पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे.

श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.’

या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. ‘तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम