अवंतिकाबाई गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८८२ -मृत्यू : १९४९)

2,528

अवंतिकाबाई गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

जन्म : १७ सप्टेंबर १८८२-१९४९

पती : बबनराव

  • गांधीजींच्या पटशिष्या होत्या.
  • मराठी बरोबरच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व
  • हिंदी महिला समाजाची स्थापना
  • भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधीजीची पहिली भारतीय शिष्या म्हणून अवंतीकाबाईंना ओळखले जाते.
  • १९१६ गांधी लखनौ काँग्रेस अधिवेशनात ओळख.
  • १९१९ मध्ये नाशिक येथे केलेले भाषण ऐकून लो. टिळक प्रभावित झाले होते.
  • १९२२ मुंबई महापालिकेत प्रचंड मताने निवडून आल्या परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली.
  • १९२६ मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या स्वार्थ समितीवर नियुक्त.
  • १९३०-३२ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. त्याचे सर्व श्रेय अवंतीकाबाईना जाते.

अवंतिकाबाई गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

२६ जानेवारी १९३० कमिशनचा रूल मोडून आझाद मैदानावर थंडविला.

– १९४२-४३ च्या आंदोलनात सहभागी होऊ शकल्या नाहीत.

– १९४७ मध्ये कर्करोग झाल्याचे निदान

– २६ मार्च १९४९ मध्ये मुंबईत राहत्या घरी निधन.

– १९१८ साली महात्मा गांधीचे चरित्र लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले.

Avantikabai गोखले हे मराठी लेखक, त्याच्याबरोबर होता. यांनी महात्मा गांधी, चरित्र लोकमान्य टिळकांच्या parstavet प्रकाशित केले. Gandhigiri सुरुवातीला कालावधी, ही मुलगी जीवन, त्याला आणि विचारा बद्दल परिचय पास की देणे हे चित्र लक्षणीय आहे.

मुलगी जिवंत असताना मध्ये लिहिलेले पहिले चित्र आहे. परिचारिका शिक्षण, जे anticocaine पुढे महिला आरोग्य आणि इतर क्षेत्रात काम करण्यासाठी हिंदी महिला समाजाची स्थापना केली होती.मृत्यू मार्च 1949 तसेच आलिंगन निषेध, आणि फक्त वगळले पासून महिला, म्हणून समावेश होता.

गांधीजींच्या पट्टशिष्या असलेल्या अवंतिकाबाई गोखले. मराठीबरोबर इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असलेल्या अवंतिकाबाईंनी चंपारण्यातील सत्याग्रहापासून गांधीजींना साथ दिली. स्त्रियांच्या व्यक्तिविकास व सबलीकरणासाठी त्यांनी गिरगावात ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली तसेच गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघरे सुरू केली.

याशिवाय अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नही केले. १९३० व ३२ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो स्त्रिया सामील झाल्या. त्याचे श्रेय बाईंनाच जाते. एक नि:स्पृह, स्पष्टवक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात त्यांना मानाचे पान आहे.

 

अवंतिकाबाई गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

१९२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने स्त्रियांचा मताधिकार व निवडणुका लढविण्याचा अधिकार मान्य केला. त्या कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत सरोजिनी नायडू, बच्चूबेन लोटवाला, हॅडगिव्हसन व अवंतिकाबाई अशा चार स्त्रिया निवडून आल्या. त्यात अवंतिकाबाईंना प्रचंड मते मिळाली. परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवड रद्द झाली.

बाईंना असलेला प्रचंड पाठिंबा व त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना १ एप्रिल १९२३ रोजी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व मिळाले. १९३१ पर्यंत त्या सातत्याने स्वीकृत सदस्य होत्या. आपल्या मतदारसंघातील प्रश्न व ठराव मांडून त्यांनी महापालिका दणाणून सोडली.

आरोग्य व शिक्षण ही दोन खाती बाईंच्या जिव्हाळय़ाची. शाळेच्या आसपास अनारोग्यकारक खाद्यपेये विकली जाऊ नयेत, चौपाटीवर बसून हवा खावी, पदार्थ खाऊन कागद, द्रोण वगैरे टाकून वाळू खराब करू नये, अशा प्रकारचे ठराव त्यांनी मांडले. त्या सभागृहात मराठीतूनच बोलत. त्यांची भाषणे व युक्तिवाद विचारप्रवृत्त करणारे असत म्हणून त्यांना अध्यक्षांनी इंग्रजीत बोलायची विनंती केली.

मराठीइतकेच त्यांचे इंग्रजी भाषणही प्रभावी होई. इंग्रजीच काय, पण मराठीही घरातल्या वडीलधाऱ्यांकडेच बाई शिकल्या होत्या. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळविले होते.

१९४० किंवा १९४२च्या आंदोलनातही त्या भाग घेऊ शकल्या नाहीत. १९३३ पासून स्वत:च्या मृत्यूपर्यंत त्यांचे विधायक कार्य चालूच राहिले. १९४७च्या आसपास त्यांना कर्करोग झाल्याचे कळले. त्याच वेळी स्वातंत्र्य मिळाले. गांधीजींना पट्टशिष्येच्या या आजाराचे अतीव दु:ख झाले. त्यांनी बाईंना उल्हसित करणारे एक पत्र लिहिले. हे पत्र गांधीजींनी अवंतिकाबाईंना लिहिलेले शेवटचे पत्र.

३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची नथुराम गोडसेने हत्या केली. त्याचा धक्का अवंतिकाबाईंना बसला. त्यांना भास होऊ लागले. बापू मला बोलवीत आहेत, तुम्हीही चला, असे त्या बबनरावांना सांगू लागल्या. गांधीजींपाठोपाठ सव्वा वर्षांनी त्यांच्या या पहिल्या भारतीय शिष्येने २६ मार्च १९४९ ला मुंबईत राहत्या घरी देह ठेवला.

एक नि:स्पृह, स्पष्टवक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात त्यांना मानाचे पान आहे.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम