पेशींबद्दल संपूर्ण माहिती:

इ.स.1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी या सजीवातील मुलभूत घटकाचा शोध लावला.

त्याने बुचाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता मधाच्या पोळ्याप्रमाणे सदरची रचना दिसली. त्या कप्प्यांना पेशी (cell) असे नाव दिले. विज्ञानाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्वाची घटना आहे.

प्रत्येक सजीव भिन्न असला तरीही तो याच, एकमेकांपासून विलग अशा छोटया घटकापासून बनलेला असतो. त्यांना पेशी असे म्हणतात. इमारतीमधील वीट आणि सजीवामधील पेशी हे मुलभूत रचनात्मक घटक असतात.

पृथ्वीवर एकाच पेशीपासून बनलेले एकपेशीय तसेच अनेक पेशीपासून बनलेले बहुपेशीय सजीव आढळतात.

एकपेशीय सजीवांमध्ये सर्व प्रक्रिया आणि कार्ये एकाच पेशीद्वारे केली जातात.

उदा. अमिबा, पॅरामेशियम,युग्लीना

पेशी अभ्यासाशी संबंधित शास्त्रज्ञ :

झकॅरीअस जॅन्सन– सुक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध (1590)

रॉबेर्ट हूक – बुचातील मृत पेशीचा शोध (1665)

ल्युवेन हॉक – जीवाणू,शक्राणु,आदिजीव यांच्या पेशींचे निरीक्षण (1674)

रॉबर्ट ब्राऊन– केंद्रकाचे अस्तित्व (1831)

जॉहॅनीस पुरकिंजे – तरल द्रव्याला प्रद्रव्या नाव दिले.

पेशी सिद्धांत :

एम. जे. शिल्डेन आणि थिओडोर श्वान यांनी सर्व वनस्पती पेशीपासून  बनलेल्या असतात आणि पेशी हा सजीवाचा मुलभूत घटक आहे. हा सिद्धांत मांडला.

कोणत्याहि पेशीचा उगम उत्स्फुर्तपणे होत नसून केवळ पेशी विभाजनाने त्या निर्माण होतात.

पेशींची  संरचना :

अंडे आणि अमिबा दोन्हीही एकपेशीय आहेत.

पेशीचे आकारमान 0.1 UM ते 18 CM पर्यंत आढळते.

एक मायक्रोमिटर म्हणजे 1 मिमिचा 1000 व भाग.

सर्वात लहान पेशी -शहामृगाचे अंडे (18CM)

मानवी चेतापेशींना 1 मित्र लांबीचे शेपूट किंवा अक्षतंतू  असतो.

पेशींचा आकार :

मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो. केशिकांमधून प्रवाह सुलभ होण्याकरिता मानवी लोहित पेशींचा आकार द्विअंतर्वक्री असतो.

शरीरात प्रवेश करणाऱ्या शुक्ष्म जीवना गिळंकृत करण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी स्वतःचा आकार बदलू  शकतात.

एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आवेगाचे (IMPULSUS) वहन  करण्यासाठी चेतापेशीची लांबी जास्त असते.

अमिबा पेशी अनियामित असते. शुक्रपेशी सर्पिलाकार असते. तर अंडपेशी गोलाकार असते.

पेशींचे प्रकार:

1. दृश्याकेंद्रकि पेशी (EUKARYOTIC CELLS) :

ज्या पेशींची अंगके पटल वेष्टित असतात त्यांना दृशाकेंद्रकी पेशी असे म्हणतात.

केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक या पेशींमध्ये असते.

तुलनेने बऱ्याच मोठ्या असून आकार 5-100 UM एवढा असतो.

या पेशींमध्ये एकापेकाक्षा जास्त गुणसूत्रे असतात.

उच्च विकसित एकपेशी व बहुपेशी प्राण्यांमध्ये या पेशी असतात

उदा : शैवाल ,कवके,प्रोटोझुआ,वनस्पती व प्राणी

2. आदिकेंद्रकी पेशी  (PROKARYOTIC CELL) :

ज्या पेशींच्या अंगकाभोवती आवरण नसते त्यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात.(LACKING NUCLEAR MEMBRANCE)

या पेशी अत्यंत सध्या असतात.(PRIMARY)

या पेशींचे तीन मुलभूत घटक असतात.प्रद्रव्यपटल,पेशीद्र्व्य आणि केंद्रकद्रव्य .

केंद्रकाभोवती पटल नसल्यामुळे पेशीमधील जनुकीय द्रव्याचा (DNA) पेशिद्रव्याशी थेट संपर्क असतो. त्यांच्यामध्ये एकाच गुणसूत्र असते. पेशिद्रव्याच्या या DNA असलेल्या अस्पष्ट भागास केंद्रकाभ (NUCLEOID) म्हणतात.

आदीकेंद्रकी पेशी आकाराने लहान असून 1-10 UM आकाराच्या असतात. उदा. जीवाणू (BACTERIA) ,नील-हरित शैवाल (B-G ALGAE)

 

पेशींची रचना:

1.पेशीभित्तीका (CELL WALL) :

फक्त वनस्पती पेशीत असते .

पेशिपटलाच्या बाहेरील आवरणास पेशी भित्तिका म्हणतात.

हि सेल्युलोज पदार्थाची बनलेली असते.

यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात.

पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो.

पेशीचा आकार निचित होतो.

आतील घटकांना संरक्षण मिळते.

दोन पेशीभित्तीकांमधील पेक्टिन पेशींना बांधून ठेवते.

2. प्रदव्यपटल / पेशीपटल :

पेशीचे बाह्य आवरण

पेशीमधील व बाहेरील जल व पोषणद्रव्यांचे वहन करणे.

मेद व प्रथिने युक्त आवरण.

3. पेशीरस / पेशीद्रव्य :

पेशीमधील केंद्राकाव्यातिरिक्त द्रवरूप भागास पेशीरस म्हणतात.

पेशीरस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बन , आकार्बानी पदार्थ आणि विविध अंगके  असणारा अर्धाप्रवाही पदार्थ.

विविध अंगके सामावलेली असतात.

अंगाकाद्वारे सर्व क्रिया घडतात.

4. पेशी अंगके :

1. केंद्रक (NUCLEUS):

पेशी मधील मध्यवर्ती घटक आहे.

बहुदा आकार गोल असतो .

केंद्रकात  DNA पासून बनलेली गुणसूत्रे असतात .

DNA च्या धाग्यास जनुक म्हणतात .

पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो.

केंद्रकातील गुंसुत्रावरील जनुकानुसार अनुवांशिक गुण पुढील पिढ्यात संक्रमित होतात.

2. गोल्जीपिंड/ गोल्गी संकुल (GOLGI COMPLEX) :

यामधी विकार साठवले जातात .

मुख्य कार्य स्त्रवन

प्रथिने आणि विकारांचे स्त्रावाच्या रुपात वहन करणे.

3. तंतुकनिका(MITOCHONDRIA) :

प्रामुख्याने लांबट गोल .

दुहेरी भित्तिका असतात .

भित्तीकेस घड्या पडलेल्या असतात .

पेशीतील अन्नापासून उर्जा निर्माण करण्याचे काम करते.

पेशीला जरूर असेल तेंव्हा उर्जा पुरवते .

पेशीचे उर्जा केंद्र म्हणतात .

लांबी 1.5 ते 10UM व व्यास 1 UM . असतो.

4. रिक्तिका (VOCUOLES):

उत्सर्जित पदार्थ , विविध स्त्राव तात्पुरते साठवण्याचे काम रिक्तिका मार्फत केले जाते.

वनस्पती  पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते .

प्राणीपेशी  मध्ये अनेक लहान रिक्तिका असतात.

5. आंतर्द्रव्याजालिका (ENDOPLASMIC RETICULUM) :

हि पेशी अंतर्गत वहन व्यवस्था आहे.

हि एकमेकांशी जोडलेल्या आणि तरल पदार्थांनी भरलेल्या शुक्ष्मनलिका आणि पात यांची विस्तीर्ण जालिका आहे .

संस्लेषित प्रथिनांचे आवश्यक ठिकाणी वहन  करण्याचे काम खडबडीत अंतर्द्रव्यजालिका करते.

गुळगुळीत अंतर्द्रव्यजालिका मेदरेणूंची निर्मिती करते.

घातक पदार्थ शरीराबाहेर काढण्याचे कार्य गुळगुळीत अंतर्द्रव्यजालिका करतात.

6. लयकारिका(LYSOSOMES):

पेशीमध्ये तयार होणाऱ्या टाकाऊ कार्बनी पदार्थाचे पचन लायाकारिका करतात.

यांच्यामध्ये अनेक पाचक विकारे असतात.

वनस्पतीपेशीमध्ये प्रमाण कमी असते .

उपासमारीच्या काळामध्ये लायाकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने , मेद  यांचा वापर करून आवश्यक उर्जा पुरवितात.

टॅडपोलचे बेडकात रूपांतर झाल्यावर लायकारीकेमार्फत शेपटीचे पचन होते.

7. लवके (PLASTIDS):

केवळ वनस्पती मध्ये असतात .

पेशींना रंग प्राप्त करून देणारे अंगक.

वर्नालवके रंगीत असतात.

अवर्णलवके  पंढरी  असतात .

हरीतलवके हा वर्ण लावकाचा प्रकार आहे.

पेशींना सजीवांच्या रचनेचे अनि कार्याचे मुलभूत घटक मानले जाते .

अमिबा,पॅरमेशिअम,क्लोरेल,स्पायारोगाय्रा,युग्लीना,हे सजीव एक पेशीय असून जीवनप्रक्रिया एकाच पेशीमध्ये पूर्ण होतात.

वृक्ष,मनसे इत्यादी बहुपेशीय सजीव आहेत.

बहुपेशीय सजीवांमध्ये श्वासन , पचन इत्यादी विविध जीवन प्रक्रिया वेगवेगळ्या इंद्रिया मार्फत घडत असतात.

सजीवातील शरीर रचना त्यांनी करायच्या कार्यानुसार असते. यालाच सजीवांचे संगठन म्हणतात.

8. पेशी पातळी (CELL LEVEL):

पेशीमध्ये विविध अंगाके असतात.

अंगाके पेशितच श्वसन,पचन इत्यादी जीवन प्रक्रिया घडवून आणतात.

यालाच पेशी पातळी संघटन म्हणतात.

एकपेशीय सजीवत पेशी पातळी संघटन असते .

9. ऊती पातळी(TISSUE LEVEL):

पेशिपातळी संघटन अपुरे पडते तेव्हा उतीपाताळीचा  विकास होतो.

विविध क्रिया घडून येण्यासाठी पेशी समूहाने काम करतात.

समान कार्य करणाऱ्या पेशी समूहाला ऊती म्हणतात.

वनस्पती मध्ये उतीचे दोन प्रकार पडतात.(1)विभाजी ऊती : सतत विभाजित होते. प्ररोहअग्र व मुलाग्रावर ,(2)स्थायी ऊती : नवीन उतींचे रूपांतरण स्थायी ऊतीत.

प्राण्यांमध्ये :(1)संयोजी ऊती: इंद्रिये आणि इतर ऊतींना एकत्र बांधून ठेवणे, (2)चेता ऊती : समन्वय,(३) स्नायू ऊती : हालचालीसाठी.

10. इंद्रिय पातळीवरील संगठन(ORGAN LEVEL):

वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन इंद्रिय बनते.

उदा. प्राण्यातील जठार ,यकृत,इ. तसेच वनस्पतीमध्ये -पाने,फुले E.

वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कामे करतात.

जेन्वा सजीवांच्या जीवनक्रियेत इंद्रिये भाग घेतात तेव्हा त्या संघटन पातळीला इंद्रिय पातळी म्हणतात.

11. संस्था पातळीवरील संघटना(SYSTEM LEVEL):

सजीवत जीवनक्रिया घडतात .

जीवनक्रिया घडून येण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात.

डोळा, हृदय,मेंदू,फुफुस,यकृत हि काही इंद्रिये मिळून संस्था तयार होते.

ठराविक काम एकत्रित पणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात.

उदा.पचन संस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण संस्था,उत्सर्जन संस्था.इ

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा