आनंदीबाई गोपाळराव जोशी (1865-1887) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८६५ - मृत्यू : १८८७)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
852

आनंदीबाई गोपाळराव जोशी (जन्म : पुणे, ३१ मार्च १८६५; मृत्यू : पुणे, २६ फेब्रुवारी १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या

आनंदीबाई जोशी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती 

(जन्म : १८६५ – मृत्यू : १८८७)

आनंदीबाई गोपाळराव जोशी (1865-1887) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म: ३१ मार्च १८६५

ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७

शिक्षण: एम. डी.

पति : गोपाळराव जोशी

ख्याती : भारतातील पहिल्या महिला डॉक्टपेशा : वैद्यकीय

लहानपणचे नाव : यमुना

आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे  आयुष्य साहसाने आणि संघर्षाने भरलेले असुन ह्नदयाला स्पर्श करणारे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व त्या सर्व महिलांकरता प्रेरणास्त्रोत आहे ज्यांना मोठमोठी स्वप्नं पहायला आवडतं पण समाजाच्या आणि कुटूंबाच्या भितीने त्या स्वतःला घराच्या चार भिंतींमधे कैद करून घेतात.

तो असा काळ होता ज्या काळात स्त्रियांच्या सोडाच पण पुरूषांच्या शिक्षणाला देखील फारसे महत्वं दिले जात नसे, महिलांचे शिक्षण एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते अश्या काळात आनंदी गोपाळ जोशींनी आपल्या स्वप्नाला पुर्ण करण्याकरीता विदेशवारी करत वैद्यकिय पदवी प्राप्त केली आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 1886 साली डॉक्टर होवुन केवळ आपल्या देशाचा गौरवच वाढविला नाही तर सगळयांकरीता एक आदर्श ठरल्या.

अशी कोणती घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली? कोणत्या प्रसंगाने त्यांच्या मनात डॉक्टर होण्याची भावना तिव्र झाली आणि डॉक्टर होतांना त्यांना कोण-कोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला? जाणुन घेऊया या लेखात……

  • वयाच्या ९ व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह. (हे गोपळरावांचे दुसरे लग्न होते.)
  • गोपाळरावांनी लग्नानंतर यमुना हे नाव बदलून आनंदीबाई जोशी हे नाव ठेवले.
  • १४ वर्षांनी एका मुलास जन्म १० दिवसात मुलगा मरण पावला तेव्हा शिक्षणाचा निश्चय
  • शिक्षणासाठी मिसेल टी. ई. कार्पेन्टर यांनी मदत केली.
  • १७ व्या वर्षी (अमेरिकेत) फिलकेल्फीया येथिल वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश.
  • ११ मार्च १८८६ रोजी पेनसिल्वानिया विद्यापीठातून एम. डी. ची परीक्षा उत्तीर्ण.

आनंदीबाई गोपाळराव जोशी (1865-1887) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • विषय – हिंदू आर्य लोकांमधीलप्रसूतीशास्त्र
  • व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले.
  • २६ नोव्हेंबर १८८६ भारतात परतल्या.
  • त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला.
  • क्षय रोगाच्या व्याधीने वयाच्या २१ व्या वर्षी २६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुणे येथे निधन.
  • चित्रपट आनंदी गोपाळ (२०१९) मध्ये प्रदर्शित. –
  • डॉक्यड्रामा हा लघुपट त्यांच्या जीवनावर तयार केला व त्यास महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला.

आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा अमेरिकेतील संघर्षपुर्ण प्रवास:

भारतियांचा रोष पत्करून आनंदीबाई अखेरीस आपले डॉक्टर होण्याचे स्वप्नं उराशी बाळगुन 1885 साली वैद्यकिय शिक्षणाकरीता अमेरिकेला पोहोचल्या. अमेरिकेच्या वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पनेसिलवेनिया येथे त्यांनी प्रवेशअर्ज भरला त्यानंतर त्यांना या कॉलेज मधे प्रवेश देण्यात आला.

11 मार्च 1886 ला आनंदीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण करून एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसीन) वैद्यकिय पदवी प्राप्त केली परंतु अमेरिकेत देखील समस्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. तेथे राहतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. हाडे गोठवणा.या थंडीत तेथील खाणे पिणे त्यांना सोयीचे नसल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत गेला.

त्यांची प्रकृती सातत्याने खराब होत गेली आणि त्या ’टयुबरक्युलाॅसीस’ रोेगाच्या बळी पडल्या. आरोग्याची साथ नसतांना देखील त्यांचा दुर्दम्य आशावाद त्यांना ताकद पुरवित राहीला.अशक्याला शक्य करीत त्या पदवी घेऊन भारतात परतल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.

भारतात परतल्यानंतर त्या रूग्णांची सेवा करू लागल्या.अल्बर्ट एडवर्ड रूग्णालयात, प्रिंसलि स्टेट आॅफ कोल्हापुर येथे महिला डॉक्टर म्हणुन त्यांनी कामाची जवाबदारी स्विकारली. या नंतर काही दिवसांमधेच त्या क्षयरोगाने ग्रस्त झाल्या.आणि त्यातच 26 फेब्रुवारी 1987 ला वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

भारतात स्त्रियांना आणि लहान मुलांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता त्या आयुष्यभर संघर्ष करीत राहील्या आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टर बनल्या.त्यांच्या सन्मानार्थ इंस्टिटयुट फाॅर रिसर्च अॅण्ड डाॅक्युमेंटेशन इन सोशल सायन्स आणि लखनौ येथील एका गैर सरकारी संस्थेने वैद्यकिय क्षेत्रात आनंदीबाई जोशी सन्मान देण्यास सुरूवात केली.

या व्यतिरीक्त महाराष्ट्र शासनाने देखील आनंदीबाई जोशींच्या नावाने तरूण महिलांकरीता एक फेलोशिप प्रोग्राम ची सुरूवात करत त्यांना विशेष सन्मान दिला. आनंदीबाई गोपाळ जोशींचे व्यक्तिमत्व खरोखर सर्वांकरीता एक प्रेरणास्त्रोत आहे!

जीवनाबद्दलची पुस्तके :

१) कै. सौ. डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र काशीबाई कनेटकर –

२) आनंदी गोपाळ श्री. ज. जोशी यांची कादंबरी

३) डॉ. आनंदीबाई जोशी काक आणि कर्तृत्व

 

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम