माधवराव खंडेराव बागल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८९५-१९८६)

(जन्म : २८ मे १८९५ - मृत्यू : १९८६)

270

माधवराव खंडेराव बागल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : २८ मे १८९५ – मृत्यू : १९८६)

माधवराव खंडेराव

 

जन्म: २८ मे १८९५ (कोल्हापूर)

महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि चित्रकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे खंडेराव व कमलाबाई या दाम्पत्यापोटी झाला. खंडेराव बागल हे कोल्हापूर संस्थानात नोकरीस होते, नंतर त्यांनी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. माधवराव यांना काही काळ कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला होता. तसेच वडील खंडेराव बागल हे पक्के सत्यशोधकी विचारांचे असल्याने त्यांचा प्रभाव माधवराव यांच्यावर होता. माधवराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाचे एक नेते असल्याने त्यांना ‘भाई’ या उपाधीने लोक ओळखत असत.

वडिल – खंडेराव

 • माधवरावांचे वडिल हे एक प्रख्यात वकिल, तहसिलदार आणि समाजसुधारक हते.
 • बागल यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर जे. ज. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून चित्रकला, मॉडेलिंग आणि म्युरल सजावट अभ्यासक्रम पूर्ण केले.

सामाजिक कार्य :

 • १९३० भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.
 • १९३९ कोल्हापूरात प्रजा परिषदेची स्थापना,
 • १९४०-४७ पर्यंत महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या नेत्यांसोबत काम केले.
 • भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते अग्रेसर होते.
 • समाजसुधारक म्हणून दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले.
 • कोल्हापूरचे स्वातंत्र्य सैनिक होते.

माधवराव बागल यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सुरुवातीला एक चित्रकार म्हणून ते कार्यरत असले तरी त्यात न रमता त्यांनी स्वतःस राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत झोकून दिले. १९३२ सालापासून अस्पृश्योद्धार कार्यासाठी मंदिर प्रवेश, सहभोजने, हरिजन परिषदांचे आयोजन यांत ते अग्रेसर राहिले. भारतात विविध भागांत स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी घडल्या तशाच प्रकारच्या चळवळी अनेक संस्थांनी प्रदेशांत घडल्या. त्यामध्ये बागल यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोल्हापूर संस्थानात छत्रपतींच्या आधिपत्याखाली जबाबदार शासन पद्धतीची मागणी करणारी प्रजापरिषदेची चळवळ बागल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली (१९३९). त्यात त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. पुढे कोल्हापूर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४९). १९४२ सालापासून बागल हे कामगार लढ्यात उतरले. शाहू मिल मजूर संघटना, चित्रपट कामगार संघटना, कोल्हापूर संस्थान कामगार संघ अशा अनेक कामगार चळवळींत कार्य केल्यावर ते शेतकरी कामगार पक्षात काम करू लागले (१९५३). पन्हाळा येथील प्रजा परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी मराठी भाषिक प्रदेश एकीकरणासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख केला होता (१९४८). या चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कोल्हापूर जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते. भारतात समाजवाद आणण्यासाठी ही चळवळ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. १९५१ सालापासून ते महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत त्यांनी अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केलेच, तसेच आपल्या वाणी आणि लेखणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रसार केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीत माधवराव बागल अग्रभागी होते. १९५८ साली बेळगावमध्ये जो सीमा सत्याग्रह झाला, त्यामध्ये पहिले सत्याग्रही म्हणून बागल यांनी लढ्याचे नेतृत्व केले. त्यांना अटक होऊन त्यांची मंगळूर येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. १९६१ नंतर मात्र बागल यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणास अनुकूल भूमिका घेतली. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्याशी त्यांचा स्नेह होता. महाराष्ट्र सरकारच्या पंचवार्षिक योजना सल्लागार समिती, आर्ट एजुकेशन समिती अशा समित्यांवर त्यांनी काम केले. कोल्हापुरात राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे आणि स्मारके यांची उभारणी बागल यांच्या प्रयत्नांतून झालेली आहे. कोल्हापुरात लोकवर्गणीतून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करून उपस्थित जनसमूहातील सामान्य नागरिकाकडून त्याचे अनावरण केले होते (१९५०). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारण्यात आलेला हा देशातील पहिला पुतळा होता. तसेच महात्मा गांधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा व बिंदू चौकातील हुतात्मा स्तंभ उभारण्यात बागल यांचाच पुढाकार होता. बागल हे जसे चळवळीचे झुंजार नेतृत्व होते, तसे ते एक कलावंत आणि विचारवंत देखील होते. त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रे व साप्ताहिके व नियतकालिकांतून अनेक विषयावर लेखन केले. मार्क्सवादी विचारांचे नेते लेनिन, स्टालिन किंवा समाजवाद यांवर अनेक लेख लिहिले आणि देशीवादातून त्याची मांडणी केलेली आढळते. बागल यांनी आत्मचरित्रपर लेखन माझा जीवन प्रवास या नावाने पहिले तीन भाग, चौथा भाग सत्याग्रहातून सहकार्याकडे व पाचवा संघर्ष आणि सन्मान अशा पाच भागांत केले आहे. आठवणींच्या स्वरूपात बंधनातजीवन संग्रामसिंहावलोकन व माझ्या जीवनाच्या प्रेरणा हे ग्रंथ लिहिले.

बागल यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांनी ‘डी.लिट’ या सन्माननीय पदवीने त्यांचा गौरव केला. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टने त्यांना प्रतिष्ठेच्या शाहू पुरस्काराने गौरवले. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र’ पदवी दिली, तर भारताच्या पंतप्रधानांकडून ‘ताम्रपट’ प्रदान करून व राष्ट्रपतींकडून ‘पद्मभूषण’ या पदवीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

साहित्य:

 • १९६६ कालाविहार बहुजन समाजाचे शिल्पकार.
 • १९७० जिवनसंग्राम, आगरा सिंहवालोकाना, सहवासंताना
 • १९९८ भाई माधवरावजी निवडक लेखासंग्रह,

पुरस्कार :

 • १९७२ सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
 • भाई मधवराव बागल पुरस्कार कोल्हापूरच्या माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जातो. दरवर्षी एखाद्याव्यक्तीला समाजात उल्लेखनिय योगदानासाठी दिला जातो.

मृत्यू : १९८६ मध्ये त्यांचे निधन झाले.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम