चालू घडामोडी : 1 एप्रिल २०२१

109

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 1 April 2021 | चालू घडामोडी : १ एप्रिल २०२१

चालू घडामोडी –

1] ‘ला पेरुझ’ ही ____ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाणारी नौदल कवायत आहे.

1) मोरोक्को
2) फ्रान्स
3) इटली
4) स्पेन

उत्तर :- 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2021 पर्यंतच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्सच्या नेतृत्वाखाली ‘ला पेरुझ’ या नौदल कवायतीमध्ये भारत प्रथमच सहभागी होईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कुठे ‘साबरमती रिव्हरफ्रंट’ प्रकल्प विकसित केला जात आहे?

1) जुनागड
2) गांधीनगर
3) अहमदाबाद
4) भावनगर

उत्तर :- गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती नदीकिनारी ‘साबरमती रिव्हरफ्रंट’ प्रकल्प विकसित केला जात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या ठिकाणी स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकसित झालेल्या ‘महाराजा छत्रसाल कंव्हेनशन सेंटर’चे उद्घाटन झाले?

1) राजस्थान
2) मध्यप्रदेश
3) ओडिशा
4) गुजरात

उत्तर :- पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकसित झालेल्या ‘छत्रसाल कंव्हेनशन सेंटर’चे खजुराहो (मध्यप्रदेश) येथे उद्घाटन झाले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणते मंत्रालय ‘युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN)’ योजनेचा आरंभ करणार?

1) ग्रामीण विकास मंत्रालय
2) संसदीय कार्य मंत्रालय
3) गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय
4) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

उत्तर :- ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत भू-संसाधने विभागामार्फत ‘युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN)’ योजनेचा आरंभ केला जाणार आहे. ‘युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN)’ हा 14-अंकी ओळख क्रमांक असेल जो एका वर्षाच्या आत भारतातील प्रत्येक भूमिधारकाला दिला जाईल. ही योजना मार्च 2022 पर्यंत पूर्णपणे सुरू केली जाईल आणि आतापर्यंत 10 राज्यांत सुरू केली गेली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या कंपनीने सुवेझ कालव्यात अडकून पडलेल्या ‘एव्हर गिवेन’ या जहाजाची सुटका केली?

1) व्हॅन ओर्ड
2) जान दे नूल
3) डेमे
4) बॉस्कालिस

उत्तर :- 23 मार्च 2021 रोजी चीनहून नेदरलॅंडला जाणारे मालवाहू जहाज सुवेझ कालव्यात अडकले. बॉस्कालिस या डच कंत्राटदार कंपनीने सुवेझ कालव्यात अडकून पडलेल्या ‘एव्हर गिवेन’ या जहाजाची सुटका केली.
इजिप्तमध्ये असलेला सुवेझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा कालवा 193 किलोमीटर लांब आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील हा कालवा सर्वात छोटा दुवा आहे. सुवेझ कालवा मालवाहतुकीसाठी 1869 साली सुरू करण्यात आला. सुवेझ कालवा सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आणि पश्चिमेच्या देशातून ये-जा करणारी मालवाहतूक करणारी जहाजे दक्षिण अफ्रिकेच्या केप-ऑफ-गुड होपला वळसा घालून प्रवास करत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या व्यक्तीची ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली?

1) फिओन्नूला नि ओओलिन
2) अ‍ॅग्नेज कॉलामार्ड
3) मेरी लॉलर
4) दुब्रावका सीमोनोविक

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघाच्या एक मानवी हक्क अन्वेषक असलेल्या अ‍ॅग्नेज कॉलामार्ड यांची ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची चार वर्षांसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी 29 मार्च 2021 पासून ही भूमिका स्वीकारली. अ‍ॅग्नेज कॉलामार्ड या फ्रान्सच्या एक मानवाधिकार तज्ञ आहेत.
अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही मानवी हक्कांसाठी लढणारी जगातली एक प्रतिष्ठित अशासकीय संस्था आहे. संस्थेची स्थापना लंडन शहरात 1961 साली झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या राज्यात शिरूई कशुंग पर्वतशिखर आहे?

1) सिक्किम
2) हिमाचल प्रदेश
3) मणीपूर
4) आसाम

उत्तर :- मणीपूरच्या उखरूळ जिल्ह्यात शिरूई कशुंग पर्वतशिखर आहे. ते समुद्रसपाटीपासून 2,835 मीटर उंचीवर आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या कंपनीने दक्षिणपूर्व आशियाला उत्तर अमेरिकेसोबत जोडण्यासाठी समुद्राखालून दोन इंटरनेट केबल टाकण्याची योजना आखली आहे?

1) फेसबुक
2) ट्विटर
3) टेलिग्राम
4) रेडिट

उत्तर :- फेसबुक कंपनीने दक्षिणपूर्व आशियाला उत्तर अमेरिकेसोबत जोडण्यासाठी समुद्राखालून दोन इंटरनेट केबल टाकण्याची योजना आखली आहे. दोन केबलची नावे “बायफ्रॉस्ट” आणि “इको” अशी आहेत आणि ते इंडोनेशिया, सिंगापूर आणि उत्तर अमेरिका यांना जोडतील. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोण ‘बसंतरच्या लढाईचे विजेते’ म्हणून ओळखले जाणारे लष्करी अधिकारी आहे, ज्यांचे अलीकडेच निधन झाले?

1) जनरल दलबीर सिंग सुहाग
2) लेफ्टनंट जनरल वॉल्टर अँथनी गुस्तवो ‘वॅग’ पिंटो
3) लेफ्टनंट जनरल जॅक फर्ज राफेल जेकब
4) लेफ्टनंट कर्नल वेद प्रकाश ईयरे

उत्तर :- परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित लेफ्टनंट जनरल (निवृत्त) वॉल्टर अँथनी गुस्तवो ‘वॅग’ पिंटो यांचे 25 मार्च 2021 रोजी पुण्यात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. 1971 च्या युद्धामधल्या बसंतर इथल्या लढाईत GOC 54 या तुकडीच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वासाठी लेफ्टनंट जनरल पिंटो ओळखले जातात.
पुण्यात स्थायिक झालेले जनरल हे 1971 मधल्या भारत- पाकिस्तान युद्धात बसंतरची लढाई या प्रसिद्ध लढाईत 54 इन्फंट्री तुकडीच्या त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळे ‘बसंतरच्या लढाईचे विजेते’ म्हणून ओळखले जात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या देशात रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प आहे?

1) श्रीलंका
2) नेपाळ
3) भारत
4) बांगलादेश

उत्तर :- बांगलादेशाच्या पबना जिल्ह्यात रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा निर्माणाधीन अणुऊर्जा प्रकल्प 2.4 GWe (गीगावाट इलेक्ट्रिकल) क्षमतेचा असेल आणि हा बांगलादेशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असेल.
रशिया, भारत आणि बांगलादेश यांनी भारतीय कंपन्यांद्वारे बांगलादेशच्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील प्रेषण जोडणीच्या विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. 

# Current Affairs


 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम