चालू घडामोडी : १३ एप्रिल २०२१

88

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 12 April 2021 | चालू घडामोडी : १२ एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या दिवशी ‘जागतिक कंपवात दिन’ साजरा केला जातो?

1) 12 एप्रिल
2) 11 एप्रिल
3) 10 एप्रिल
4) 09 एप्रिल

उत्तर :- दरवर्षी 11 एप्रिल या दिवशी ‘जागतिक कंपवात दिन’ साजरा केला जातो.
उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्‍नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘लीलावती पुरस्कार 2020’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?

1) आयुष मंत्रालय
2) सांस्कृतिक मंत्रालय
3) शिक्षण मंत्रालय
4) माहिती व प्रसारण मंत्रालय

उत्तर :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर आधारित असलेल्या ‘AICTE लीलावती पुरस्कार 2020’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महिलांचे आरोग्य, साक्षरता, उद्योजकता, स्व-रक्षण, स्वच्छता आणि कायदेशीर जागृती यासारख्या अनेक विषयांमध्ये महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) याने लीलावती पुरस्काराची स्थापना केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] बांगलादेशात अनावरण करण्यात आलेल्या ‘लिटल गुरु’ अ‍ॅपचा हेतू काय आहे?

1) संस्कृत शिकणे
2) हिंदी शिकणे
3) तामिळ शिकणे
4) यापैकी नाही

उत्तर :- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (ICCR) चीन आणि बांगलादेशात ‘लिटल गुरु’ नामक जगातील पहिल्या गेमिफाइड संस्कृत शिक्षण अॅपचे अनावरण केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या देशात ‘सेरोजा’ नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकले?

1) भारत
2) बांगलादेश
3) श्रीलंका
4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- पश्चिम ऑस्ट्रेलियात ‘सेरोजा’ नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकले. हे तृतीय श्रेणीचे वादळ होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या राज्यात उमंगोट नदी वाहते?

1) हिमाचल प्रदेश
2) मेघालय
3) उत्तराखंड
4) ओडिशा

उत्तर :- मेघालयातील पश्चिम जैंटिया हिल्स जिल्ह्यातील डाकी या शहरातून उमंगोट नदी वाहते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या देशाने 3000 वर्षांपूर्वीचे “हरविलेले सुवर्ण शहर” शोधून काढले असल्याची घोषणा केली?

1) भारत
2) इथिओपिया
3) इजिप्त
4) पाकिस्तान

उत्तर :- इजिप्तच्या पुरातत्व अभियानाने “द राइज ऑफ एटेन” शहर म्हणून ओळखले जाणारे 3000 वर्षांपूर्वीचे “हरविलेले सुवर्ण शहर” शोधून काढले आहे, जे लक्सर या पुरातन-वारसा असलेल्या शहरात सापडले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या प्रदेशात थ्वेट्स हिमखंड आहे?

1) अंटार्क्टिका
2) अलास्का
3) ग्रीनलँड
4) आईसलँड

उत्तर :- अंटार्क्टिकाच्या प्रदेशात थ्वेट्स हिमखंड आहे. त्याचा आकार 1.9 लक्ष चौरस किलोमीटर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला मान्यता देणारा पहिला देश ठरला?

1) भारत
2) सिंगापूर
3) अमेरिका
4) रशिया

उत्तर :- सिंगापूर हा प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्यादरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत नोव्हेंबर 2012 साली RCEP वाटाघाटी करार औपचारिकपणे लागू झाला. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] संयुक्त अरब अमिरात या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरचे नाव काय आहे?

1) अनुशेह रायसन
2) मरियम अल मन्सुरी
3) नौरा अल काबी
4) नौरा अल-मात्रोशी

उत्तर :- संयुक्त अरब अमिरात या देशाने त्याच्या अंतराळ कार्यक्रमासाठी दोन अंतराळवीरांची नावे जाहीर केली असून प्रथमच एका महिलेचा त्यात समावेश केला गेला आहे. नोरा अल-मात्रोशी आणि मोहम्मद अल-मुल्ला ही त्यांची नावे आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] ऑनलाईन विवाद निराकरण (ODR) याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1. ODR हा न्यायालयाबाहेरच वाद सोडविण्यासाठीचा मार्ग आहे.

2. नीती आयोगाने ऑनलाईन डिस्प्यूट रेजोल्यूशन (ODR) पुस्तिका तयार केली.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

1) फक्त 1
2) फक्त 2
3) A आणि B
4) यापैकी एकही नाही

उत्तर :- दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
नीती आयोगाने न्यायालयाबाहेरच वाद सोडविण्यासाठी ऑनलाईन डिस्प्यूट रेजोल्यूशन (ODR) पुस्तिका तयार केली आहे. न्यायव्यवस्था या कमतरतांवर काम करत असूनही ऑनलाईन विवाद निराकरण पद्धतीने सतत न्यायालयासमोर येणाऱ्या अनेक प्रकारच्या दाव्यांची संख्या कमी करत मदतीचा हात पुढे केला आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम