Current Affairs : 14 April 2020 | चालू घडामोडी : १४ एप्रिल २०२०

116

Current Affairs : 14 April 2020

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 14 April 2020 | चालू घडामोडी : १४ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – 

‘या’ ठिकाणी २० एप्रिलपासून लॉकडाउन शिथील होणार – मोदी :
  • देशातील प्रत्येक भागावर २० एप्रिलपर्यंत बारीक नजर ठेवली जाईल. जे विभाग करोनाचे हॉटस्पॉट होणार नाहीत, अशी खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी २० एप्रिलपासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथील केले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
  • करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
  • देशवासी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. तुम्हाला किती त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे. तुम्हीच भारताला वाचवलंय, मी सर्वांना नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. “इतर देशांच्या तुलनेत भारताने करोना रोखण्यासाठी जास्त प्रयत्न केले. यामध्ये तुम्हीदेखील मदत केली.
  • करोनाचा एकही रुग्ण नसताना भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु केली होती. १०० पर्यंत पोहोचण्याआधी परदेशी नागरिकांना आयसोलेशन होण्यास सांगण्यात आलं होतं. ५५० प्रकरणं असताना २१ दिवसांचा लॉकडाउनचा मोठा निर्णय जाहीर केला. भारताने समस्या वाढेल याची वाट पाहिली नाही. समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन त्याचेवळी रोखण्याचा प्रयत्न केला,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
३ मेपर्यंत लॉकडाउन कायम, नरेंद्र मोदींनी केलं जाहीर :
  • देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दोन हजाराच्या वर गेली आहे. सोमवारी ३५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या २३३४ इतकी झाली आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६० वर पोहोचली आहे.
  • महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.
देशभरात अजून १९ दिवस लॉकडाउन, मोदींनी केलं शिक्का :
  • करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही.
  • त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
  • “करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे.
  • बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.
भाषणाआधी मोदींचं टि्वट, दिला हा संदेश :
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन जाहीर केला होता. या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. मात्र त्याआधी पंतप्रधान मोदींनी सकाळी सातच्या सुमारास ट्विट करुन देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
  • “आज देशभरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध उत्सवांनिमित्त सर्वांना शुभेच्छा. या उत्सावांच्या माध्यमातून देशामधील बंधुभाव वाढवणारी भावना निर्माण होवो. तसेच हे उत्सव तुमच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येतील. या उत्सवांमधून आपल्याला आगामी काळात कोविड १९ विरोधातील सामूहिक लढाईसाठी अधिक सामर्थ्य मिळू दे,” अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या.
  • आज देशभरातील अनेक भागांमध्ये सौर कालगणनेनुसार नवीन वर्षाला सुरुवात होत आहेत. ओदिशा, आसाम, ईशान्य भारतामधील राज्ये, केरळ, कर्नाटकमध्ये आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पना संक्रांती, ज्याला महा विशुबा संक्रांती म्हणून देखील ओळखले जाते हा सण आज खास करुन ओदिशामध्ये साजरा केला जातो. सौर कालगणनेनुसार हा मेशाच्या पारंपारिक महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आज तामीळ लोकांचे नवीन वर्ष सुरु होते. या उत्सवाला पुथांडू असे म्हणतात. ही कालगणनाही सुर्यावर आधारितच असते. आसामबरोबरच ईशान्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये आजचा दिवस बोहाग बिहू म्हणून साजरा केला जातो.
करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ देशातील पहिले राज्य, कसे शक्य झाले ते समजून घ्या :
  • देशात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे. केरळने करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कसा कमी केला? त्यावर कसे नियंत्रण मिळवले? हे समजून घेणे महत्वाचे आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
  • केरळने सर्वप्रथम करोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा २८ दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्प्ट दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड ठेवला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे शक्य झाले.
  • ३० जानेवारीला केरळमध्ये करोना व्हायरसचा एक रुग्ण होता. १३ एप्रिलला ही संख्या ३७८ आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १९८ करोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. २७ मार्चला केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन करोनाग्रस्त आढळले. १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने Covid-19 चा अलर्ट जाहीर केला व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.
गुगल प्रमुखांची भारताला ५ कोटींची मदत :
  • गुगलचे प्रमुख सुंदर  पिचाई यांनी भारताला करोनाशी लढा देण्यासाठी ५ कोटी रुपये दिले आहेत. ही मदत त्यांनी ‘गिव्ह इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेला दिली असून गिव्ह इंडियाने ट्विट संदेशात म्हटले आहे, की गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी जी मदत दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत.
  • याआधीही गुगलने जगात लाखो लोकांना संसर्गाच्या विळख्यात ओढणाऱ्या करोनाविरोधात उपायांसाठी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत दिली होती. त्यात दोनशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक स्वयंसेवी संस्थात करण्यात आली होती.
  • गुगलने अ‍ॅपलसमवेत भागीदारीत करोना संसर्गित व्यक्तींचे संपर्क शोधण्यासाठी उपयोजनाची निर्मिती केली होती. याआधी टाटा ट्रस्ट व टाटा समूह यांनी करोनाचा सामना करण्यासाठी १५०० कोटींची मदत दिली होती.
  • विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी ११२५ कोटी रुपये दिले होते. इतर कंपन्यांनीही मदत दिली असून पेटीएमने ४ लाख मास्क व १० लाख आरोग्य उत्पादने लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दलाला दिली होती.

    # Current Affairs


     

    ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

    ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

    ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

    अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

    आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

     

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम