चालू घडामोडी : १४ एप्रिल २०२१

207

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 14 April 2021 | चालू घडामोडी : १४ एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या ठिकाणाहून दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागाने पहिली किसान रेलगाडी रवाना केली?

1) विजयवाडा
2) मचलीपट्टनम
3) एलूर
4) नुझविड

उत्तर :- दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागाने नुझविड येथून पहिली किसान रेलगाडी रवाना केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या देशाने त्याच्या राष्ट्रीय अण्वस्त्र तंत्रज्ञान दिनानिमित्त नाटांझ अणू प्रकल्पात प्रगत न्यूक्लियर सेंटरीफ्युज सुविधा कार्यरत केली?

1) इराण
2) भारत
3) फ्रान्स
4) चीन

उत्तर :- इराणने 10 एप्रिल 2021 रोजी त्याच्या राष्ट्रीय अण्वस्त्र तंत्रज्ञान दिनानिमित्त नाटांझ अणू प्रकल्पात प्रगत न्यूक्लियर सेंटरीफ्युज सुविधा कार्यरत केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या भारतीय वंशाच्या व्यवसायिकाला संयुक्त अरब अमीरात देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे?

1) युसुफअली एम.ए.
2) अनील भुस्री
3) सोहन रॉय
4) शंतनू नारायण

उत्तर :- संयुक्त अरब अमीरात देशातील अबू धाबीच्या क्राउन प्रिन्सने भारतीय वंशाचे व्यवसायिक असलेले युसुफअली एम.ए. यांना समाजातील उदात्त आणि सेवाभावी योगदानाबद्दल अबू धाबीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] ‘आहार क्रांती’ या नवीन अभियानाचे ध्येय काय आहे?

1) उत्तम आहार उत्तम विचार
2) आपली कृती आपले भविष्य आहे
3) एकत्र वाढा, पोषण करा, शाश्वत रहा
4) शून्य उपासमारीचे जग

उत्तर :- 12 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ करण्यात आला. पौष्टिकदृष्ट्या संतुलित आहाराची आवश्यकता आणि सर्व स्थानिक फळ आणि भाजीपाला यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी हे अभियान आखण्यात आले आहे. हे विज्ञान भारती (विभा) आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम (GIST) यांनी सुरू केलेले अभियान आहे. अभियानाचे “उत्तम आहार उत्तम विचार” (‘Good Diet-Good Cognition’) हे ध्येय आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन’ साजरा करतात?

1) 09 एप्रिल
2) 11 एप्रिल
3) 12 एप्रिल
4) 10 एप्रिल

उत्तर :- दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन’ साजरा करतात. शांतीच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात. 1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणाला फ्रान्सचा “ऑनर ऑफ द नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स” नामक द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला?

1) गुनीत मोंगा
2) अरुण रंगाचारी
3) अनुराग कश्यप
4) विक्रमादित्य मोटवने

उत्तर :- 13 एप्रिल रोजी भारतीय चित्रपट निर्मात्या गुनीत मोंगा यांना फ्रान्सचा “ऑनर ऑफ द नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स” नामक द्वितीय सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोण भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत?

1) सुनील अरोरा
2) सुशील चंद्र
3) ओम प्रकाश रावत
4) अचल कुमार ज्योती

उत्तर :- सुशील चंद्र भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 13 एप्रिल 2021 रोजी त्यांनी पदाचा भार स्वीकारला. त्यांनी सुनील अरोरा यांची जागा घेतली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या देशात ‘गनबाला रडार स्टेशन’ आहे?

1) जपान
2) जर्मनी
3) अमेरिका
4) तिबेट

उत्तर :- समुद्रसपाटीपासून 5374 मीटर उंचीवर असलेले जगातील सर्वोच्च उंचीवरील हाताने चालवलेले जाणारे ‘गनबाला रडार स्टेशन’ तिबेटच्या दुर्गम भागात आहे, जे भारत आणि भूटानच्या सीमेजवळ आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] भारत _____ सोबत ‘KAZIND’ नामक एक संयुक्त लष्करी कवायत आयोजित करणार आहे.

1) कुवैत
2) कझाकस्तान
3) किर्गिझस्तान
4) बांगलादेश

उत्तर :- भारत कझाकस्तान सोबत ‘KAZIND’ नामक एक संयुक्त लष्करी कवायत आयोजित करणार आहे. 

 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या राज्यात चिलिका तलाव आहे?

1) छत्तीसगड
2) पश्चिम बंगाल
3) ओडिशा
4) जम्मू व काश्मीर

उत्तर :- चिलिका तलाव ओडिशाच्या पुरी, खुर्द आणि गंजम जिल्ह्यात पसरलेले आहे. तो खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. 

 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम