Current Affairs : 14 December 2020 | चालू घडामोडी : १४ डिसेंबर २०२०

214

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 14 December 2020 | चालू घडामोडी : 14 डिसेंबर २०२०

चालू घडामोडी –  

ब्राझीलच्या गणीतज्ञ डॉ. कॅरोलिना अरौजो यांना त्यांच्या बीजगणित भूमितीतल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘तरुण गणितज्ञांसाठी रामानुजन पुरस्कार 2020’ देण्यात आला आहे. हा पुरस्कार ICTP (इंटरनॅशनल सेंटर फॉर थ्योरेटिकल फिजिक्स) आणि आंतरराष्ट्रीय गणित संघ (IMU) यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारतर्फे देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या प्रथम अभारतीय ठरल्या. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

12 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती दिन “हेल्थ फॉर ऑल: प्रोटेक्ट एव्हरीवन” या विषयाखाली साजरा करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

पाटलीपुत्र हा सिंधू संस्कृतीचा भाग नव्हता आणि ते ठिकाण आजच्या पटना शहरात होते. सिंधू संस्कृतीचा भाग असलेल्या प्राचीन भारतीय उपखंडातली काही शहरे हडप्पा, कालीबंगन, राखीगरी, कोट दिजी, रूपनगर, बालाकोट आणि दामाबाद अशी आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

आंध्रप्रदेश सरकारने ‘वाय.एस.आर. जगनन्ना सास्वत भू हक्कू-भू रक्षा पथकम’ नामक भूमी सर्वेक्षण कार्यक्रमासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) सोबत सामंजस्य करार केला. 21 डिसेंबर 2020 रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

नवी दिल्लीत संसदेची नवीन इमारत उभारण्यात येत आहे. संसदेच्या नवीन इमारतीत लोकसभेच्या अंतर्भागाची रचना करताना राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ ही संकल्पना म्हणून निवडण्यात आली आहे. तर राज्यसभेसाठी राष्ट्रीय पुष्प ‘कमळ’ आणि मध्य विश्रांतीगृहासाठी ‘वडाचे झाड’ निवडण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जोए बिडेन आणि कमला हॅरिस यांना “टाइम पर्सन ऑफ द इयर 2020″ हा किताब देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

आशियाई विकास बँक (ADB) याने विकसनशील देशांना कोविड-19 लस खरेदी करण्यासाठी 9 अब्ज डॉलर एवढ्या खर्चाच्या एशिया पॅसिफिक वॅक्सीन अॅक्सेस फॅसिलिटी (APVAX) उपक्रमाचा शुभारंभ केला.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेनी “प्रिपेरिंग इंडिया फॉर क्लायमेट इव्हेंट” या शीर्षकाखाली एक अभ्यास प्रकाशित केला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) भारत क्रिडा पुरस्कार 2020’ समारंभात कुस्तीपटू बजरंग पुनिया (पुरुष) आणि नेमबाज इलावेनिल वलारीवन (महिला) यांना ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ सन्मान जाहीर झाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) निधी हस्तांतरण प्रणाली रोखे किंवा पैशाच्या तत्काळ हस्तांतरणासाठी सक्षम करते. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम