Current Affairs : 15 December 2020 | चालू घडामोडी : १५ डिसेंबर २०२०
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 15 December 2020 | चालू घडामोडी : १५ डिसेंबर २०२०
चालू घडामोडी –
कोणत्या राज्य सरकारने अपंगांना सहाय्यक उपकरणे वाटप करण्याच्या उद्देशाने “महाशरद” या नावाने एका डिजिटल मंचाचा शुभारंभ केला?
चालू घडामोडी –
भारताच्या पहिल्या स्वदेशी उमेदवार mRNA लसीला पहिला/दूसरा टप्प्याची मानवी वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. HGCO19 ही स्वदेशी उमेदवार mRNA लस पुणे शहरातल्या जेनोवा कंपनीने विकसित केली आहे. लस पूर्णपणे सिंथेटीक आहे आणि वाढीसाठी त्यांना अंडी किंवा जीवाणूची आवश्यकता नसते. लस कमी खर्चात त्वरीत उत्पादन करता येते.
चालू घडामोडी –
कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने ‘BSE ई-अॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड’ किंवा BEAM नामक एका इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंचाची घोषणा केली आहे.
चालू घडामोडी –
‘पॅरिस हवामान करार’ हा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी आणि आर्थिक बाबी हाताळण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ हवामानविषयक बदल करार कार्यचौकट’ (UNFCCC) याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला आणि 2020 साली लागू होणारा एकमेव असा (पहिलाच) करार आहे. कराराला दि. 12 डिसेंबर 2015 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या UNFCCC च्या 21 व्या पक्षीय परिषदेत 195 देशांमधील प्रतिनिधींद्वारा एकमताने स्वीकारले गेले. पूर्व-औद्योगिक पातळीच्यावर 2 अंश सेल्सियसच्या खाली जागतिक सरासरी तापमान वाढ नियंत्रित करणे आणि पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अश्या अनेक कारकांच्या हेतूने हा करार आहे.
चालू घडामोडी –
सेवानिवृत्त कर्नल पृथ्वीपालसिंग गिल भुदल, नौदल आणि हवाई दलात सेवा दिलेले एकमेव भारतीय आहेत. त्यांचे नुकतेच निधन झाले.
चालू घडामोडी –
लाँसेट सिटीझन्स कमिशन या संस्थेनी “रीइमेजीनिंग इंडियाज हेल्थ सिस्टम” उपक्रमाची घोषणा केली आहे. संस्था दहा वर्षांच्या कालावधीत भारतात सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रदान करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दीष्ट ठेवते.
चालू घडामोडी –
‘रॉसबाय वेव्ह’ या लहरी ग्रहाचे वातावरण आणि महासागरांच्या गतीशी संबंधित आहेत, ज्यांना ‘ग्रहीय लहरी’ म्हणून ओळखले जाते. या लहरींचा शोध प्रथम कार्ल-गुस्ताफ अरविद रॉसबाय यांनी लावला होता.
चालू घडामोडी –
ट्रॉपिकल मॉन्टेन ग्रासलँड (TMG) हा अधिवासाचा एक प्रकार आहे, जिथे समुद्रसपाटीपासून जास्त उंचीच्या भागात गवताळ प्रदेश असतो.
चालू घडामोडी –
मोरोक्कोच्या सैन्याने बांधलेली ‘बर्म भिंत’ पॉलिसारिओ फ्रंट अंतर्गत पश्चिम सहारामधल्या सहारवी अरब डेमोक्रॅटिक रिपब्लिक (SADR) पासून मोरोक्कोच्या ताब्यात असलेल्या पश्चिम सहाराचा प्रदेश विभक्त करते. अटलांटिक किनाऱ्यापासून मोरोक्कोच्या डोंगरापर्यंत ही भिंत आहे.
चालू घडामोडी –
मध्यप्रदेश सरकारने अंगणवाडी व डेकेअर सेंटर मार्फत देण्यात येणार्या सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मातृ सहयोगिनी समिती’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत 10 मातांचा समावेश असणार. समितीचे अध्यक्ष लाभार्थी आणि माता असणार आहेत जे दर आठवड्याला शिधा वितरणावर लक्ष ठेवणार.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.