Current Affairs : 16 December 2020 | चालू घडामोडी : १५ डिसेंबर २०२०

148

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 16 December 2020 | चालू घडामोडी : १६ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

तमिळ महाकवी सुब्रमण्य भारती यांची 138 वी जयंती साजरी करण्यासाठी वनावील सांस्कृतिक केंद्राच्यावतीने 11 डिसेंबर 2020 रोजी ‘आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020’ याचे आयोजन केले गेले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

केशव सुरी फाउंडेशनने भारताचा पहिला ‘LGBT+ कार्यस्थळ समानता निर्देशांक’ जाहीर केला आहे. निर्देशांक FICCI, प्राइड सर्कल आणि स्टोनवॉल यूके या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी तृतीयपंथी आणि समलैंगिक लोकांना समान संधी मिळावी या उद्देशाने कंपन्यांनी स्वीकारलेल्या विविधतापूर्ण आणि समावेशन पद्धतींची माहिती स्पष्ट करतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

ओडिशा राज्यात ‘2023 आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) पुरुष हॉकी विश्वचषक’ स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. सामने राऊरकेला आणि भुवनेश्वर येथे खेळले जाणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) ‘बंगाबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांच्या नावाने ‘रचनात्मक अर्थव्यवस्था’ क्षेत्रात 50,000 डॉलर एवढ्या रोख रकमेसह आंतरराष्ट्रीय बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, जे दोन वर्षांत एकदा दिले जाणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

गूगल कंपनी ‘प्रोजेक्ट लून’ राबवित आहे आणि ती गूगलची एक उपकंपनी आहे. जगाच्या पाठीवर दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुलभ करणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हीलियमने भरलेले फुगे पाठवून, त्यावरील उपकरणांद्वारे हवाई वायरलेस नेटवर्क तयार केले जात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

पश्चिम घाट प्रदेशात बेडकाची अतिदुर्मिळ “मिरिस्टीका स्वॅम्प ट्रीफ्रॉग” (शास्त्रीय नाव: मर्कुरना मिरिस्टीकापॅलूस्ट्रिस) ही जात आढळून आली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘आत्मनिर्भर भारत पॅकेज 2.0’च्या अंतर्गत वित्त मंत्रालयाने ‘राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य’ (SASCE) योजना जाहीर केली आहे. योजनेचा लाभ तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांना मिळणार आहे. कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यांना कर महसूलात येत असलेल्या तुटीची स्थिती बघता राज्यांच्या भांडवली खर्चात हातभार लावण्यासाठी ही योजना आहे. अर्थखात्याकडून आतापर्यंत 27 राज्यांच्या एकूण 9,879.61 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चास मंजूरी दिली गेली. पहिला हप्ता म्हणून 4,939.81 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत राज्यांना दिला गेला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

दरवर्षी 14 डिसेंबर या दिवशी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) याच्या पुढाकाराने देशात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ साजरा केला जातो. हा दिवस जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले बदल यांच्याविषयी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच ऊर्जा संसाधनांच्या बचतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो. 2001 साली 14 डिसेंबर रोजी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) याने ‘भारत ऊर्जा संवर्धन कायदा’ याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

नीती आयोगाने ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ या शीर्षकाखाली एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ म्हणजे आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाच्या कामाचा पुढचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून परीक्षणाचे काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे ‘व्हिजन 2035’ सहायक ठरणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या कार्यक्षेत्रात भारताने एका राजनैतिक पोहोच कार्यक्रमाच्या रूपाने ‘सिनेमास्कोप / CinemaSCOpe’ उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत दर महिन्याला रशियन भाषेत अनुवादित केलेल्या 12 हून अधिक भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या स्थापनेची 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्ष 2021 हे “SCO संस्कृतीचे वर्ष” म्हणून पाळण्यात येणार आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम