चालू घडामोडी : १८ एप्रिल २०२१
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 18 April 2021 | चालू घडामोडी : १८ एप्रिल २०२१
चालू घडामोडी –
1] कोणत्या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात?
1) 17 एप्रिल
2) 14 एप्रिल
3) 15 एप्रिल
4) 16 एप्रिल
उत्तर :- दरवर्षी 16 एप्रिल या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात. सर्व लोकांच्या दैनंदिन जीवनात आवाजाचे महत्त्व दर्शविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. 2021 साली या दिवसाची संकल्पना ‘वन वर्ल्ड, मेनी वॉइसेस’ ही आहे.
चालू घडामोडी –
2] कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2021’ हा अहवाल प्रकाशित केला?
1) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम
2) संयुक्त राष्ट्रसंघ मनुष्य वसाहती कार्यक्रम
3) संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी
4) संयुक्त राष्ट्रसंघ निर्वासित संस्था
उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी (UNFPA) या संस्थेने ‘माय बॉडी इज माय ओन’ या शीर्षकासह ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2021’ हा अहवाल प्रकाशित केला आहे.
चालू घडामोडी –
3] NIXI ही भारतीय कंपनी अधिनियमाच्या कलम 25 अन्वये स्थापना झालेली एक ना-नफा कंपनी आहे; NIXI याचे पूर्णनाव काय आहे?
1) नेटवर्क इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया
2) नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया
3) नॅचरल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया
4) नॉनएक्सक्लुझिव्ह इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया
उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव आणि नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याचे अध्यक्ष अजय प्रकाश साहनी यांच्या हस्ते 15 एप्रिल 2021 रोजी NIXI याच्या तीन अभिनव उपक्रमांचे उद्घाटन झाले.
IPv6 तज्ज्ञ मंडळ (IP गुरु)
NIXI अॅकॅडमी
NIXI-IP-INDEX
IPv6 (इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6) यासाठी जागृती आणि देशात अंमलबजावणी यासाठी दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यासह NIXI सहाय्यक भूमिका निभावणार आहे.
चालू घडामोडी –
4] भारतात खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी ई-व्हिसा दिला जातो?
1) वैद्यकीय
2) परिषद
3) वैद्यकीय परिचर
4) वरील सर्व
उत्तर :- भारतात पर्यटक, व्यवसाय, परिषद, वैद्यकीय आणि वैद्यकीय परिचर अशा पाच वर्गासाठी ई-व्हिसा दिला जातो
चालू घडामोडी –
5] सालमोन ही _____ प्रजातीची एक जात आहे.
1) खेकडा
2) ऑक्टोपस
3) कासव
4) मत्स्य
उत्तर :- सालमोन ही मत्स्य प्रजातीची एक जात आहे.
चालू घडामोडी –
6] 2022 सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?
1) बॉक्सस्टर प्रकल्प
2) स्पायडर प्रकल्प
3) हारू ओनी प्रकल्प
4) मिशन ई प्रकल्प
उत्तर :- 2022 सालापर्यंत ई-इंधन (कॉम्प्लेक्स हायड्रोकार्बन इंधन) तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव ‘हारू ओनी प्रकल्प’ असे आहे. हा प्रकल्प चिली देशात आहे.
चालू घडामोडी –
7] कोणत्या दिवशी ‘हिमाचल दिन’ साजरा करतात?
1) 15 एप्रिल
2) 14 एप्रिल
3) 13 एप्रिल
4) 12 एप्रिल
उत्तर :- हिमाचल प्रदेश राज्य दरवर्षी 15 एप्रिल या दिवशी ‘हिमाचल दिन’ म्हणून त्याचा स्थापना दिवस साजरा करतात. 15 एप्रिल 1948 रोजी राज्याची स्थापना झाली.
चालू घडामोडी –
8] फेसबुक कंपनीचा पहिला अक्षय ऊर्जा प्रकल्प _____ येथे आहे.
1) केरळ
2) पश्चिम बंगाल
3) कर्नाटक
4) दिल्ली
उत्तर :- फेसबुक कंपनीने कर्नाटकात 32 मेगावॅट क्षमतेचा त्याचा पहिला अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारला
चालू घडामोडी –
9] कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापना केलेल्या नवीन नियमन पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याचे प्रमुख असेल?
1) बी. पी. कानुनगो
2) एम. राजेश्वर राव
3) एम. के. जैन
4) एम. डी. पात्रा
उत्तर ;- भारतीय रिझर्व्ह बँकेने उपगव्हर्नर एम. राजेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन नियमन पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याची स्थापना केली. ही संस्था नियमन, परिपत्रके, अहवाल देणारी प्रणाली आणि त्यांचे कार्य अधिक सुलभ करण्यासाठी केंद्रीय बँकेच्या अनुपालन प्रक्रियेचा आढावा घेईल.
चालू घडामोडी –
10] फेसबुक आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थानी प्रकाशित केलेल्या ‘सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
1) 33 वा
2) 54 वा
3) 47 वा
4) 49 वा
उत्तर :- इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021’ याच्या यादीत भारताचा क्रमांक 49 वा आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर स्वीडन देश आहे आणि त्याच्याखालोखाल अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग हे देश आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents