चालू घडामोडी : २ जुलै 2021
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 2 JULY 2021 | चालू घडामोडी : २ जुलै २०२१
चालू घडामोडी –
Q1] खालीलपैकी कोणता ‘ITU जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020’ याच्या यादीत भारताचा क्रमांक आहे?
1) 37 वा
2) 10 वा
3) 33 वा
4) 12 वा
उत्तर :- आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (GCI) 2020’ यानुसार, सायबर सुरक्षेच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम देशांच्या यादीत भारताचा दहावा क्रमांक तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात चौथा क्रमांक आहे.
GCI 2020 याच्या यादीत प्रथम क्रमांकावर संयुक्त राज्ये अमेरिका हा देश आहे. त्याखालोखाल द्वितीय क्रमांकावर ब्रिटन आणि सौदी अरब हे देश तर तृतीय क्रमांकावर एस्टोनिया आहे.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या ठिकाणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कव्हरेज (UIIC) या संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे?
1) चेन्नई
2) मुंबई
3) नवी दिल्ली
4) बंगळुरू
उत्तर :-चेन्नई या शहरात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कव्हरेज (UIIC) या संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे.
नीती आयोगाने सरकारच्या मालकीची विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कव्हरेज (UIIC) या संस्थेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
चालू घडामोडी –
Q3] खालीलपैकी कोणता नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांना देण्यात आलेला कार्यकाल विस्तार आहे?
1) जून 2023
2) जून 2022
3) जून 2024
4) जून 2025
उत्तर :- नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांना 1 वर्षाचा कार्यकाल विस्तार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आता जून 2022 मध्ये संपणार.
चालू घडामोडी –
Q4] घोषित करण्यात आलेल्या “अशांत क्षेत्रात” सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ‘AFSPA कायदा’ _____ यांना विशेष अधिकार प्रदान करतो.
1) भारतीय हवाई दल
2) भारतीय निमलष्करी दल
3) भारतीय सशस्त्र दल
4) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
उत्तर :-सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958 (AFSPA) हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून “अशांत क्षेत्र” घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात. ‘अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम-1976’ नुसार एखाद्या क्षेत्राला “अशांत” घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी. हा कायदा लागू केल्यास, भारतीय सशस्त्र दलाला कोणत्याही सूचनेशिवाय कोणालाही कधीही कैदेत टाकण्याचे अधिकार दिले जाते आणि ते कुठेही मोहीम चालविण्यास सक्षम असते. भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी 15 ऑगस्ट 1942 रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.
30 जून 2021 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने पुढच्या आणखी 6 महिन्यांसाठी नागालँड राज्याला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केले.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय संसदीयवाद दिवस’ साजरा करतात?
1) 30 जून
2) 28 जून
3) 27 जून
4) 29 जून
उत्तर :- दरवर्षी 30 जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय संसदीयवाद दिवस’ साजरा करतात. हा दिवस आधुनिक संस्थांना आकार देण्यासाठी सरकारच्या संसदीय यंत्रणेचे महत्त्व प्रदर्शित करतो.
1889 साली स्थापना झालेल्या आंतर-संसदीय संघाच्या (IPU) स्थापनादिनी हा दिवस साजरा केला जातो. आंतर-संसदीय संघ (IPU) ही जगभरातील संसदांची जागतिक संघटना आहे.
चालू घडामोडी –
Q6] कोणती कंपनी तामिळनाडूमध्ये कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामासाठी तंत्रज्ञानाचा पुरवठा करीत आहे?
1) यांडेक्स
2) रोसएटम
3) रोझटेक
4) रस्नोनो
उत्तर :-भारतातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या एकूण दोन हजार मेगावॉट क्षमतेच्या संयंत्र 5 आणि 6 यांच्या बांधकामाला 29 जून रोजी कुडनकुलम (तिरुनेलवेली जिल्हा, तामिळनाडू) येथे सुरुवात झाली. प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा रशियाची रोसएटम कंपनी करीत आहे.
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या ठिकाणी ‘युरोपियन मेडिसीन एजन्सी’ या संस्थेचे मुख्यालय आहे?
1) नैरोबी, केनिया
2) अॅम्सटरडॅम, नेदरलँड
3) हेग, नेदरलँड
4) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
उत्तर :- नेदरलँडच्या अॅम्सटरडॅम येथे मुख्यालय असलेली युरोपियन मेडिसीन एजन्सी ही औषधी उत्पादनांचे मूल्यांकन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी जबाबदार असलेली युरोपीय संघाची सर्वोच्च संस्था आहे.
युरोपियन मेडिसीन एजन्सीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या कंपनीने तयार केलेली ‘कोविडशिल्ड’ लसीला त्याच्या ‘ग्रीन पास’साठी मंजूर असलेल्या यादीतून वगळले.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या देशाला 2021 या वर्षात ‘मलेरिया-मुक्त’ घोषित करण्यात आले?
1) चीन
2) एल साल्वाडोर
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही
उत्तर :-जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एल साल्वाडोर आणि चीन या देशांना ‘मलेरिया-मुक्त’ घोषित केले. या देशांमध्ये गेल्या तीन वर्षात मलेरिया आजाराची एकही प्रकरणे नोंदविली गेलेली नाहीत.
चालू घडामोडी –
Q9] आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेला (PMFME) _____ रोजी एक वर्ष पूर्ण झाले.
1) 29 जून 2021
2) 27 जून 2021
3) 28 जून 2021
4) 30 जून 2021
उत्तर :- 29 जून 2021 रोजी, अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले.
योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस’ साजरा करतात?
1) 27 जून
2) 28 जून
3) 30 जून
4) 29 जून
उत्तर :- दरवर्षी 30 जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस’ साजरा करतात. पृथ्वीसभोवताल फिरणाऱ्या लघुग्रहांविषयी जागृती वाढविण्यासाठी तसेच ग्रहाला असलेला संभाव्य धोका आणि त्यांचे रहस्य शोधून काढण्यासाठी या दिवशी प्रोत्साहन दिले जाते.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents