MPSCExams.com
One Place for All Exams Notes

चालू घडामोडी : २० एप्रिल २०२१

69

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 April 2021 | चालू घडामोडी : २० एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

 

1] विदेशी भारतीय नागरिक (OCI) कार्ड याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1. ते गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली येते.

2. आता प्रत्येक वेळी त्यांच्या नावावर नवीन पारपत्र दिल्यास OCI कार्डसाठी नोंदणी करणे आवश्यक नसणार.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

1) फक्त 1
2) फक्त 2
3) A आणि B
4) यापैकी नाही

उत्तर :- दोनही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
विदेशी भारतीय नागरिक (OCI) कार्ड भारतीय वंशाच्या परदेशी लोकांमध्ये आणि भारतीय नागरिकांच्या किंवा OCI कार्डधारकांच्या परदेशी वंशाच्या जोडीदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे; कारण या कार्डमुळे सदर व्यक्तींना भारतात मुक्त प्रवेश आणि अमर्यादित दिवस राहण्याची परवानगी प्राप्त होते.
बदलानुसार, ज्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षाच्या आधी OCI कार्डधारक म्हणून नोंदणी केली आहे, त्याला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पारपत्र प्रदान केल्यावर केवळ एकदाच OCI कार्ड पुन्हा प्रदान करावे लागेल. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 वर्षानंतर OCI कार्डधारक म्हणून नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला OCI कार्ड पुन्हा प्रदान करण्याची आवश्यकता नाही. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या मंत्रालयाने ‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते?

1) महिला व बाल विकास मंत्रालय
2) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
3) ग्रामीण विकास मंत्रालय
4) सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय

उत्तर :- ‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (DAY-NRLM) आणि इनिशीएटीव फॉर व्हॉट वर्क टू अडवांस विमेन अँड गर्ल्स इन द इकॉनमी (IWWAGE) या उपक्रमांचा एक संयुक्त प्रयत्न आहे. या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने 16 एप्रिल 2021 रोजी या कार्यक्रमाचे आभासी आयोजन केले होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?

1) मेंग ह्सुआन हिसिएह
2) गीता फोगाट
3) साक्षी मलिक
4) विनेश फोगाट

उत्तर :- भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने तैपेईच्या खेळाडूला पराभूत करून आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले.
आशियाई कुस्ती स्पर्धा ही एशियन असोसिएटेड व्रेसलिंग कमिटीच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या दिवशी ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ पाळला जातो?

1) 17 एप्रिल
2) 16 एप्रिल
3) 14 एप्रिल
4) 15 एप्रिल

उत्तर :- दरवर्षी 17 एप्रिल या दिवशी ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ पाळला जातो. हिमोफिलिया या रक्तविकाराविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2021 साली हा दिवस “अडाप्टींग टू चेंज: सस्टेनिंग केअर इन ए न्यू वर्ल्ड” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.
हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार आहे. ह्या आजारामध्ये रक्त गोठत नाही म्हणजे आपल्याला काही जखम झाल्यावर रक्तस्त्राव होता परंतू रक्तातील काही घटकांमुळे रक्तस्त्राव थांबतो यालाच रक्त गोठणे असे म्हणतात परंतू ही प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये नसली किंवा कमी प्रमाणात असती त्याला हिमोफिलिया आहे असे म्हटलं जाते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] अमेरिकेच्या ‘यूएस ट्रेझरी रिपोर्ट’ या अहवालानुसार, भारताला _____ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.

1) करन्सी मॅनिपुलेटर
2) अयोग्य चलन वापरकर्ता
3) यापैकी नाही
4) मॉनिटरिंग लिस्ट

उत्तर :- अमेरिकेच्या ‘यूएस ट्रेझरी रिपोर्ट’ या अहवालानुसार, भारताला ‘मॉनिटरिंग लिस्ट’ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा आपत्कालीन पतहमी योजनेत (ECLGS) समावेश होतो?

1) आरोग्य
2) पर्यटन
3) आदरातिथ्य
4) वरील सर्व

उत्तर :- कोविड-19 महामारीचा देशातील काही विशिष्ट उद्योगक्षेत्रांवर अद्याप विपरीत प्रभाव होत असून हे लक्षात घेऊन, केंद्रीय सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रांसाठी आपत्कालीन पतहमी योजनेला (ECLGS) मुदतवाढ दिली आहे. योजनेच्या अंतर्गत, कर्ज वितरीत करण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सरकारने यावेळी ‘आपत्कालीन पतहमी योजना 3.0’ (ECLGS 3.0) याची घोषणा केली असून त्यात आरोग्य, आदरातिथ्य, पर्यटन, मनोरंजन, क्रिडा या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या अंतर्गत, 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत सर्व संस्थांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी 40 टक्क्यांपेक्षा अधिक आपत्कालीन कर्ज घेता येणार नाही. योजनेच्या अंतर्गत एकूण 6 वर्षांसाठी कर्ज दिले जाईल ज्यात दोन वर्षांच्या अधिस्थगन काळाचाही समावेश असेल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?

1) ऑस्ट्रेलिया
2) अमेरिका
3) कॅनडा
4) टर्की

उत्तर :- टर्की देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलर’ नामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?

1) अमेरिका
2) रशिया
3) इराण
4) फ्रान्स

उत्तर :- रशिया 2025 सालापर्यंत भारताला हवाई संरक्षनार्थ ‘S-400 SA-21 ग्रोवलर’ नामक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली पुरविणार आहे. ते लांब पल्ल्याचे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणी ‘डोगेकोईन’ नामक ‘मेमे क्रिप्टोकरन्सी’चा शोध लावला?

1) बिली मार्कस
2) जॅक्सन पामर
3) A आणि B
4) यापैकी नाही

उत्तर :- बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी ‘डोगेकोईन’ नामक ‘मेमे क्रिप्टोकरन्सी’चा शोध लावला.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?

1) पर्ड्यू विद्यापीठ
2) मिशिगन विद्यापीठ
3) नॉट्रे डेम विद्यापीठ
4) शिकागो विद्यापीठ

उत्तर :- अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केल्याचा दावा केला आहे. सध्याचा रंग कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला आहे, तर नवीन रंग बॅरियम सल्फेटपासून बनविलेला आहे, ज्यामुळे ते अधिक शुभ्र होते. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: