Current Affairs : 20 December 2020 | चालू घडामोडी : २१ डिसेंबर २०२०

207

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 December 2020 | चालू घडामोडी : २१ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

अमेरिकेमध्ये सायबर हल्ला झाल्याचे आढळून आले आहे, ज्याला ‘सोलरविंड्स हॅक’ असे नाव देण्यात आले आहे. हा सायबर हल्ला अमेरिकेच्या सरकारी तसेच अनेक खासगी कंपन्यांवर झाला आहे. या हल्ल्याला ‘सप्लाय चेन’ हल्ला म्हटले जात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

“ग्रेट कोनजंक्शन” ही एक खगोलीय घटना आहे, ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांना लागून असल्याचे दिसून पडते. अशी एक घटना 21 डिसेंबर 2020 रोजी शनी आणि गुरू ग्रहांना दर्शविणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना 2020 साली ‘ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझिनेस अँड पीस’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण दुबईमध्ये फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायली चेंबर ऑफ कॉमर्स इंटरनॅशनल चॅप्टर याच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात येणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) त्याच्या वार्षिक पुरस्कारची घोषणा केली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत –

‘सर्वोत्कृष्ट FIFA क्रिडापटू पुरस्कार 2020’ – पोलंडचा रॉबर्ट लेवँडोव्हस्की (पुरुष), इंग्लंडची ल्युसी ब्रॉन्झ (महिला).
‘FIFA पुस्कास पुरस्कार 2020’ – सोन हेंउंग-मिन (दक्षिण कोरिया). 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

ओडिशा सरकारने कामगार व कर्मचारी राज्य विमा विभागाच्या 22 ऑनलाइन सेवांसह ‘परिश्रम’ (PAReSHRAM) नावाने एक संकेतस्थळ कार्यरत केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

हैदराबादचे नेहरू प्राणीसंग्रहालय हे ब्रिटनच्या अॅक्रिडीटेशन सर्व्हिस फॉर सर्टिफाइंग बॉडीज (ASCB) या संस्थेकडून ISO प्रमाणपत्र मिळविणारे भारतातले पहिले प्राणीसंग्रहालय ठरले आहे. त्याला ‘ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन मानक प्रमाणपत्र’ प्राप्त झाले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

उत्तरप्रदेश राज्यात जेवर शहरात बांधण्यात येत असलेल्या विमानतळाचे ‘नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव आहे. तो ग्रीनफील्ड विमानतळ असणार. विमानतळ दिल्लीपासून सुमारे 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

दरवर्षी 19 डिसेंबर या दिवशी गोवा मुक्तीदिन साजरा करतात. हा दिवस 450 वर्षांपासून पोर्तुगीज राजवटीखाली राहिलेल्या गोवा प्रदेशाला स्वतंत्र करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या विजयाचा दिन आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

कॅटो इन्स्टिट्यूट (अमेरिका) आणि फ्रेझर इन्स्टिट्यूट (कॅनडा) यांनी जाहीर केलेल्या ‘मानव स्वातंत्र्य निर्देशांक 2020’ अहवालामध्ये भारत 111 व्या क्रमांकावर आहे. यादीत न्यूझीलँड देश प्रथम स्थानी आहे. अहवालानुसार, भारताला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाबतीत 110 वा आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी 105 वा क्रमांक देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

17 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते भारतातले हल्दीबाडी आणि बांगलादेशामधले चिलाहाटी या ठिकाणांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे संयुक्तपणे उद्घाटन झाले. लोकांचे परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे एक प्रमुख पाऊल आहे. हल्दीबाडी – चिलहाटी मार्ग आसाम आणि पश्चिम बंगालमधून बांगलादेशात जाण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी सराव पेपर 20 December 2020

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम