चालू घडामोडी : 20 जुन 2021 | Current Affairs : 20 June 2021

293

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 JUNE 2021 | चालू घडामोडी : 20 जुन २०२१

चालू घडामोडी – 

Q1] कोणत्या दिवशी ‘शाश्वत सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) दिवस’ साजरा करतात?

1) 15 जून
2) 17 जून
3) 18 जून
4) 16 जून

उत्तर :- दरवर्षी 18 जून या दिवशी जगभरात ‘शाश्वत सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) दिवस’ साजरा करतात.
सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) हे खाद्यान्न आणि संस्कृती यांचा मेळ स्पष्ट करणारे क्षेत्र आहे. या अभ्यासात पौष्टिक तथ्ये, खाद्यान्न विज्ञान आणि इतर गोष्टींबरोबरच स्वयंपाकाचे तंत्र हे विषय देखील समाविष्ट आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q2] कोणत्या राज्यात किमीन-पोटीन रस्त्याचे उद्घाटन झाले?

1) आसाम
2) हिमाचल प्रदेश
3) नागालँड
4) मणिपूर

उत्तर :- आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात 20 किलोमीटर लांबीच्या दुपदरी किमीन-पोटीन रस्त्याचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 18 जून 2021 रोजी झाले. हा रस्ता सीमा रस्ते संघटना (BRO) या संस्थेने तयार केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q3] कोणत्या मंत्रालयाने “भारताचे वाळवंटीकरण आणि भूमी नीचयन अॅटलास”ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली?

1) पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय
2) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
3) पृथ्वी विज्ञान मंत्रालय
4) गृह मंत्रालय

उत्तर :- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वर्ष 2018-19 या कालावधीसाठी “भारताचे वाळवंटीकरण आणि भूमी नीचयन अॅटलास”ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. हा नकाशासंग्रह अहमदाबाद येथील ISRO संस्थेच्या स्पेस अ‍ॅप्लीकेशन सेंटर या केंद्राने प्रकाशित केला आहे. नकाशासंग्रह भारतीय भूखंडामधील निकृष्ट भूमीविषयी स्पष्टता देते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q4] कोणत्या राज्यात रेवदंडा बंदर आहे?

1) तामिळनाडू
2) महाराष्ट्र
3) केरळ
4) पश्चिम बंगाल

उत्तर :- रेवदंडा हे ठिकाण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक बंदर असून, ते महाराष्ट्राच्या मुंबई शहरापासून दक्षिणेकडे जवळजवळ 44 कि.मी. दूर अंतरावर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q5] कोणत्या संस्थेने ‘इंडियन सर्टिफिकेशन ऑफ मेडिकल डिवाइसेस प्लस’ (ICMED) योजनेचा प्रारंभ केला?

1) भारतीय वैद्यकीय उत्पादने उत्पादक संघ
2) भारतीय गुणवत्ता परिषद
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही

उत्तर :- भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) आणि भारतीय वैद्यकीय उत्पादने उत्पादक संघ (AiMeD) या संस्थांनी संयुक्तपणे ‘इंडियन सर्टिफिकेशन ऑफ मेडिकल डिवाइसेस प्लस’ (ICMED) योजनेचा प्रारंभ केला. बनावट उत्पादने आणि बनावट प्रमाणपत्रांची ओळख पटविण्यासंबंधीची आव्हाने हाताळण्यासाठी खरेदी संस्थांना या उपक्रमाची मदत होईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q6] अमेरिकेच्या सरकारने ‘Juneteenth’ किंवा _____ या दिवशी ‘संघराज्य सुट्टी’ घोषित करण्यास मान्यता दिली आहे.

1) 19 जून
2) 18 जून
3) 17 जून
4) 20 जून

उत्तर :- अमेरिकेच्या सरकारने अमेरिकेतील गुलामगिरी संपविण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या ‘Juneteenth’ किंवा 19 जून या दिवशी ‘संघराज्य सुट्टी’ घोषित करण्यास मान्यता दिली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q7] केरळचा सिल्व्हरलाइन प्रकल्प _____ सोबत जोडतो.

1) कोट्टयम याला आलापूझा
2) कासारगोड याला तिरुवनंतपुरम
3) एर्नाकुलम याला कोल्लम
4) यापैकी नाही

उत्तर :- केरळचा सिल्व्हरलाइन प्रकल्प हा ‘सेमी हाय-स्पीड’ रेल्वे प्रकल्प आहे. हा प्रकल्प केरळचे दक्षिणेकडील टोक आणि राजधानी तिरुवनंतपुरम आणि उत्तरेकडील कासारगोड या ठिकाणांना जोडतो. 529.45 किलोमीटर लांबीचा हा रेलमार्ग 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q8] भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नेव्हल फोर्स यांची “IN-EUNAVFOR” संयुक्त नौ-कवायत 18 जून 2021 रोजी ______ येथे प्रारंभ झाली.

1) लाल समुद्र
2) अदेनचे आखात
3) गिनीचे आखात
4) ओमानचे आखात

उत्तर :- भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नेव्हल फोर्स (EU NAVFOR) यांची पहिली “IN-EUNAVFOR” संयुक्त नौ-कवायत 18 जून आणि 19 जून 2021 रोजी अदेनच्या आखातात आयोजित करण्यात आली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q9] खालीलपैकी कोणती ‘उद्योग आधार करार’ (UAM) याची वाढीव वैधता तारीख आहे?

1) 31 डिसेंबर 2021
2) 31 नोव्हेंबर 2021
3) 31 सप्टेंबर 2021
4) यापैकी नाही

उत्तर :- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ‘उद्योग आधार करार’ (UAM) याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला असून हा करार 31 मार्च 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध राहणार आहे. ‘उद्योग आधार करार’ यामध्ये उद्योगांच्या नोंदणीसंबंधीची माहिती नमूद असते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

Q10] कोणत्या मंत्रालयाने 19 जून 2021 रोजी द्वितीय राष्ट्रीय दात्रपेशी परिषद आयोजित केली?

1) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
2) पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय<
3) नवीन व नवीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालय
4) आदिवासी कार्य मंत्रालय

उत्तर :- 19 जून 2021 रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक दात्रपेशी (सिकलसेल) जागृती दिनानिमित्त, आदिवासी कार्य मंत्रालयाने द्वितीय राष्ट्रीय दात्रपेशी परिषद आयोजित केली. आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी परिषदेचे उद्घाटन केले. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम