Current Affairs : 21 December 2020 | चालू घडामोडी : २१ डिसेंबर २०२०

166

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 December 2020 | चालू घडामोडी : २१ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

दरवर्षी 20 डिसेंबर या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Human Solidarity Day) साजरा करतात. लोकांच्या विविधतेमधील एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट करीत जनजागृती करणे, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारत देश ‘जी-7 शिखर परिषद 2021’ यामध्ये एक अतिथि म्हणून दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासहीत भाग घेणार आहे. परिषदेचे यजमानपद ब्रिटनकडे आहे.
जी-7 (7 देशांचा समूह) याची स्थापना 1973 साली झाली. राजकीय आणि आर्थिक समस्येवर चर्चा करण्यासाठी त्याची स्थापना केली गेली होती. हा जगातल्या सर्वात जास्त औद्योगीकृत देशांचा एक गट आहे, ज्यामध्ये फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा हे देश आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

अमेरिकेची NASA संस्था आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्यामध्ये ‘गेटवे संधी’ झाली आहे. या ऐतिहासिक करारामुळे कॅनडा देश “ल्युनार गेटवे स्पेस स्टेशन” या चंद्र प्रकल्पाचा एक भागीदार असणार. प्रकल्पासाठी NASA ‘आर्टेमिस II’ मोहीम 2023 साली चंद्राकडे पाठविणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) यांना पोलाद क्षेत्रात प्रतिष्ठित ‘गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2020’ देण्यात आला.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) सिंगापूर देशातल्या “हॉकर” संस्कृतीला मान्यता दिली आहे आणि त्याच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा या यादीमध्ये समावेश केला. सिंगापूरमधले हॉकर सेंटर हे वैविध्यपूर्ण अन्नसंस्कृतीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यादीमध्ये योग, चायनीज कॅलिग्राफी आणि फ्लेमेन्को यांचा देखील समावेश आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘नेटवर्क फॉर ग्रीनिंग द फायनॅन्शियल सिस्टम (NGFS) हे 75 केंद्रीय बँका आणि आर्थिक पर्यवेक्षकांचे एक जाळे आहे. त्याची स्थापना 2017 साली झाली आणि त्याचे मुख्यालय पॅरिस (फ्रान्स0 शहरात आहे. हरित पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्याची स्थापना झाली. अलीकडेच यूएस फेडरल बँक आणि युरोपियन सिक्युरिटीज अँड मार्केट अ‍ॅथॉरिटीज या संस्था NGFSमध्ये सामील झाल्या. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारताच्या पुढाकाराने दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी ‘जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करतात. अल्पसंख्यांक समुदायांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. भाषिक, धर्म, जाती आणि वर्ण याबाबतीत अल्पसंख्यांक असलेल्या व्यक्तींच्या विशेषाधिकारांची उन्नती करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 18 डिसेंबर 1992 रोजी धार्मिक किंवा भाषिक राष्ट्रीय किंवा वांशिक अल्पसंख्याकांच्या व्यक्तींच्या हक्कांविषयक जागतिक करारनामा स्वीकारला होता. जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन हा भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या पुढाकाराने साजरा केला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

जागतिक बँकेनी छत्तीसगड, नागालँड राज्यातल्या विकास उपक्रमांना आणि द्वितीय धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्प (DRIP-2) यांना पाठिंबा देण्यासाठी 800 दशलक्ष डॉलर एवढ्या खर्चाच्या चार प्रकल्पांना मान्यता दिली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

मेडागास्करमध्ये आढळणाऱ्या गॅस्ट्रोडिया एग्निसेलस ही जात “जगातले सर्वात कुरूप ऑर्किड” फूल ठरले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘E-20 इंधन’ म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय. ‘E-20 इंधन’मुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार. 

# Current Affairs


 

 

चालू घडामोडी सराव पेपर 20 December 2020

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम