चालू घडामोडी : २२ जानेवारी २०२१

175

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 22 January 2021 | चालू घडामोडी : २२ जानेवारी २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या राज्यात ‘SAAMAR’ मोहीम राबविली जात आहे?

1) मध्यप्रदेश
2) छत्तीसगड
3) बिहार
4) झारखंड

उत्तर :- झारखंड सरकार राज्यात ‘SAAMAR’ (Strategic Action for Alleviation of Malnutrition and Anaemia Reduction) मोहीम राबवित आहे. झारखंडमधील कुपोषणावर उपाय म्हणून अशक्त महिला आणि कुपोषित मुलांची ओळख पटविण्यात येत आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ____ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 19 मार्च 2021 रोजी पथप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

1) 82 वा
2) 81 वा
3) 83 वा
4) 84 वा 

उत्तर :- केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यावर्षी त्याचा 82 वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 19 मार्च 2021 रोजी गुरुग्राम येथील CRPF प्रबोधिनीमध्ये वार्षिक पथप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या संकल्पनेखाली “आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन 2021” साजरा करण्यात आला?

1) रिकोगनिशन, जस्टिस अँड डेवलपमेंट
2) प्रोमोटिंग टोलेरन्स, इंक्लुशन, यूनिटी अँड रिस्पेक्ट फॉर डायव्हरसिटी
3) यूथ स्टँडिंग अप अगेन्स्ट रॅसीझम
4) यापैकी नाही

उत्तर :- दरवर्षी 21 मार्च या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन’ साजरा करतात. या वर्षी “यूथ स्टँडिंग अप अगेन्स्ट रॅसीझम” या संकल्पनेखाली “आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन 2021” साजरा करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या खेळाडूने नवी दिल्ली ISSF विश्वचषक 2021 या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले?

1) अपूर्वी चंदेला
2) दिव्यांश सिंग पनवार
3) सौरभ चौधरी
4) अंजुम मौदगिल

उत्तर :- दिव्यांश सिंग पनवार याने नवी दिल्ली ISSF विश्वचषक 2021 या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा करतात?

1) 18 मार्च
2) 19 मार्च
3) 21 मार्च
4) 20 मार्च

उत्तर :- दरवर्षी 20 मार्च या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा करतात. “सर्वांसाठी आनंद, कायमचा” (Happiness for All, Forever) ही 2021 साली या दिनाची संकल्पना आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या कंपनीसोबत संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराला मिलान-2टी अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्यासाठी करार केला?

1) भारत डायनॅमिक्स लिमिटेड
2) भारत इलेक्ट्रॉनिक्स
3) बीईएमएल लिमिटेड
4) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

उत्तर :-संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी (अधिग्रहण) विभागाने, भारतीय लष्कराला 4,960 मिलान-2टी अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र (ATGM) चा पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर 19 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी केली.
मिलान-2 टी हे 1,850 मीटर मारक क्षमता असलेले टँडम वॉरहेड ATGM आहे. BDLने फ्रान्सच्या MBDA क्षेपणास्त्र प्रणालीच्या परवान्याअंतर्गत हिची निर्मिती केली आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून तसेच वाहनांवर आधारित लाँचर्सवरून मारा करू शकतात आणि चढाई आणि बचावात्मक दोन्ही कामांसाठी अँटी-टँक स्वरूपात तैनात केले जाऊ शकतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] डाऊन सिंड्रोम आजारासह जन्मलेल्या मुलांमध्ये _____ असते.

1) क्रोमोसोम एक्स नसते
2) क्रोमोसोम एक्स ची एक अधिक जोडी
3) क्रोमोसोम 21 ची एक अधिक जोडी
4) यापैकी नाही

उत्तर :-क्रोमोसोम 21 ची एक अधिक जोडी मेंदुत असल्याने होणारा आजार म्हणजे डाऊन सिंड्रोम आजार होय. हा मानसिक व शारिरीक लक्षणे दाखवणारा आजार आहे. डाऊन सिंड्रोम असणाऱ्या लोकांमध्ये काही मानसिक व शारिरीक कारणे सारखी असली तरी त्याची लक्षणे साधारण ते गंभीर असु शकतात. साधारणपणे अशा लोकांमध्ये सामान्य लोकांपेक्षा मानसिक व शारिरीक वाढ कमी असते.
दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा केला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] ‘जागतिक आनंदीपणा अहवाल 2021’मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे?

1) 149
2) 139
3) 107
4) 88

उत्तर :-संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने वार्षिक ‘जागतिक आनंदीपणा अहवाल 2021’ जाहीर करण्यात आला आहे. जगभरातील 149 आनंदी देशाच्या यादीत भारत 139 व्या क्रमांकावर आहे.
यादीत फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल आइसलँड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नॉर्वे या देशांचा क्रमांक आहे. अमेरिका या यादीत 19 व्या स्थानी आहे. कायम युद्धाची परिस्थिती असलेल्या अफगानिस्तानचे लोक सर्वाधिक दु:खी असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्याच्या संदर्भात भारत आणि _____ या देशांनी ISA/IPEA म्हणून सहकार्याने कार्य करण्यासाठी एकमेकांच्या कार्यालयांना मान्यता प्रदान करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.

1) जपान
2) फ्रान्स
3) रशिया
4) जर्मनी

उत्तर :- कार्यालयांद्वारे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी दाखल केल्या जाणाऱ्या अर्जांसाठी भारत आणि जपान या देशांनी “स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय शोधकार्य आणि आंतरराष्ट्रीय प्रारंभिक परीक्षण प्राधिकरण (ISA/IPEA)” म्हणून सहकार्याने कार्य करण्यासाठी एकमेकांच्या कार्यालयांना मान्यता प्रदान करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या घटनेला चिन्हांकित करताना नवरोज सण साजरा करतात?

1) उत्तर गोलार्धात वसंत ऋतुची समाप्ती
2) उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतुचे आगमन
3) उत्तर गोलार्धात वसंत ऋतुचे आगमन
4) यापैकी नाही

उत्तर :-  20 मार्च 2021 रोजी जगभरात पारशी समुदायाचा नवरोज सण साजरा करण्यात आला आहे. हा दिवस इराणी दिनदर्शिकेचा पहिला महिन्याचा पहिला दिवस आहे. उत्तर गोलार्धात वसंत ऋतुच्या आगमनाला चिन्हांकित करताना नवरोज सण साजरा करतात. 

# Current Affairs


 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम